दोन मोठे बटाटे, एक मोठा टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, १ टे स्पु धणे, १ टी स्पु जिरे, १/२ टी स्पु मेथ्या, १/२ टी स्पु आमचूर पावडर, तिखट, गरम मसाला, साखर, मीठ, फोडणीसाठी- तेल, हिंग, हळद.
बटाटे उकडून सालं काढून बारीक फोडी कराव्यात. टोमॅटोच्या पण बारीक फोडी कराव्यात. कोथिंबीर चिरून घ्यावी. धणे, जिरे आणि मेथ्या भरड वाटून घ्याव्यात. त्यात चवीप्रमाणे गरम मसाला, तिखट घालून नीट मिसळून घ्यावे. फोडणीसाठी जरा सढळ हाताने तेल गरम करून त्यात हिंग, हळद घालून धणे-जिरे इ.चे मिश्रण घालावे आणि भरभर हालवावे. सगळा मसाला नीट पोळला पाहिजे पण जळाला नाही पाहिजे. त्यात लगेच बटाट्याच्या फोडी, टोमॅटो, कोथिंबीर घालावे. न हालवता जरा वेळ तसेच राहू दिले की मसाला आणि बटाटे छान खरपूस होतात. मीठ, छोटा चमचाभर साखर आणि आमचूर पावडर घालून भाजी नीट हालवून घ्यावी. आंच जरा जास्त ठेवून मस्त खरपूस करावी. टोमॅटोचा रस आटून जातो शेवटी. जरा जाड पुर्यांसोबत मस्त लागते ही भाजी.
ही एका मैत्रिणीने दिलेली रेसिपी आहे. मैत्रीण राजस्थानी आहे. पण ही काही पारंपरिक रेसिपी आहे की नाही हे माहिती नाही. तिच्याकडे गेलं की ही भाजी आणि पुडी असा बेत नाश्त्याला असतो.
यम्मी!
यम्मी!
मस्त!
मस्त!
अरेवा!? त्यामानाने सोपी आहे
अरेवा!?:)
त्यामानाने सोपी आहे (वाटण घाटण आहे तेव्हा एकदम सोपी नाही) ..
फोटो ताणला गेला आहे का ?
छान वाटतेय !! फोटो ताणला गेला
छान वाटतेय !!
फोटो ताणला गेला आहे का ?
<<<:खोखो:
मस्त !
मस्त !
पुडी म्हणजे काय ? >>>
पुडी म्हणजे काय ? >>> पुरी
छान रेस्पी
मस्त. माझी फेवरिट आहे. त्यात
मस्त. माझी फेवरिट आहे. त्यात इंडक्षन कुकर वर आपल्याला फ्लॅट सरफेस खूप मिळतो व सर्व बटाट्याच्या फोडी मस्त खरपूस करून घेता येतात. पुरी तळायला वेळ नसल्यास बाँबे पाव झिंदाबाद.
मस्त वाटतेय सोप्पी. उद्या
मस्त वाटतेय सोप्पी. उद्या साठी फीट करते डोक्यात.
मस्त नि सोप्पी
मस्त नि सोप्पी
एकदम मस्त आणि सोपी रेसिपी.
एकदम मस्त आणि सोपी रेसिपी.
मस्तच आहे. परंतु फार काळजी
मस्तच आहे. परंतु फार काळजी घ्यायला पाहिजे असे वाटत आहे नाहीतर `ख' चा `क' व्हायला वेळ लागणार नाही. खरपूस होण्यासाठी नॉन स्टिक भांड्यातच केली पाहिजे ही पा.कॄ.
व्वा! छानच!
व्वा! छानच!
मस्त मस्त फोटो! सध्या
मस्त मस्त फोटो!
सध्या आमरसाबरोबर करता येईल. केली की फोटो डकवेन इकडे.
मस्त, तोपासु.
मस्त, तोपासु.
फोटो छान वाटतोय. आज डब्यात
फोटो छान वाटतोय. आज डब्यात पण उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे, पण खरपुस नाही
करुन पाहायला हवी आता खरपुस भाजी.
सापाला ऐकू येत नाही असं
सापाला ऐकू येत नाही असं म्हणतात. त्याला जमिनीतली व्हायब्रेशन्स जाणवतात असं एकाने सांगितलं. मग उंच बिल्डींगच्या गच्चीवर किंवा झाडावरच्या घरट्यातली पक्षांची पिल्ल कशी काय खातो तो ?
खरपूस भाजीची पाकृ सोपी
खरपूस भाजीची पाकृ सोपी वाटतेय. आमरसाबरोबर फिट्ट होईल. करून पाहायला हवी.
>>खरपूस भाजीची पाकृ सोपी
>>खरपूस भाजीची पाकृ सोपी वाटतेय. आमरसाबरोबर फिट्ट होईल. >> +१
सोपी आणि खूप मस्त चवीची भाजी
सोपी आणि खूप मस्त चवीची भाजी आहे ही. आमरसाबरोबर खरंच मस्त वाटेल मेनुत. ही भाजी, आमरस आणि पुर्या. वा वा
फोटो ताणला गेला आहे का ? >>> फोटोला काय झालं कळालं नाही. फोनवर ताणलेला दिसतोय. पण डेस्कटॉपवर नीट दिसतोय.
मस्त आहे.... बटाटाखाऊ
मस्त आहे.... बटाटाखाऊ नवर्याला आवडेल.
सही दिस्तेय रेस्पी. उ. ब.
सही दिस्तेय रेस्पी. उ. ब. आहेत. आजच करून बघण्यात येईल.
सही दिसते आहे. वीकेन्डला
सही दिसते आहे. वीकेन्डला आमरसाबरोबर नक्की.
मस्त ब्रंच मेन्यु आहे हा.
मस्त ब्रंच मेन्यु आहे हा.
मस्त आणि सोपी रेसिपी आवड्ली
मस्त आणि सोपी रेसिपी आवड्ली
यम्मी वाटतेय एकदम, मी पण
यम्मी वाटतेय एकदम, मी पण आमरसाबरोबर करणार म्हणतेय .. आधीच एवढ्या कॅलरीज अन कार्ब्स म्हटल्यावर वर पुन्हा पुर्या करायला हिंमतच लागेल पण
शेवटच्या ४-५ पुर्या जरा
शेवटच्या ४-५ पुर्या जरा जास्त तळ म्हणजे कॅलरीज बर्न होउन गिल्ट कमी होइल
अहा.... मोह होतोय बटाटे
अहा.... मोह होतोय बटाटे आणायचा. बरं आणते. ...
धणे-जीरे-मेथ्या न भाजताच भरड वाटायचे ना?
हो.
हो.
मी आत्ता केली, फुलक्यांसोबत
मी आत्ता केली, फुलक्यांसोबत खायला मस्त लागली. धणे-जिरे-मेथ्यांचा फ्लेवर छान आला. महत्वाचं म्हणजे करायला अजिबातच वेळ लागत नाही.
आयपॅडवर फोटो स्ट्रेच्ड् दिसला
आयपॅडवर फोटो स्ट्रेच्ड् दिसला .. आता तसा दिसत नाही ..
धने-जीरे-मेथी भाजून वाटले तर स्वाद आणखी चांगला येईल काय? माझ्या जित्याची खोड स्पेशल प्रमाणे तसं व्हेरीयेशन करून बघायची इच्छा होते आहे ..
Pages