Submitted by आनंद पेंढारकर on 3 May, 2013 - 03:20
दिवस नखांनी टोकरल्यागत, तू नसल्यावर....
रात्री गात्री घन भरल्यागत, तू नसल्यावर....
अस्तित्व तुझे व्यापुन टाकी या श्वासांना
जीव उरे हा पोखरल्यागत, तू नसल्यावर....
शब्द तुझ्या होतात समोरी छूमंतरसे
ओठांत कुणी थरथरल्यागत, तू नसल्यावर....
तूच खुणांचा जातेस पसारा मांडूनी
राहूच कसा आवरल्यागत, तू नसल्यावर ?
तानपुरा जुळताना पश्चिम रक्तिम होते
स्वर सांजेला कातरल्यागत, तू नसल्यावर....
कोण बिलगते रात्रीच्या गर्भातुन उतरुन ?
छातीवरती पांघरल्यागत, तू नसल्यावर ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वावा, शेवटचे दोन फार आवडले.
वावा, शेवटचे दोन फार आवडले. रदीफही चांगली आहे. 'गत' ही जोडणी वेगळी वाटली पण चालून गेली. मला काही ओळी नीट म्हणता आल्या नाहीत. पुन्हा बघतो. धन्यवाद.
छान वाटली
छान वाटली
शब्दकळा आवडली. लयीबद्दल
शब्दकळा आवडली.
लयीबद्दल बेफिकीरांशी सहमत.
प्रत्येक शेराच्या दोन मिसर्यांतील संबंध अजून दृढ हवा होता.
धन्यवाद....
धन्यवाद....
खूप छान लिहिले आहे शब्दांचे
खूप छान लिहिले आहे
शब्दांचे नैसर्गिक वजन हा मुद्दा आठवला
मात्रा जुळवताना कसरत बरीच झालेली वाटली ( ......गम्मत केली :))
सुंदर गझल! तू नसल्यावर
सुंदर गझल!
तू नसल्यावर .........सुंदर रदीफ
फक्त मतल्यातील उला मिस-यातील नखांनी पोखरल्यागत जरा खटकले!
मतला असा करता यावा.......
दिवस स्मृतींनी पोखरल्यागत, तू नसल्यावर....
रात्री गात्री घन भरल्यागत, तू नसल्यावर....
इति कर्दनकाळ
ककांचा प्रतिसाद बहुअंशी पटला
ककांचा प्रतिसाद बहुअंशी पटला !!!
खरं तर ते टोकरल्यागत होतं.
खरं तर ते टोकरल्यागत होतं. इथे लिहिताना चूक झाली होती.
सुर्रेखच.
सुर्रेखच.
"तूच खुणांचा जातेस पसारा
"तूच खुणांचा जातेस पसारा मांडूनी
राहूच कसा आवरल्यागत, तू नसल्यावर ?" >>> हा शेर सर्वात आवडला.
धन्यवाद !
धन्यवाद !
अव्वल एक्सप्रेशन.....!
अव्वल एक्सप्रेशन.....!
मस्त!
मस्त!
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार !