Submitted by SADANAND BENDRE on 1 May, 2013 - 04:28
आरसाही मागतो आता पुरावे
राहिल्या अब्रूसवे आता निघावे
सोडले मोकाट आम्ही लांडग्यांना
मोजताना वासरे मग का रडावे
फारसे लावून हल्ली घेत नाही
नेहमीचे तू करावे मी भरावे
पालखीमागून अनवाणी निघालो
लाख डोळ्यांना तुझ्या इतके दिसावे
होउ दे डोहाळजेवण यातनांचे
मोकळे व्हावे, पुन्हा मनसोक्त गावे
वेड हे समृद्ध व्हावे जाणिवांनी
अन शहाणा तू मला तेव्हा म्हणावे
मी तसा डरतो कुठे मृत्यूस माझ्या
फक्त तो येईल तेव्हा मी नसावे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्कृष्ट गझल. धन्यवाद.
उत्कृष्ट गझल.
धन्यवाद.
वा वा फारच आवडली खूप
वा वा फारच आवडली
खूप दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले हाही एक झालेला आनंद आहेच
सोडले मोकाट आम्ही
सोडले मोकाट आम्ही लांडग्यांना
मोजताना वासरे मग का रडावे << व्वा ! >>
सर्वच शेर सुंदर आहेत
खूपच छान. बर्याच दिवसांनी
खूपच छान. बर्याच दिवसांनी काहीतरी नेमक्या शब्दात, भावनांचा फाफटपसारा न मांडता लिहीलेले वाचायला मिळाले. लिहीत रहा.
आरसाही मागतो आता
आरसाही मागतो आता पुरावे
राहिल्या अब्रूसवे आता निघावे
सोडले मोकाट आम्ही लांडग्यांना
मोजताना वासरे मग का रडावे
व्वा. गझल आवडली.
गझल वाळवंटात ओअॅसिस
गझल वाळवंटात ओअॅसिस भेटल्यागत वाटलं.
आवडली गझल.
वेड हे समृद्ध व्हावे
वेड हे समृद्ध व्हावे जाणिवांनी
अन शहाणा तू मला तेव्हा म्हणावे
>> व्वा!
गझल वाळवंटात ओअॅसिस >>
गझल वाळवंटात ओअॅसिस
>>:D
डोहाळजेवण
डोहाळजेवण यातनांचे...अफलातून
गझलही सुपर्ब !
डॉ. शी सहमत
पालखीमागून अनवाणी निघालो लाख
पालखीमागून अनवाणी निघालो
लाख डोळ्यांना तुझ्या इतके दिसावे
व्वा... गझल आवडली
आरसा वापरून आजवर अनेक शेर
आरसा वापरून आजवर अनेक शेर लिहिले गेले आहेत. मात्र हे सादरीकरण फ़ार वेगळे आणि छान आहे
गझल मस्त आहे ! अवांतर - डरतो
गझल मस्त आहे !
अवांतर - डरतो हा शब्द मराठी नसावा असे असले तरी चालत असल्यास आक्षेप नाही !
सुंदर गझल… 'डरतो' शब्द
सुंदर गझल…
'डरतो' शब्द टाळल्यास आणखी चांगलं….
'मी न घाबरतो तसा मृत्यूस माझ्या' असे केले तर ?? ( सहजच सुचवलं…गैरसमज नसावा )
बाकी गझल उत्तम…
धन्यवाद आणि शुभेच्छा.
मी तसा भीतो कुठे मृत्यूस
मी तसा भीतो कुठे मृत्यूस माझ्या

असाही पर्याय उपलब्ध करता येवू शकेल...सहजच सुचले म्हणून सुचवले
मतला आणि डोहाळजेवण हे शेर
मतला आणि डोहाळजेवण हे शेर आवडले.
'लांडगे' आणि 'डोहाळजेवण'
'लांडगे' आणि 'डोहाळजेवण' सर्वात विशेष वाटले.
खूप खूप आवडेश लांडगे , वेड,
खूप खूप आवडेश
लांडगे , वेड, आरसे....... एकदम भारी !!
खूप आवडली. नेमकी अर्थपूर्ण
खूप आवडली. नेमकी अर्थपूर्ण शब्दरचना
छान आहे.......आवडली......
छान आहे.......आवडली......
पूर्वी वाचलेली आहेच.........
पूर्वी वाचलेली आहेच.........
अप्रतिम..!!
----------------------------
दिसत जा हो अधून मधून.. 'गझल' हवीहवीशी वाटायला लागते.
वाह !! आणि काही शेर तर..
वाह !!
आणि काही शेर तर.. 'व्वाह!! व्वाह!! व्वाह!!'
छान गझल.
छान गझल.
''शहाणा" खूपच छान.
''शहाणा" खूपच छान.
छान! कृपया मेल पहावे! कारण
छान!
कृपया मेल पहावे!
कारण इथे ओअॅसिसवाले फार आहेत!.............इति कर्दनकाळ
वाटचाल अजून चालू, चटके बसून
वाटचाल अजून चालू, चटके बसून सुद्धा!
वाळूतच कोठे कोठे हिरवळ अजून आहे!!............इति कर्दनकाळ
वेड शेर विशेष आवडला!!
वेड शेर विशेष आवडला!!
जबरी लिहिता राव .....
जबरी लिहिता राव .....
खूप सुंदर लिहिलेत..
खूप सुंदर लिहिलेत..
खुपच सुरेख लिहीलंय, भावलं!!
खुपच सुरेख लिहीलंय, भावलं!!
"डरतो" शब्दास पर्याय
"डरतो" शब्दास पर्याय कशाला?
उलट याने गझलेची मिठास वाढलीय.
Pages