देवळांच्या देशा - "माणकेश्वर हेमाडपंथी मंदिर (झोडगे)"

Submitted by ज्ञानु on 25 April, 2013 - 00:59

(आधी मी प्रिय मित्र जिप्सी यांची माफी मागतो . त्यांच्या लेखमालेचे नाव मी माझ्या या लेखाला दिले परंतु .हेच नाव याला योग्य असले असते अस मला वाटत. जिप्सी मित्रा क्षमस्व आणि आभार .)

भारतातील काही मोजक्या हेमाडपंथी मंदिरातील हे एक माणकेश्वर शिवालय . नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला मालेगाव तालुक्यात झोडगे म्हणून एक गाव आहे तिथे हे मांदिर आहे . मालेगाव ते धुळे मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वर हे गाव लागते .रस्त्याने जातांना उजव्या बाजूला नजर टाकल्यास एका टेकडीच्या खाली हे मंदिर स्पष्ट दिसते.
अंबरनाथ येथील शिवमंदिर ,सिन्नर येथील गोंदेशवर ,तसेच त्रांबकेश्वरचे मंदिर हे याच शैलीतले . इंटरनेटला खूप शोधले पण या मंदिराची मोजकीच माहिती मिळाली मग शेवटी मोह न अवरल्याने हा उपेक्षित कलेचा खजाना पहायला निघालो .
मंदिर परिसर प्रशस्त व रमणीय आहे .कुठल्याही मंदिरात असणारा गोंगाट येथे नसतो . एक नीरव शांतता जी तुम्हाला क्षणार्धात ध्यानस्थ करून टाकेल . अशी ही जागा . झोटिंग नावच्या टेकडी वर नाथपंथीय साधूंचा वास होता त्यांच्यासाठी हेमाद्री पंडिताने इ.स. च्या १३ व्या शतकात हे मंदिर येथे उभारले. मंदिरासमोर याच मंदिराची छोटी प्रतिकृती पडक्या अवस्थेत उभी आहे.स्थानिक नागरिकांना भेटल्यावर भारतीय पुरातत्व खात्याचे या कलाकृती कडे किती दुर्लक्ष आहे हे समजते . फक्त अजिंठा -वेरूळ हि दोनच ठिकाणे माहिती असणार्‍यांनी एकदा या मंदिराला नक्की भेट द्यावी . येथील काही स्थानिक तरूणांकडून दरवर्षी दीपावली पाडव्याला "दीपोत्सव " घेतला जातो 3500 दिवे लावून हे तरुण "मंदिर संवर्धंनाचा" संदेश देतात .
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराजवळ महाराष्ट्रातील सर्व मंदिरांच्या प्रतिकृती पाहावयास मिळतात त्यात याच्या प्रतिकृतीचाही समावेश आहे.
येथे दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते . राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात या यात्रेचे या यात्रेचे विशेष म्हणजे पारंपरिक तमाशा व कुस्त्यांची दंगल .
तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटतो की मला आमच्या मंदिराचा खूप जुना फोटो मिळालाय . तो आपणा सोबत share करतांना प्रचंड आनंद वाटतोय . साभार माजी सरपंच दीपक लोटणराव देसले .
575421_129356887256257_186927552_n_0.jpg
प्रचि . 1
zodage temple.jpg
_______________________________________________________________
प्रचि २ .
Untitled_Panorama23.jpg
मंदिरावरील शिल्प अत्यंत कोरीव आहेत मंदिराची डावी बाजू काही प्रमाणात ढासळलेली असली तरीही उजवी बाजू अजूनही जशीच्या तशी आहे.भगवान विष्णूच्या १० अवतरांची शिल्प इथे पाहावयास मिळतात .यातील वामन अवतार शिल्प जे प्रचि . २ मधील एका चौकटीत दिसते अत्यंत सुंदर आहे . यात त्यांनी पातळ नरेशच्या डोक्यावर आपले तिसरे पाऊल ठेवून हातात छत्री घेऊन उभे असल्याचे दिसते . तसेच इतर देव देवतांची शिल्पेही इथे आढळतात .
________________________________________________________________
प्रचि ३.
913723_506588586068066_955616105_o.jpg
मंदिराचे एक मुख्य वैशिष्ट्य येथे आलेल्या पुरातत्व खात्याच्या अभ्यासककडून समजले .हे जगातील एकमेव असे मंदिर आहे . की ज्याला ३ "कीर्तीमुख " आहेत . याच्याशी सलग्न कुठल्याही हेमाडपंथी अथवा इतर शैलीतल्या मंदिरांना १ च कीर्तीमुख आहे . कीर्तीमुख म्हणजे हिंदू धर्मात घरच्या प्रवेश द्वाराला लावले जाणारे मुखवटे. ज्याचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. सध्या यातील दोन किर्तिमुख तसेच आहेत तर तिसरे ढासळले आहे. परंतु माणसाचा हात अजूनही तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे येथील काम टिकून आहे.

___________________________________________________________________
प्रचि ४.
S6300161.jpg
मंदिर पाश्चिमाभिमुख आहे . त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभर्यात प्रवेश करतात .
___________________________________________________________________
प्रचि ५.
IMG_0363.jpg
मंदिरातील शिवलिंग. व गाभारा . येथील शिवलिंग कोकणातील "मारलेश्वर शिवलिंगाशी साधर्म्य साधणारे आहे.
___________________________________________________________________
प्रचि ६.
12.jpg
___________________________________________________________________
प्रचि ७. IMG_0329 (2).jpg
___________________________________________________________________
प्रचि ८.
01.jpg
महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार आर्टिस्ट शिवाजी तुपे यांनी काढलेले मंदिराचे रेखाचित्र .
___________________________________________________________________
प्रचि ९..
63302_436450883081837_1801063044_n.jpg
___________________________________________________________________
प्रचि १०
481771_436450933081832_848845182_n.jpg
__________________________________________________________________
प्रचि ११. .61484_436450973081828_1379641726_n.jpg
_____________________________________________________________________
प्रचि १२
598422_436450899748502_959714822_n.jpg
______________________________________________________________________
प्रचि १३ .
3757_435291233197802_1410319691_n.jpg
______________________________________________________________________
एक आव्हान - आपल्याला महाराष्ट्रातील इतके मंदिर माहीत आहेत. परंतु या मंदिरसारखी अनेक अशी मंदिरे दडलेल्या खजान्यासारखी आहेत. त्यांच्या जतन आणि संवर्धंनासाठी निदान एकदा तरी त्यांना भेट द्या .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"गोन्देश्वर मंदिर (सिन्नर) किंवा अंबरनाथ मंदिराची समग्र माहिती कुणाकडे असेल तर plz इथे लिहा किंवा लिंक द्या गरज आहे. !!

सुंदर फोटो आणि माहिती..
जून्या वास्तूंचे पुन्हा बांधकाम करणे, त्या खात्याच्या अखत्यारीत येत नाही. किंबहुना तशी प्रथा वा कौशल्य आपल्याकडे नाही. अनेक गडांवरचे सिमेंटचे ओबडधोबड बांधकाम कुणाच्या परवानगीने झाले, ते मात्र विचारायचे नाही.

दिनेशजी भारतीय पुरातत्व खात्याचे औरंगाबाद विभागाच्या mr. सलाहूद्दीन या अधिकार्‍यांनी आम्हास असे संगितले आहे की सदर वस्तूचे जुनयातले जुने फोटो संदर्भ म्हणून मिळाल्यास त्यावास्तूचे पुंनर्णिमान शक्य असते , जसे अजिंठ्याच्या सर्व लेण्यांचे छायाचित्रीकरण मेजर रॉबर्ट गिल यांनी करून ठेवल्यामुळे अजिंठ्यातील भग्न शिलपांचे काम एका सिन्थेटिक सीमेंट ने (ज्याचा look दगडासारखा असतो ) केले गेले आहे. ज्यामुळे त्यांना पूर्वीसारखे आखीव रेखीव रूप पुन्हा मिळते . तसेच इतर वस्तूंचेही शक्य आहे. ते फक्त करणे गरजेचे आहे.या मंदिराच्या पुनर्निर्माण प्रकृयेसाठी आमचे तेच प्रयत्न सुरू आहेत .

ज्ञानू,
तुम्हाला एक विनंती. लेखाचे शीर्षक 'हेमाडपंती' असे करणार काय? पंथी हा चुकीचा शब्द आहे. यादवांचे पंतप्रधान हेमाडपंत यांनी बांधविलेल्या या शैलीतील मंदीरांस हेमाडपंती मंदिरे असे म्हणतात. (आहे हे मंदिर ११७० साली बांधलेले आहे असे त्या पुरातत्व खात्यातील गृहस्थांनी सांगितले.)

बाकी हा प्रचि झब्बू.
z1.jpgz2.jpg

परवा मुद्दाम थांबलो अन पाहिले.
मंदिराच्या 'रिस्टोरेशन'चे काम सुरू आहे. तिथे असलेल्या गृहस्थांनी हे रिस्टोरेशन भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारित व त्यांच्याच प्रयत्नांनी सुरू आहे असे सांगितले. खखोदेजा.

पण, फोटोत दिसतो त्या टेंपोतून दगड उतरवले जात होते. बाजूला बसलेले पाथरवट चिरे घडवीत होते. सध्या ग्रॉस चौकोनी चिर्‍यांचे काम सुरू आहे.

नंदी कुणीतरी पूर्वीच सिमेंटने रिस्टोर करायचा प्रयत्न केला आहे. तो बघवत नाही.. म्हणून फोटो टाकलेला नाही.

Pages