शोध
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
4
इतकं कशाला झाकोळायला हवं
माझ्या नसण्याने?
मला शोध ना..
इथं, तिथं,
फुललेल्या रानफुलात,
कोमेजल्या निर्माल्यात.
दवानं भिजलेल्या रानात,
अंगार ओकणार्या वाळवंटात.
पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात,
कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही.
निळ्या मुक्त आकाशात,
अन् करड्या फांदीवरल्या
हळूच डोकावणार्या, बंदिस्त
चार काड्यांच्या घरट्यातही.
जन्म मृत्यूच्या उत्सवात,
आणि निराकार निर्गुणात.
वार्याच्या सळसळीत,
हवेच्या झुळुकीत,
जीवघेण्या वादळात,
नि:शब्द, नीरव शांततेत,
न सरत्या कोलाहलात.
हास्याच्या लकेरीत,
पापणीआडच्या पाण्यात.
पहा नीट एकदा,
कदाचित सापडेनही
तुझ्या मनाच्या एखाद्या,
खोलश्या कप्प्यात.
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त. "अवतीभवती असून दिसेना,
मस्त. "अवतीभवती असून दिसेना, शोधितोस आकाशी" आठवले!
धन्यवाद अमोल.
धन्यवाद अमोल.
खूप आवडली! मस्त!
खूप आवडली! मस्त!
सुंदर जमली कविता.
सुंदर जमली कविता.