माXXXद . . .
कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . .
" अबे माXXXद दिखता नही क्या ?? " एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे माXXXद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला माXXXद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . .
" कशाला आई घालायची रस्त्यात ? भिकारXट साला " . . माझ्या शेजारी कमनीय बांध्याच्या तरुणीसोबत फुकत थांबलेल्या कोण्या पोट्ट्याने आपली प्रतिक्रिया न मागता देऊन टाकली . हसायचे फिदी फिदी आवाज घुमत राहिले . तो माXXXद आता चेष्टेचा विषय झाला होता . काही वेळाने तो स्वतःच उठला . पिशवी हुडकू लागला . काळ्या रंगाची ती carry bag पुरती फाटली होती . आतील जिलेबी आणि बालुशाही रस्त्यावरच्या मातीत मिसळली होती . कोणासाठी घेतली असेल त्याने ? घरी दोन -चार डोळे त्याची वाट बघत असतील ? अनेक दिवस उरवून आणि पुरवून खाण्यासाठी बा काय आणतो याची वाट पहात असतील ? हो . . कदाचित . . तो बा मातीने माती पुसत होता . कळकट शर्टाच्या कोपऱ्याने जिलेबी -बालुशाही वर लागलेली माती पुसत होता . आपल्या नशिबाला दुषणे देत होता . कोपऱ्याला आणि गुढघ्याला झालेल्या जखमा विसरून मातकट अन्न गुंडाळायला नवा कोरा कागद हुडकत होता . एकटा … एकाकी … समाजाची नजर चुकवत पण हसण्याला कान देत ! कोण मदत करणार त्याला ? आपल्यावर संस्कार आहेत न ? ' रस्त्यावर पडलेले न उचलण्याचे ' ! कदाचित एखादा सुटातला साहेब किंवा लो वेस्ट मधली तरुणी पडली असती तर उचलायची इच्छा नक्कीच झाली असती . कारण त्यात मोह , स्टेट्स , संस्कार आणि कदाचित वासनाही असतात . याला उचलून काय साध्य होणार ? हा तर साला ' माXXXद ' आहे . . .
माXXXद . . कधीकाळी हा शब्द उच्चारला कि भांडणे व्हायची . . आपल्या आईचा भयंकर अपमान झाला आहे असे समजून दुध का कर्ज अदा व्हायचा पण आता तो काळ गेला . शब्द आणि अपशब्द यातील पडदा विकासाच्या आणि सुधारणेच्या नावाखाली आपणच फाडून काढला . आणि " बीप ' संस्कृतीचा उदय झाला . सध्या तरुणाईचे कार्यक्रम म्हणजे दर ४ शब्दानंतर बीप असे समीकरणच झाले आहे . आपण बडी ,डूड ,स्टड आणि जे काय असेल ते सिद्ध करण्यासाठी आपल्या तीर्थारुपांपासून ते अनोळखी व्यक्तीच्या मातुश्रीपर्यंत सर्वाना शाब्दिक अलंकार देणे हा आजचा ' ट्रेंड ' आहे . अंतरवस्त्रा पासून ते डोक्याला लावायच्या जेल ( तेल आता हद्दपार झाले न ) पर्यंत ब्रांड बघणारे आपल्या शब्दांचे स्टेट्स मात्र बघत नाहीत . बघायची त्यांना गरज वाटत नाही . संस्कार आणी नितीमत्ता हे शब्द आजी आजोबांसोबत वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजत आहेत .. मिळवलेला पैसा -प्रतिष्ठा आणी बुडाखालची गाडी शिव्या द्यायचे शिकवत नाही पण शिव्या हासडायचा माज आणि अधिकार मात्र देते . आपल्या मनासारखा न वागणारा , कोणत्याही गोष्टीत आपल्यापेक्षा कमी असणारा प्रत्येक जण 'मा , बे " इत्यादी असतो . . शिकवणारा शिक्षक असो वा बौद्धिक घेणारा मित्र -मैत्रीण हे सगळे 'चू ' असतात . . आणी यात वावगे काहीच नसते ! २४ म्हणजे "आमच्या " वेळी म्हणायचं वय नाही पण खरच आमच्या वेळी 'शिंच्या ' म्हणल्या वरही गालावर ५ बोटांच्या टेटू उठायचा आणी तो बरेच दिवस टीकायचा सुद्धा . . पण आता तसे होत नाही आणी होणार सुद्धा नाही . . कारण आई -वडील मुले यात मैत्रीचे नाते असते म्हणे . . आणी मैत्रीत मा ,बे ,भो ,चू हे शब्द हॉट फेवरीट असतात . . खर न ? कोणी कोणते शब्द वापरावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न पण कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . . छत्रपती शिवाजी महाराज , स्वातंत्र्यवीर सावरकर यानंतर भाषाशुद्धी ची मोहीम हाती घेतलीच पाहिजे . कारण आपली भाषा हा आपल्या संस्कारांचा ,संस्कृतीचा आणी स्वत्वाचा आरसा असतो असे माझे मत आहे . त्याची वेळीच शुद्धी झाली पाहिजे .
असे अनेक माXXXद आपल्या भोवती जगत ,वावरत असतात . प्रचंड विश्वात जग आणी जगात आपली जागा हुडकत असतात . त्यांना ती मिळालेली नसते म्हणून आपल्या तीर्थरूपाना किंवा आपल्याला मिळालेली असते . पण लक्षात कोण घेतो ? म्यानर्स हे केवळ पंचतारांकित हॉटेलात , मिटिंग टेबलावर किंवा हातात मद्याचे प्याले घेऊन हा हु करताना जपायचे असतात . . रस्त्यावर कोण पाहतो मला ? माझा खरा 'रंग ' या फडतूस लोकांना दाखवला तर काय बिघडणार आहे ? याच मनोवृत्तीने आपल्यासह अनेक रस्त्यावर उतरतात आणी शाब्दिक अत्याचार सुटतात आणी स्टेट्स च्या नावाखाली मिरवतात . मी त्या मादरचोद कडे पाहत होतो . . प्रतिष्ठीतव्यक्तीने आपल्यावर विनाकारण मारलेला शिक्का आपल्या अश्रुनी पुसत पुढे सरकत होता . . आपल्या घराकडे . . वाट पाहणाऱ्या पोरांना मळकट जिलेबी -बालुशाही घालण्यासाठी !! असे किती माXXXX तुम्हाला भेटले ?
-अंकुर रविकांत देशपांडे
http://spaandaan.blogspot.in/2013/04/blog-post_20.html
***PUBLISHED HERE WITH PRIOR PERMISSION OF THE AUTHOR.
बरेच पैलु आहेत १. कळतय पण वळत
बरेच पैलु आहेत
१. कळतय पण वळत नाही
२. आधीची पिढी ही दबुन होती, संस्कार, एकत्र कुटुंब पद्धती इ इ
३. भाषेचा प्रसार व्हाया इंटरनेट, सीडी, टिव्ही इ इ
४. Frustration काढण्याचे मार्ग बदलले
५. चांगले आणि वाइट यात ३६० डिग्री बदल झालाय
उदा पुस्तके वाचणारा झाला पुस्तकी किडा
निर्व्यसनी म्हणजे डाउनमार्केट
प्रेम झालय अफेअर
मंदिरात जाणारा झालय चमन
रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशीरा उठणं
थोडक्यात सगळ्या रुढ पद्धतींच्या विरोधात वागणं हे COOL आहे असं काहीसं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहुतेक मिडीया मधुन संस्कृतीचं पद्धतशीर अधःपतन जोरात चालु झालय
पोस्ट अवांतर वाटल्यास सांगा संपादित करेल.
चिखल्या, बरोबर, त्याशिवाय
चिखल्या, बरोबर, त्याशिवाय कसलेच निर्बन्ध कुणालाच नको आहेत, व्यक्तिस्वातन्त्र्याच्या नावाखाली, अनिर्बन्ध जगणे/वागणे/बोलणे हे नित्याचे झाले आहे. नैतिकता/अनैतिकता या पैलुची हेळसाण्ड झाली आहे, अन त्याचे हे परिणाम आहेत. मिडीया तर सर्वात जास्त कारणीभुत आहे.
अन म्हणूनच खैके पान बनारसवाला म्हणत रस्त्यावर पचापचा थुन्कणारा अमिताभ तेव्हाही प्रचण्ड खटकला होता, आजही खटकतोच, पण त्याचे अनुकरण करणारी दोनचार पिढ्यातरी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. मिडीया/सिनेमे/वृत्तपत्रे यान्ना भान आहे ते केवळ "अर्थकारणाचे". बाकि कशाचेही नाही. शिक्षकीपेशाबद्दल आदर राहिला नाही व कोणत्याही अभ्यासक्रमात शिस्तीचे/वागणूकीचे शिक्षण नाही. असो. कालाय तस्मै नमः
कालाय तस्मै नमः
कालाय तस्मै नमः
<< पोस्ट अवांतर वाटल्यास
<< पोस्ट अवांतर वाटल्यास सांगा संपादित करेल.>> अहो, असं सौजन्यशील ऐकण्याची संवय नाही राहिली कानाना आतां !
कालच टीव्हीवर सीमा देव यांच्याही मुलाखतींत त्यानी म्हटलं कीं केवळ मुलांच्याच नाही तर हल्लीं कांही मुलींच्याही तोंडची शिवराळ भाषा ऐकवत नाही. खरंच वर दिलेल्या ५ कारणांशिवाय आणखीही काय कारणं असावीत या नवीन 'फॅड'चीं ?
६. हातात खेळणारा पैसा....
६. हातात खेळणारा पैसा.... लहानवयात मिळालेल्या सर्वसुखसोयी (आई-वडिलंच्या जीवावर)
७. त्यामुळे आलेला माज....
८. अंधानुकरण...
९. पीरप्रेशर...
१०. निर्लज्जपणा....
११. समोर असलेले 'आदर्श'... नेते/अभिनेते इ इ
१२. पैसा, शिक्षण, गुणवत्ता
१२. पैसा, शिक्षण, गुणवत्ता असूनही असली भाषा तोंडी असणार्यांपुढे भल्याभल्याना नांगी टाकावीच लागते, हें सद्यपरिस्थितीने पाजलेलं बाळकडूच तर जबाबदार नाही ना याला ?
भाऊ, बरोबर आहे तुम्ही म्हणता
भाऊ, बरोबर आहे तुम्ही म्हणता आहे ते.
असूरी वृत्ती व तिचे व्यावहारिक "यश(?)" हे नविन पिढीला भुरळ पाडते अन कित्येकदा, अतिरेकी गुन्हेगारान्चे बाबतीत देखिल "तरी बघाना त्यान्चे धाडस कित्ती ते" अशा सारख्या अर्थाने अतिरेकाचे उद्दात्तीकरणही त्यान्चेसमोरच मान्डलेही जाते व पुन्हा पुन्हा टगेगिरीच्या/झुन्डशाहीच्या उद्दात्तीकरणाने तेच खरे, व तीच परम्परा केव्हा बनुन जाते कळतही नाही, तुम्ही आम्ही मात्र कालविसन्गत ठरत जातो.
भाषेच्या संस्कारांबद्दल सगळेच
भाषेच्या संस्कारांबद्दल सगळेच बोलता आहेत, पण त्या माणसाला किमान तो पडल्यानंतर उचलण्यासाठी कुणी गेलं का? हा सुद्धा संस्कारांचाच भाग येतो. ते जरी कुणी केलं तर अजून सगळं संपलं नाही म्हणायचं.
हर्षल तुम्हाला एक बरोबर.
हर्षल तुम्हाला एक बरोबर.
<< पण त्या माणसाला किमान तो
<< पण त्या माणसाला किमान तो पडल्यानंतर उचलण्यासाठी कुणी गेलं का? हा सुद्धा संस्कारांचाच भाग येतो. >> निदान मुंबईतल्या घिसाडघाईंतही हा संस्कार कांहीं अंशीं तरी अजूनही टीकून असावा अशी सुखद जाणीव अधुनमधून तरी होते .
लोक आपापली पातळी दाखवतात
लोक आपापली पातळी दाखवतात शिव्या घालून...पण आपण नाही लाऊन घ्यायचं मनावर. आणि प्रत्युत्तरही द्यायचे नाही....कारण,
-
-
-
-
आपली पातळी वरच्या थरावर आहे.