फोडणीचा भात -किती किती/कसे कसे प्रकार

Submitted by वर्षू. on 20 April, 2013 - 21:33

आदल्या रात्री पाहुणे येऊन गेले की दुसर्‍या दिवशी भात हमखास उरलेला असतो. जागरणाने आलेला थकवा अजून कायम असतो,अश्यावेळी वन मील डिश म्हणून ,' फोडणीचा भात' हा एकच पर्याय मला सुचतो Wink
काल ही असंच झालं.. पण नेहमी ची रेसिपी करण्याचा कंटाळा आला म्हणून काहीतरी वेरिएशन करावसं वाटलं
म्हणून भाता मधे मीठ,धन्याची पावडर्,तिखट नीट मिक्स करून घेतलं. जिरे,मोहरी,हिंग्,हळदी ची फोडणी करून शेंगदाणे घातले ते कुरकुरीत झाल्यावर,कढीपत्ता,कांदा अ‍ॅड केला. मग भात अ‍ॅड करून सर्व मसाला नीट मिक्स केला. गॅस बंद करून थोडा लिंबाचा रस आणी कोथिंबीर घातली..
खायला देताना वरून कुरकुरीत तळलेले पोहे स्प्रिंकल केले.. दह्यातल्या कोशिंबीरी बरोबर सर्व केले..
(पोहे तळल्यावर ते अगदी कोरडे व्हावे म्हणून लहान गाळणीत थोडे थोडे घेऊन तळले)

तुमच्याही जवळ फोडणी च्या भाताच्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.. मग मिक्स अ‍ॅण्ड मॅच करून त्यांमधून अजून ही कितीतरी हटके रेसिपीज तयार होतील..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाताची पेज कशी करतात ?
तांदूळ वेगळा असतो का?
>>>>

हो, पेजेला आमच्याकडे वेगळा तांदूळ वापरतात. मला यातले कळत नाही. घरी विचारावे लागेल. तरी ईथला कोणी जाणकार सांगेलच. स्पेशली कोकणातला Happy

मी पेज फक्त आजारातच पितो. लेक मात्र वरचेवर भाताचा ज्यूस म्हणत पिते. आजारपणात खायची ईच्छा नसल्यास उत्तम पदार्थ आहे हा..

Pages