ब्रेड पुडिंग

Submitted by मी नताशा on 18 April, 2013 - 02:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुध - २ कप
लोणी - २ चमचे
साखर - पाऊण वाटी
ब्रेड स्लाईस - २
अंडी - २

क्रमवार पाककृती: 

दूध गरम करून घेणे.
गरम दुधात लोणी आणि साखर mix करणे.
ब्रेडचे तुकडे करून त्यात घालणे.
दुसर्या भांड्यात अंडी चांगली फेटून घ्यावीत.
मावेमधे चालेल अश्या भांड्यात सर्व पदार्थ एकत्र करावे.
५ मिनिटे मावे करावे. मावे नसेल तर कुकरमधे ८-९ मिनिटे शिटी न लावता इडली सारखे वाफवावे

वाढणी/प्रमाण: 
२-३
माहितीचा स्रोत: 
मातोश्री
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन कप दुधात फक्त दोन ब्रेड स्लाइसेस? हे अगदी सॉफ्ट होतं का? >> मला वाटतं, अंड्यामुळे मिळून येतं / सेट होतं पुडिंग. २ अंडी आहेत ना पाकक्रुतीत.

ब्रेड पुडिंग आवडता प्रकार Happy

यात थोडी दालचिनी पावडर घालायची. किंवा वॅनिला इसेन्स. मस्त स्वाद येतो.

मला बेक केलेले ब्रेड अँड बटर पुडिंग आवडते. त्यात थोडे बेदाणे / ब्लु बेरीज वगैरे घालायचे. सोबत व्हिप्ड क्रिम किंवा आईस्क्रिम घेऊन गट्टम करायचे Wink

अवांतर प्रतिसाद (सॉरी अगदीच रहावलं नाही म्हणुन टाइप करतेय) : मला वर्षु तै चं सोप्पं पुडींग आठवलं.. या प्रकाराच्या वाट्याला मी तरी जाणार नाहीये Wink

कालच बनवलं....मस्त झालेलं....पण मी साहित्य तिप्पट घेउन बनवलं . ब्रेड च्या तुकड्यां ऐवजी ब्रेड क्रम्ब बनवुन वापरले....कुकर मधे शिजायला ४५ मिनिटे लागली.... सुंदर झाले.......

चिमुरी....... ब्रेड पुडिंग वरून माझी आठवण काढलीस... मेले हसून हसून
ठैर अब्बी के अब्बी.. (लौक्करच!! Wink ) सोप्पं कॅरेमल पुडिंग बनवून तुला वर्चुअली खिलवते...

स्वाती - साधारण खरवसासारखे होते.

हा प्रकार अंड्याशिवाय करता येतो का? - असावा कारण दिनेशदांनी वर तसे लिहिले आहे. मी कधी केले नाही.

चिमुरी - वर्षु तै चं सोप्पं पुडींग आठवलं >>> ह्या पेक्षा सोप्प?? Link please कारण मी फक्त सोप्प्या पदार्थांच्या वाट्याला जाते Proud

परत केल्यावर फोटो टाकेन Happy

प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे अभार

ह्या पेक्षा सोप्प?? Link please कारण मी फक्त सोप्प्या पदार्थांच्या वाट्याला जाते
>>> नताशाला कुणीतरी खरंच लिंक द्या आता...

हो नताशा,
नेहमीपेक्षा पातळ आणि नेहमीपेक्षा जास्त गोड कस्टर्ड ( कस्टर्ड पावडर वापरुन ) शिजवून त्यात ब्रेडचे तूकडे भिजवायचे आणि चांगले भिजले कि मायक्रोवेव्ह मधे २/३ मिनिटे शिजवायचे. परवाच केले होते.

दिनेशदा, हा प्रकार अंड्याशिवाय करण्याचे प्रमाण सांगता का प्लिज ?

दोन कप दूधात, एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर व २ टेबलस्पून साखर घालून शिजवले आणि त्यात आपल्या
आकारानुसार ४ ब्रेड स्लाईसेस भिजवल्या आणि ३ मिनिटे मावे मधे हाय वर बेक केले. ( मी होलमील ब्रेड वापरला )

वरती सजावटीसाठी ऑरेंज मार्मलेड आणि रसना काला खट्टा सरबताचे काही थेंब टाकलेत.