Submitted by मी नताशा on 18 April, 2013 - 02:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दुध - २ कप
लोणी - २ चमचे
साखर - पाऊण वाटी
ब्रेड स्लाईस - २
अंडी - २
क्रमवार पाककृती:
दूध गरम करून घेणे.
गरम दुधात लोणी आणि साखर mix करणे.
ब्रेडचे तुकडे करून त्यात घालणे.
दुसर्या भांड्यात अंडी चांगली फेटून घ्यावीत.
मावेमधे चालेल अश्या भांड्यात सर्व पदार्थ एकत्र करावे.
५ मिनिटे मावे करावे. मावे नसेल तर कुकरमधे ८-९ मिनिटे शिटी न लावता इडली सारखे वाफवावे
वाढणी/प्रमाण:
२-३
माहितीचा स्रोत:
मातोश्री
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आणि सोप्पं..... फोटो पण
मस्त आणि सोप्पं..... फोटो पण हवाच...
छान प्रकार. आमच्याकडे अर्थातच
छान प्रकार.
आमच्याकडे अर्थातच अंड्याशिवाय होतो !
दोन कप दुधात फक्त दोन ब्रेड
दोन कप दुधात फक्त दोन ब्रेड स्लाइसेस? हे अगदी सॉफ्ट होतं का?
हा प्रकार अंड्याशिवाय करता
हा प्रकार अंड्याशिवाय करता येतो का?
दोन कप दुधात फक्त दोन ब्रेड
दोन कप दुधात फक्त दोन ब्रेड स्लाइसेस? हे अगदी सॉफ्ट होतं का? >> मला वाटतं, अंड्यामुळे मिळून येतं / सेट होतं पुडिंग. २ अंडी आहेत ना पाकक्रुतीत.
Photo plzzz
Photo plzzz
बिना eggs चे please लिहा
बिना eggs चे please लिहा
छान रेसिपी. आवडता प्रकार.
छान रेसिपी. आवडता प्रकार.
ब्रेड पुडिंग आवडता प्रकार
ब्रेड पुडिंग आवडता प्रकार
यात थोडी दालचिनी पावडर घालायची. किंवा वॅनिला इसेन्स. मस्त स्वाद येतो.
मला बेक केलेले ब्रेड अँड बटर पुडिंग आवडते. त्यात थोडे बेदाणे / ब्लु बेरीज वगैरे घालायचे. सोबत व्हिप्ड क्रिम किंवा आईस्क्रिम घेऊन गट्टम करायचे
अवांतर प्रतिसाद (सॉरी अगदीच
अवांतर प्रतिसाद (सॉरी अगदीच रहावलं नाही म्हणुन टाइप करतेय) : मला वर्षु तै चं सोप्पं पुडींग आठवलं.. या प्रकाराच्या वाट्याला मी तरी जाणार नाहीये
कालच बनवलं....मस्त
कालच बनवलं....मस्त झालेलं....पण मी साहित्य तिप्पट घेउन बनवलं . ब्रेड च्या तुकड्यां ऐवजी ब्रेड क्रम्ब बनवुन वापरले....कुकर मधे शिजायला ४५ मिनिटे लागली.... सुंदर झाले.......
फोटो का नाही टाकला... !!!
फोटो का नाही टाकला... !!! recipe without photo.... सुनसुन वाटत ना..!!!
recipe chan...
चिमुरी....... ब्रेड पुडिंग
चिमुरी....... ब्रेड पुडिंग वरून माझी आठवण काढलीस... मेले हसून हसून
) सोप्पं कॅरेमल पुडिंग बनवून तुला वर्चुअली खिलवते...
ठैर अब्बी के अब्बी.. (लौक्करच!!
स्वाती - साधारण खरवसासारखे
स्वाती - साधारण खरवसासारखे होते.
हा प्रकार अंड्याशिवाय करता येतो का? - असावा कारण दिनेशदांनी वर तसे लिहिले आहे. मी कधी केले नाही.
चिमुरी - वर्षु तै चं सोप्पं पुडींग आठवलं >>> ह्या पेक्षा सोप्प?? Link please कारण मी फक्त सोप्प्या पदार्थांच्या वाट्याला जाते
परत केल्यावर फोटो टाकेन
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे अभार
मस्त. सुटसुटीत.
मस्त. सुटसुटीत.
ह्या पेक्षा सोप्प?? Link
ह्या पेक्षा सोप्प?? Link please कारण मी फक्त सोप्प्या पदार्थांच्या वाट्याला जाते
>>> नताशाला कुणीतरी खरंच लिंक द्या आता...
सोप्प कॅरॅमल पुडिंग
सोप्प कॅरॅमल पुडिंग
धन्यवाद भरत. खरेच सोप्पे आहे.
धन्यवाद भरत. खरेच सोप्पे आहे. करून बघण्यात येईल
मी नताशा, धन्यवाद. माझी
मी नताशा, धन्यवाद.

माझी सोप्पी रेसिपी इथे आहे.
हो नताशा, नेहमीपेक्षा पातळ
हो नताशा,
नेहमीपेक्षा पातळ आणि नेहमीपेक्षा जास्त गोड कस्टर्ड ( कस्टर्ड पावडर वापरुन ) शिजवून त्यात ब्रेडचे तूकडे भिजवायचे आणि चांगले भिजले कि मायक्रोवेव्ह मधे २/३ मिनिटे शिजवायचे. परवाच केले होते.
दिनेशदा, हा प्रकार
दिनेशदा, हा प्रकार अंड्याशिवाय करण्याचे प्रमाण सांगता का प्लिज ?
छान रेसिपी
छान रेसिपी
दोन कप दूधात, एक टेबलस्पून
दोन कप दूधात, एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर व २ टेबलस्पून साखर घालून शिजवले आणि त्यात आपल्या
आकारानुसार ४ ब्रेड स्लाईसेस भिजवल्या आणि ३ मिनिटे मावे मधे हाय वर बेक केले. ( मी होलमील ब्रेड वापरला )
वरती सजावटीसाठी ऑरेंज मार्मलेड आणि रसना काला खट्टा सरबताचे काही थेंब टाकलेत.