लेह लडाख - २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट

Submitted by जिप्सी on 17 April, 2013 - 01:27


(फोटो साभार - मार्को पोलो (चंदन))

"पुन्हा ढग दाटुन येतात....पुन्हा आठवणी जाग्या होतात" या प्रमाणेच "पुन्हा मार्च-एप्रिल येतो आणि पुन्हा लेहवारीचा प्लान सुरु होतो". Happy गेल्या वर्षीचा बेत फिसकटल्याने या वर्षी लेह वारी फत्ते करायचीच असे ठरले. त्याप्रमाणे बेत ठरला. मायबोलीकर इंद्रधनुष्य, गिरीविहार, मी आणि माझा एक मित्र तयार झालो आहे.

प्लान खालील प्रमाणे:
दिनांकः २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट (१० दिवस - ९ ऑगस्ट बँक हॉलीडे आहे)
(टिपः शनिवार/रविवार ज्यांना सुट्टी असते त्यांना फक्त ५ दिवसाचीच रजा घ्यावी लागेल. Happy )

२ ऑगस्ट - मुंबई ते श्रीनगर (विमान प्रवास, वेळ २ तास १५ मि. ). दल लेक आणि आसपार परीसर फिरणे. श्रीनगर मुक्काम.
३ ऑगस्ट - श्रीनगर-सोनमर्ग-द्रास-कारगिल. (कारगिल मुक्काम)
४ ऑगस्ट - कारगिल-लेह (लेह मुक्काम)
५ ते ८ ऑगस्ट - लेह आणि परीसर (मोनॅस्ट्रीस, पँगाँग लेक, नुब्रा, खार्दुंग ला इ. इ.)
९ ऑगस्ट - लेह ते सार्चु (सार्चु मुक्काम)
१० ऑगस्ट - सार्चु ते मनाली (मनाली मुक्काम)
११ ऑगस्ट - मनाली ते चंदिगड
११ ऑगस्ट - चंदिगड ते मुंबई विमान प्रवास (चंदिगडहुन संध्याकाळी ७वाजता आणि रात्रौ ९:१५ मुंबई).

सध्याचे पॅकेज - श्रीनगर - लेह - सार्चु - मनाली - चंदिगड

Tour Cost
Price Per Person (including all taxes) - Standard
Based on 08 Pax - Rs: 24, 800/-
Based on 10 Pax - Rs: 22, 700/-
Based on 12 Pax - Rs: 20, 850/-

If we book the package on 04 Paying pax, will get the special rates as INR: 29, 100/- per person Nett. And if we book the package on 06 Paying pax, will get the special rates as INR: 24, 500/- per person Nett.

The above package does not include Mumbai to Srinagar and Chandigad to Mumbai Air Fares. (सध्या या दोन्हीकडचे एअर फेअर ८,१०७/- आहे).

एकुण खर्च (6 Pax) अंदाजे ३२हजार पर्यंत आहे. Happy सध्या ४ जण कन्फर्म आहोत (एअर तिकिट्स बूक झाल्यात).

अजुन कुणी इच्छुक असेल तर इंद्रधनुष्य, गिरीविहार किंवा माझ्याशी त्वरीत संपर्क साधावा. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मंजे, तुला माहित नाही ह्या लोकांनी फोटोंच्या नादात १७-१८ हजार फुटांवर उगीच वेळ वाया घालवुन माझे डोके किती दुखवले ते.......

पण ते साहजिकच नाही का? Happy
एवढ्या हौशी आणि कसलेल्या फोटोग्राफरांबरोबर गेल्यावर अजून काय होणार?
ते फोटोग्राफीच्याच नजरेने ट्रिपकडे बघणार यात चुकीचं काय ते..

२९ ऑगस्ट ते ११/१२ सप्टेंबर २०१४ लडाख वारी. कोण येतय का? बाकी सगळ्या सोबत पँगाँगला राहाणे आणि त्सो मोरिरीला जाणे सुद्धा करणार आहोत. लक्झिरियस टूर असेल. मोठा ग्रूप जमला तर खर्च कमी होईल, आता तरी खर्चाचा अंदाज श्रीनगर ते लेह असा ३२००० कॅल्क्युलेट केला आहे,

Pages