(फोटो साभार - मार्को पोलो (चंदन))
"पुन्हा ढग दाटुन येतात....पुन्हा आठवणी जाग्या होतात" या प्रमाणेच "पुन्हा मार्च-एप्रिल येतो आणि पुन्हा लेहवारीचा प्लान सुरु होतो". गेल्या वर्षीचा बेत फिसकटल्याने या वर्षी लेह वारी फत्ते करायचीच असे ठरले. त्याप्रमाणे बेत ठरला. मायबोलीकर इंद्रधनुष्य, गिरीविहार, मी आणि माझा एक मित्र तयार झालो आहे.
प्लान खालील प्रमाणे:
दिनांकः २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट (१० दिवस - ९ ऑगस्ट बँक हॉलीडे आहे)
(टिपः शनिवार/रविवार ज्यांना सुट्टी असते त्यांना फक्त ५ दिवसाचीच रजा घ्यावी लागेल. )
२ ऑगस्ट - मुंबई ते श्रीनगर (विमान प्रवास, वेळ २ तास १५ मि. ). दल लेक आणि आसपार परीसर फिरणे. श्रीनगर मुक्काम.
३ ऑगस्ट - श्रीनगर-सोनमर्ग-द्रास-कारगिल. (कारगिल मुक्काम)
४ ऑगस्ट - कारगिल-लेह (लेह मुक्काम)
५ ते ८ ऑगस्ट - लेह आणि परीसर (मोनॅस्ट्रीस, पँगाँग लेक, नुब्रा, खार्दुंग ला इ. इ.)
९ ऑगस्ट - लेह ते सार्चु (सार्चु मुक्काम)
१० ऑगस्ट - सार्चु ते मनाली (मनाली मुक्काम)
११ ऑगस्ट - मनाली ते चंदिगड
११ ऑगस्ट - चंदिगड ते मुंबई विमान प्रवास (चंदिगडहुन संध्याकाळी ७वाजता आणि रात्रौ ९:१५ मुंबई).
सध्याचे पॅकेज - श्रीनगर - लेह - सार्चु - मनाली - चंदिगड
Tour Cost
Price Per Person (including all taxes) - Standard
Based on 08 Pax - Rs: 24, 800/-
Based on 10 Pax - Rs: 22, 700/-
Based on 12 Pax - Rs: 20, 850/-
If we book the package on 04 Paying pax, will get the special rates as INR: 29, 100/- per person Nett. And if we book the package on 06 Paying pax, will get the special rates as INR: 24, 500/- per person Nett.
The above package does not include Mumbai to Srinagar and Chandigad to Mumbai Air Fares. (सध्या या दोन्हीकडचे एअर फेअर ८,१०७/- आहे).
एकुण खर्च (6 Pax) अंदाजे ३२हजार पर्यंत आहे. सध्या ४ जण कन्फर्म आहोत (एअर तिकिट्स बूक झाल्यात).
अजुन कुणी इच्छुक असेल तर इंद्रधनुष्य, गिरीविहार किंवा माझ्याशी त्वरीत संपर्क साधावा.
मी येणार अर्थात सुट्टी
मी येणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात सुट्टी मिळाली तर इतके दिवस![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ऊदयन +1
ऊदयन +1
सहीच, शुभेच्छा !!!!
सहीच, शुभेच्छा !!!!
आहा, २ ऑगस्टसाठी काऊंटडाऊन
आहा, २ ऑगस्टसाठी काऊंटडाऊन सुरू..
आमची तर मज्जाच मज्जा. फोटो काढायला आयते दोन दोन एक्स्पर्ट फोटोग्राफर्स सोबत आहेत, आम्ही फक्त निसर्ग पाहणार आणि आल्यावर त्यांचे फोटो आमचेच म्हणुन मिरवणार..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा, वा!!!! झाला का नक्की. छान
वा, वा!!!! झाला का नक्की. छान भटकून या पोरांनो. शुभेच्छा.
प्रचि अतिशय सुरेख आहे.
५ ते ८ ऑगस्ट - लेह आणि परीसर
५ ते ८ ऑगस्ट - लेह आणि परीसर (मोनॅस्ट्रीस, पँगाँग लेक, नुब्रा, खार्दुंग ला इ. इ. >>
खूप कमी दिवस आहेत. प्लान असा कर.
५ ऑगस्ट - उंचावर गेल्यावर acclimatize होण्यासाठीचा दिवस. ह्यात परमिटस आणि शांती स्तूप, लेह पॅलेस इत्या.
६ ऑगस्ट - लेह ते हंडर (नुब्रा व्हॅली) - व्हाया के टॉप
७ ऑगस्ट - हंडर ते पनामिक ( Turtuk - Hunder - Sumur - Panamik - Sumur) अतिशय सुंदर परिसर
८ ऑगस्ट - पनामिक (सुमूर) ते Pangong Tso ( लेहला न येता व्हाया वारीला मार्ग वापर) शायोक मार्ग खूप खराब आहे.
९ ऑगस्ट - Pangong Tso te Tso Moriri ( 12 तास ड्राईव्ह चौसाल किंवा चुमथांग मार्गाचा वापर)
१० ऑगस्ट - Tso Moriri ते पांग
११ ऑगस्ट - पांग - ते मनाली.
तुमाच्य प्लान मध्ये हानले नाही आणि त्सो मोरिरी नाही. नॉट गुड. - वरच्या प्लान मध्ये मी त्सो मोरिरी टाकले आहे. हानले हवे असल्यास अजून एक दिवस अॅड कर.
कुठल्याही टूरचे पॅकेज घेऊ नको. हे मार्ग, कुठुन कसे जायचे, किती किमी इ इ मी ऑलमोस्ट कोळून प्यालो आहे. तुमच्या साठी त्या टूर ऑपरेटर पेक्षा नीट प्लान आखता येईल. तुम्ही विमानाने जा. व तिथे टॅ़क्सी हायर करा. किंवा बेटर यट इथून गाडी घेऊन जा.बायदवे लेहला जाऊन तुम्ही बाईक रेंट करू शकता. लेह टू लेह. मग त्सो मोरिरी पासून वापस लेह. एक दिवस आणि लेह मनाली परत टॅक्सी किंवा लेह ते दिल्ली विमान ( अगदीच दिवस वाचवायचे असतील तर)
वॉव! मज्जा करा! खूप दिवस हे
वॉव! मज्जा करा! खूप दिवस हे लेह लडाखचं मनात आहे.........................................................................................................................................................................................................................................................
माबोकर्स निघाले लेह-लडाखला
माबोकर्स निघाले लेह-लडाखला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोक्स, ६ सीट्स बूक झाल्या.
(जिप्सी, इंद्रा, गिरी, संदीप, साधना & झरबेरा)
धन्यवाद साधना ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात सुट्टी मिळाली तर इतके दिवस>>>>उदय, अजुन ४ महिने आहेत. सध्याच्या सुट्ट्या वाचव.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धन्यवाद केदार, अधिक माहितीबद्दल. नक्कीच विचार करू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उदय, अजुन ४ महिने आहेत.
उदय, अजुन ४ महिने आहेत. सध्याच्या सुट्ट्या वाचव.<<<<<<<< मला सुट्ट्याच नसतात रे...वाचवणार काय ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माझा भाऊ आणि वहिनी पण
माझा भाऊ आणि वहिनी पण त्यांच्या जून्या ग्रुपतर्फे त्याच दरम्यान जाणार आहेत. तूला फोन नंबर कळवू का ?
तारखा त्याच असाव्यात.
हो दिनेशदा, चालेल
हो दिनेशदा, चालेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मागच्या वर्षी सेम प्लॅनने टूर
मागच्या वर्षी सेम प्लॅनने टूर केला. श्रीनगरला मुगल दरबारमध्ये नक्की जेवा. शिकार्यात बसणार असाल तर दर काळजीपूर्वक ठरवा. लेहमध्ये खरेदीला खूप वाव आहे. पेन्गॉंग लेकला मुक्काम जरूर करा. स्वतः टूर केला तर स्वस्तात होतं. आम्ही लेह ते मनाली एचपी टूरिझमची बस घेतली भाडे २०००/- जेवण व राहण्यासहित. बफर टाईम ठेवा. रोहतांग पासला ७ तास अड्कून पडलो होतो.शुभेच्छा!
वहिनीचा नंबर एस एम एस केलाय
वहिनीचा नंबर एस एम एस केलाय तूला. तिला पण केलाय, तू फोन करशील असा !
मी पण यायचे
मी पण यायचे ठरवतो........लवकरच फोन करतो....जिप्सी किंवा इंद्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला पण यायचंय...भॅ भॅ!!!
मला पण यायचंय...भॅ भॅ!!!
निषेध.. निषेध.. निषेध
निषेध.. निषेध.. निषेध![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेह लडख ला जाणार्यांनो मस्त
लेह लडख ला जाणार्यांनो मस्त मजा करा पण आल्यावर फोटो आणी व्रूत्तांत नक्की पोस्ट करा.
मला यायचेय पण.....
मला यायचेय पण.....
जल्ला इथं पण काळीज करपला ! ए
जल्ला इथं पण काळीज करपला !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ए रो.मा.. त्रिवार निषेध करुन कायेक्क फायदा नाय.. आपण नेक्स्टाईम त्या केदारलाच घेउन जाउया.. आणि २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या निसर्गमय कालावधीमध्ये बेस्ट ऑफ सह्याद्री उरकून घेउया..
आणि २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या
आणि २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या निसर्गमय कालावधीमध्ये बेस्ट ऑफ सह्याद्री उरकून घेउया.>>>>आता रोमा कसला येतोय ६ महिने तरी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
येनार.....नक्की
येनार.....नक्की येनार...........
चालेल यो
चालेल यो
वॉव.. मस्त होणारे ट्रिप..
वॉव.. मस्त होणारे ट्रिप.. लेह लडाख बघण्याचे माझे स्वप्न आता तुम्ही लोक्सच पुर्ण कराल ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेस्ट विशेज ऑल्वेज!!!!
अरे वा मायबोलीकरांची एकत्र
अरे वा मायबोलीकरांची एकत्र सहल का, सहीच, मागे रैना शैलजा स्वाती गेल्या होत्या आता तुम्ही. ट्रीपला शुभेच्छा. आल्यावर वृत्तांत नक्की लिहा.
जल्ला इथं पण काळीज करपला !>>
जल्ला इथं पण काळीज करपला !>> + 100
मजा करा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव्व! जा जा मजा करा, आमचे
वॉव्व! जा जा मजा करा, आमचे आशीर्वाद आहेत तुमच्यापाठी!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आमची गोची झाली ना राव. मला
आमची गोची झाली ना राव. मला लेह-लडाख बाईक ने फिरायचे होते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आत्ता तर सुट्ट्या पण नाहीत. या सफरीवर जाणार्या समस्त माबोकरांना हार्दिक शुभेच्छा!
जिप्सी, वयाची अट आहे का या
जिप्सी, वयाची अट आहे का या ट्रीपला?फिट असलेले सिनीयर सिटीझन आले तर चालेल का?
जिप्स्या तुम्ही ११ ला येणार
जिप्स्या तुम्ही ११ ला येणार ... मी आणि मधुरा ११ ला निघणार ... २० ला परत येणार ...
चलो लेह लडाख ....
जल्ला इथं पण काळीज करपला !>>
जल्ला इथं पण काळीज करपला !>> + १००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा करा. आल्यावर वृत्तांत आणि फोटो टाक म्हणजे आमचीपण सहल विनासायास होईल
Pages