Submitted by कर्दनकाळ on 12 April, 2013 - 13:09
मी बोललो काही जरी, होतात का ही भांडणे?
कोणासवे आलीच ना करता मला संभाषणे!
होतो अमावस्याच मी! तू भेटण्यापूर्वी मला;
वाट्यास आता रोज येते पौर्णिमेचे चांदणे!
जे व्हायचे ते जाहले, इतिहास झाला एक तो.....
मी शोधतो आहे उगाचच कारणांची कारणे!
मी एक आहे तार हृदयाच्या सतारीची तुझ्या......
स्पंदन तुझे पण त्यात माझे चालले झंकारणे!
या माणसांमध्ये, पशूंमध्ये फरक ना राहिला!
कोणी पहातो गुरगुरोनी, तर कुणाचे भुंकणे!!
या पर्वतांच्या या नद्यांच्या कोण सीमा आखतो?
या सागराला, या नभाला तोच घाली कुंपणे!
******कर्दनकाळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू बोलली काही जरी, फुलतात का
तू बोलली काही जरी, फुलतात का सुमनांगणे?
माझ्यासवे माझी कधी, नाही घडे संभाषणे!
होतो अमावस्या जरी ! तू भेटण्यापूर्वी मला;
ओटीत आता रोज येते पौर्णिमेचे चांदणे!
हे दोन शेर असे लिहीले तर ? पर्यायी नाहीत.
छान! आम्ही तुमचे खयाल असे
छान!
आम्ही तुमचे खयाल असे वाचले...............
मौनामुळेही बघ तुझ्या फुलतात ही सुमनांगणे!
माझ्यासवेही खुद्द माझी होत ना संभाषणे!!
होतो अमावस्या जरी, तू भेटण्यापूर्वी मला;
हिश्श्यास आता रोज येते पौर्णिमेचे चांदणे!
छान
छान
मी असे वाचले ........ मी
मी असे वाचले ........
मी बोलतो काहीतरी होतात म्हणुनी भांडणे
मुद्दा धरुन् नाही मला जमली कधी संभाषणे
होतो अमावास्याच मी हुसकवण्यापूर्वी मला
मी चंद्र !... जो स्वप्नात बघतो पौर्णिमेचे चांदणे
जे व्हायचे ते जाहले, इतिहास झाला एक तो.....
मी शोधतो आहे नव्या डू-आयड्यांची कारणे!
प्लीज नोट द्याट ..... हे पर्यायी नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैवकु, तुझ्या व्यक्तिमत्वाला
वैवकु,
तुझ्या व्यक्तिमत्वाला साजेसे शेर आहेत, तू दिलेले! अभिनंदन!
>>प्लीज नोट द्याट ..... हे
>>प्लीज नोट द्याट ..... हे पर्यायी नाहीत<<
>>वैवकु,
तुझ्या व्यक्तिमत्वाला साजेसे शेर आहेत, तू दिलेले! अभिनंदन!<<
वैवकु,
"जो म्हणतो तोच असतो"....
हा पर्यायी प्रतिसाद कसा वाटतो??
बहुत अच्छे, मिया!
बहुत अच्छे, मिया!
मुद्याला सोडून बोलतोस व
मुद्याला सोडून बोलतोस व मुद्देसूद बोलल्याचे सोंग घेतोस काय?