Submitted by विजय दिनकर पाटील on 5 April, 2013 - 05:42
ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहौत खूब.....!!!
बहौत खूब.....!!!
व्वा. सुंदर गझल. फार आवडली.
व्वा. सुंदर गझल.
फार आवडली.
वाह... सगळेच शेर छान....
वाह... सगळेच शेर छान.... शेवटच्या शेराने मजा आणली.
दुहीने फ़ार काही साधले
दुहीने फ़ार काही साधले नाही
चला राहून पाहूयात एकीने
निराळी वाट दोघांच्या पसंतीची
नशीबी चालणे एकाच ओढीने
सुरू झालीय लाही पृष्ठभागावर
उन्हाळा वाढतो आहे तळाशी ने
<<<
सुंदर शेर! गझल आवडली.
(गझलचर्चा या धाग्यावर इतर मते नोंदवेन)
धन्यवाद
सुंदर गझल.... खास 'कणखर' पण
सुंदर गझल....
खास 'कणखर' पण मृदु गझल
नदी आणि लाही हे शेर आवडले!!
नदी आणि लाही हे शेर आवडले!!
तिलकधारी आला आहे. दुहीने
तिलकधारी आला आहे.
दुहीने फ़ार काही साधले नाही
चला राहून पाहूयात एकीने - सुंदर शेर आहे. असे शेर गझलेला खुलवतात, गझलप्रवासात असे शेर महत्वाचे ठरतात, अनुकरणीय विचारधारा ठरते, शायराची अशी मानसिकता सकस गझललेखनास आवश्यक असते.
तिलकधारी निघत आहे.
लगोरी हा काय प्रकार
लगोरी हा काय प्रकार आहे?
सांगाल काय?
तुम्हाला गोफन म्हणायचे काय? कारण लगोरी हा खेळाचा प्रकार आहे एवढे मला माहीत आहे.
बंडो पंतांचाच मुद्दा
बंडो पंतांचाच मुद्दा गझलचर्चेवर घेणार होतो (शिवाय आणखी एक मुद्दा होता) - माझेही हेच म्हणणे आहे. गोफण , गलोल अशी नावे माहीत आहेत, लगोरी हा एक खेळ म्हणून माहीत होता. लगोरीचा तसाही अर्थ असल्यास कल्पना नाही.
धन्यवाद.
खरेतर या जमीनीत गलोलीने असाही
खरेतर या जमीनीत गलोलीने असाही काफिया चालेलच म्हणा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे अनेक आभार! लगोरी हा
सर्वांचे अनेक आभार!
लगोरी हा माझ्या गावाकडे वापरला जाणारा शब्द आहे. कदाचित तो 'गलोल' चा रूढ झालेला अपभ्रंश असावा, नक्की माहीत नाही.
गोफण आणि लगोरी ह्यांच्या रचनेमधे फरक असतो. तो स्पष्ट करतो म्हणजे मला जे म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल. ग्रामीण भाषेतून जडणघडण झालेली असल्यामुळे हा शब्द सहज वापरलेला आहे.
१. गोफणीचे एक टोक एका हातात धरून दुसर्या बाजूला असलेल्या चामडी खोळीत गोटा ठेऊन तिला स्वतःभोवती वेगाने फिरवून एक हिसडा देऊन दगड सोडायचा असतो.
२. लगोरीमधे एक इंग्रजी 'वाय'(Y) आकाराचे छोटे लाकूड असते त्याच्या दोन्ही तिरप्या काठ्यांना रबरी पट्टी लावलेली असते आणि त्या पट्टीच्या मधे चामडी खोळ असते किंवा नसते. गोटा मध्यभागी धरून रबर मागे ओढून(प्रत्यंचा ओढल्यासारखे), नेम धरून दगड सोडायचा असतो. काही ठिकाणी ह्याला बेचकी म्हणत असावेत का अशी शंका आहे.
माझ्या गावाकडे हा दुसरा प्रकार पाखरांना हुसकावण्यासाठी सर्रास वापरला जातो त्या अनुषंगाने लगोरी ह्या शब्दाचाच वापर केलेला आहे.
समजले विदिपा, मला असे वाटत
समजले विदिपा, मला असे वाटत होतेच की तो शब्द कोठेतरी रूढ असावा. (वर तसे म्हंटलेही आहे मी)
कणखरजींची वेगळ्याच शैलीतली
कणखरजींची वेगळ्याच शैलीतली गझल वाटली
खूप खूप आवडलीए
लगोरीबद्दल माझीही हीच माहीती होती पण मला तो शेर अर्थ लावल्यावर फरसा भावला नाही
नेमके काय म्हणायचे ते समजते आहे फारसे काही सांगून होते आहे असे वाटत नाही आही एकूण सब्स्टन्स कमी आहे असे वाटले
बाकीचे शेर भ न्ना ट !!!
Y ला गुल्लेर म्हणतात ! लगोरी
Y ला गुल्लेर म्हणतात ! लगोरी नाही म्हणत ईकडे
नदी आणि दुही सर्वात आवडले.
नदी आणि दुही सर्वात आवडले.
बेचकी,वादी,गलोल्,गुल्लेर्,गुल
बेचकी,वादी,गलोल्,गुल्लेर्,गुल्लेल या सोबत बर्याच ठिकाणी लगोरी असेही म्हणतात......
सगळे शेर चांगले झाले आहेत कणखरजी. मस्त गझल.
अप्रतिम व लावण्यवती गझल!
अप्रतिम व लावण्यवती गझल! अभिनंदन, विजयराव!
या गझलेच्या अंतरंगातील ताकद जबरदस्त आहे!
शेरांमधील अर्थांची व्यामिश्रता लक्षवेधी आहे!
टीप: मतल्यातील लगोरीने शब्द खटकला! कारणे इतरांनी दिली आहेतच!
कृपया तसा शब्द कुठे मुद्रित असल्यास संदर्भ द्यावा म्हणजे आम्हालाही तो वापरता येईल! साधारणपणे सर्वश्रुत, रूढ शब्द गझलेत असावेत असे वाटून गेले!
आपला मतला व शेवटचा शेर खालीलप्रमाणे वाचून पाहिले...........
कृपया त्यांना पर्यायी म्हणून बघू नयेत! केवळ, निखळ साहित्यिक विचारमंथनासाठी आम्ही ते देत आहोत! गैरसमज नसावा.
विजयराव आपली प्रांजळ मते ऐकायला/वाचायला आवडतील!
शेर खालीलप्रमाणे.........
कुठे हो साधले काही गिलोरीने?
करा शेतामधे राखण कसोशीने!
उन्हाची काहिली ही पृष्ठभागावर.....
मला काही करोनी तू तळाशी ने!
समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
.............गझलप्रेमी
सर्वांचे मनःपूर्वक
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
गझलप्रेमी आपल्या दोन शेरांवर थोड्या वेळाने 'कर्दनकाळ' ह्यांच्या विपूत लिहीतो, धन्यवाद!
दुहीने फ़ार काही साधले
दुहीने फ़ार काही साधले नाही
चला राहून पाहूयात एकीने
.
निराळी वाट दोघांच्या पसंतीची
नशीबी चालणे एकाच ओढीने
.
सुरू झालीय लाही पृष्ठभागावर
उन्हाळा वाढतो आहे तळाशी ने
सुरेख.
धन्यवाद मुटेसाहेब.
धन्यवाद मुटेसाहेब.
कसा अंदाज बांधू सांग
कसा अंदाज बांधू सांग खोलीचा
नदी आच्छादलेली पाणवेलीने...भन्नाटच
शेवटचे दोन्ही आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर, खूप आवडली. शेवट महा
सुंदर, खूप आवडली. शेवट महा भन्नाट.
सुप्रिया व अमेय आपले आभार!
सुप्रिया व अमेय
आपले आभार!