Submitted by विस्मया on 4 April, 2013 - 14:45
बा बाफ चर्चेसाठी राखून ठेवत आहे. इथली रचना कविता विभागात हलवत आहे. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
इच्छा न राहण्याची, शहरात या
इच्छा न राहण्याची, शहरात या तुझ्या रे
दमले इथे चमकत्या, ता-यांत चालताना
व्वा. शेर आवडला.
काही ओळीही सहज आल्यात: वाहून आज आले, चिंता पुन्हा पुन्हांदा
अवांतरः चमकत्या , ता-यांत ऐवजी चमकत्या ता-यांत हवेय.
धन्यवाद सर. सूचना आवडली. माझी
धन्यवाद सर.
सूचना आवडली. माझी अडचण अशी आहे कि गाताना चमकत्या या शब्दानंतर यती येतोय. म्हणून स्वल्पविराम दिला होता. आता अर्थपूर्ण होत असेल अशी आशा आहे.
विस्मया ...ग्रेट...
विस्मया ...ग्रेट...:)
सुंदर..
सुंदर..
छान
छान
आवडली.
आवडली.
वाह वाह! एक असं कडवं (शेर जे
वाह वाह!
एक असं कडवं (शेर जे हवं ते म्हणा) कोट करता येत नाहीये
खुप सुंदर
सुंदर !
सुंदर !
तिलकधारी आला आहे. वाटा
तिलकधारी आला आहे.
वाटा जुन्या अताशा, झाल्यात चालताना - मिसरा खूब.
टाळून चालले मी, या आरशास येथे
टाळू कशी कुणाला, गावात चालताना - खयाल अच्छा है.
भरीचे शब्द टाळण्याकडे कल हवा. नचिकेत यात्रीच्या गझला वाच, खयालांचा 'थेटपणा' ही त्याच्या गझलेची मोठी प्लस साईड असते..
तिलकधारी निघत आहे.
टाळून चालले मी, या आरशास
टाळून चालले मी, या आरशास येथे
टाळू कशी कुणाला, गावात चालताना
क्लास
सुर्रेखच.
सुर्रेखच.
एक गृहस्थ आहेत. लोकसत्ता मधे
एक गृहस्थ आहेत. लोकसत्ता मधे त्यांचं गझलियत नावाचं सदर प्रकाशित होत होतं २०१० साली. मायबोलीवर किंवा एकंदरच इंटरनेटवर ते दिसत नाहीत. तरी पण त्यांचा एक पॅरा इथं देतो.
>>>>>>
शमा-परवाना..
.
एक छानसं स्टेटमेंट सुरुवातीलाच वाचल्याचं लक्षात असेल, की ग़ज़्ालचा शेर स्वत:चा अर्थ कधी सांगत नाही तर अर्थाची दिशा दाखवतो.. वगैरे.. हे खरेच आहे; परंतु अर्थाचा हा एकदिशा मार्ग नेहमी थेट-सरळच असतो असे नाही.. कधी कधी जाम वाकडा-तिकडा असतो आणि अर्थापर्यंत पोहोचता-पोहचता आपण चक्रावून जातो.. अर्थ गवसल्यावर मात्र खूप मजा येते.. आता हेच बघा ना..
.
मगज़्ा को बाग में हरगिज़्ा न जाने दो
कि नाहक खून परवानों का होगा..
.
परवान्याचा.. पतंगाचा जीव वाचवायचा असेल तर मधमाशीला अजिबात बागेत जाऊ देऊ नका.. मधमाशी.., बाग.., परवाना.., खून.. काय संबंध..? कशी लावायची संगती? ..काय अर्थ काढायचा..?
खुलासा असा आहे की- मधमाशी (मगज़्ा) बागेत जाईल.. बागेतील फुलाफुलांमधून परागकण वेचेल.. परागकण घेऊन ती पोळं बनवेल.. पोळ्यात मध जमा होईल.. पोळं काढलं जाईल.. त्यापासून मेण..
आणि- मेणापासून मेणबत्ती (शमा) बनवली जाईल.. शमा प्रज्वलित होईल..
दोघांच्या भेटीचा हा अलिखित संकेत आहे.. शमेच्या त्या तेजस्वी रुपावर आशिक होऊन पतंगा तिच्याकडे झेपावेल..आणि प्राण देईल.. मृत्यूला कवटाळेल..
.<<<<<<<
- भीमराव पांचाळे
गागा लगा लगागा.... छानच वृत्त
गागा लगा लगागा.... छानच वृत्त आहे. या वृत्तात कुठलीही द्विपदी लिहिली तरी गझलेच्या शेराची झळाळी प्राप्त होते.
अशी ( आणि अजुन कशीही) वाचली तरी चालेल.
वाटा नव्या निघाव्या, रस्त्यात चालताना
टाळू कशी कुणाला, गावात चालताना
इच्छा न राहण्याची, शहरात या तुझ्या रे
वाटा जुन्या अताशा, झाल्यात चालताना
टाळून चालले मी, या आरशास येथे
भय वाटते तुला या, ज्वाळांत चालताना
वाहून आज आले, चिंता पुन्हा पुन्हांदा
निर्धार फक्त होता, भानात चालताना
सांगू कशी समोरी, त्या वादळास गेले
स्मरले कधी तुला ना, रानात चालताना
ती आग भोगली मी, मन बेचिराख झाले
दमले इथे, चमकत्या, ता-यांत चालताना
आणखी एखादं उदाहरण ?? असे बदल
आणखी एखादं उदाहरण ??
असे बदल लिहीण्याआधी गझलकाराची परवानगी वगैरे काही घेतलीय का ?
बाप रे, अशी परवानगी
बाप रे, अशी परवानगी लागते??
असो, मी नुसते असे वाचता येईल असे म्हटलय हो.
बदल सुचवतोय अस म्हटलेले नाही अथवा नवीन गझल म्हणून माझ्या नावावर खपवतोय का?
भीमराव पांचाळेची गोळी जरा
भीमराव पांचाळेची गोळी जरा जास्तच कडक झालेली दिसून आलेली आहे. जलजिरा, इनो असे पर्याय सुचवण्यात येत आहेत. कुठल्याही आयडीने घ्यावे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तिलकधारी आला आहे. असे बदल
तिलकधारी आला आहे.
असे बदल लिहीण्याआधी गझलकाराची परवानगी वगैरे काही घेतलीय का ?<<
इथे गझलकार कोण आहे? मला तर कुणी दिसत नाही. भीमराव पांचाळे म्हणजे गायक ना? गायकही गझलेचे सदर चालवू लागले? ते एक असो. ज्याची रचना आहे तो न बोलता तिसराच कुणी येऊन चौथ्याशीच वाद घालून पाचव्यानेच लिहिलेला पॅरा येथे डकवून का जातो? खयालांचा थेटपणा म्हणजे काय हे लक्षात यायच्या आधीच भीमरावचे पॅरा इथे डकवण्यापेक्षा गझलूमियाँचे काही पर्याय छान वाटले.
जसे -
इच्छा न राहण्याची, शहरात या तुझ्या रे
वाटा जुन्या अताशा, झाल्यात चालताना
तिलकधारी एकंदर चर्चेवर खदाखदा हासत निघून जात आहे.
भीमराव पांचाळें आणि साहीर
भीमराव पांचाळें आणि साहीर पेक्षा तिलकधारी या डोक्यावर पडलेल्या बुजगावण्याची मतं विचारात घेण्यात यावीत ही सर्वांना विनंती. तिलकधारी इनो खरेदी करण्यास गेले आहेत. निव्वळ हसण्याने ते बरे होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. तरीही बरं न वाटल्यास ईश्वराच्या मनात जे असेल ते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अवांतर : जे योग्य आहे ते आंम्ही ग्राह्य धरतो. कुणी म्हटलंय याला आमच्याकडे महत्व नाही.
असे बदल लिहीण्याआधी गझलकाराची
असे बदल लिहीण्याआधी गझलकाराची परवानगी वगैरे काही घेतलीय का ?<<
अरेच्चा
काय रे तिलकधा-या,
दुस-याच्या वतीने तिसरा तू कशाला उत्तर द्यायला आलास ? तू कोण लागून गेलास ऑब्जेक्शन घ्यायला ?
अरे माकडा तू २००७ सालापासून गझल लिहीतोस. त्या आधी तुझा आणि कवितेचा काहीच संबंध नाही. तुझा गझलेचा अभ्यास आहे. चांगली गोष्ट आहे. पण साहीर लुधियानवीला पण थोडीतरी अक्कल असेल कि नसेल ? तुला भीमराव पांचाळे सहन होईना, पण त्यांनी जे उदाहरण दिलेले आहे ते साहीरचे आहे. जो शेर दिलेला आहे तो पण प्रथितयश गझलकाराचा आहे. तू इथून पुढे प्रतिसाद देताना ते तुझं मत आहे असं लिहीत जा. कविता कशी हवी, शेर कसा हवा याबाबतीतली तुझी मतं प्रमाण मानायला लोक खुळे नाहीत. भानावर ये. पुन्हा असे नियम असल्यासारखे प्रतिसाद दिसले तर घोर अपमान होईल. व्हीआरएस नोकरीतून घेतलीस कि .... आणखी कसली दिवाळखोरी आहे ही ?
पुढचा आयडी. Kiran4