Submitted by प्राजु on 2 April, 2013 - 08:37
जाग नावाला तुझ्या निर्धार कर बरसायचा
सोड मेघा छंद मातीला असा झुलवायचा
चेहरा सांगे तुझा सारी खुशाली पण तरी
काय डोळे यत्न करती वेगळे सांगायचा?
तूच चोथ्याला जगाच्या टाळले कंटाळुनी
सांगना 'काळा' तुझा घाणा कुणी फ़िरवायचा?
राग लटका का तुला कळलाच ना माझा कधी?
यत्न सुद्धा ना कधी केलास तू मनवायचा!!
तू नको वाईट वाटूनी असा घेऊ मना
घे जरा अनुभव तुही काहीतरी गमवायचा
प्राक्तना रुसशील माझ्यावर किती तूही असा?
घेतला आहे वसा मीही तुला हसवायचा
जीवनाच्या याच पाटीवर नव्याने चल मना
संयमाचाही धडा आहे अता गिरवायचा..
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिलकधारी आला आहे. सुटी मुबलक.
तिलकधारी आला आहे.
सुटी मुबलक. विचार कल्पक. अभिव्यक्ती अशक्त.
तिलकधारीच्या शुभेच्छा
तिलकधारींशी सहमत फारशी
तिलकधारींशी सहमत
फारशी इंप्रेसिव्ह नाही वाटली ही वृत्त-हाताळणी त्यामुळे असे असावे बहुधा (वै म)
संयमाचाही धडा आहे अता
संयमाचाही धडा आहे अता गिरवायचा
छान मिसरा.
संयमाचे महत्त्व लवकरात लवकर उमजणे फायद्याचेच.
शुभेच्छा.
जीवनाच्या याच पाटीवर नव्याने
जीवनाच्या याच पाटीवर नव्याने चल मना
संयमाचाही धडा आहे अता गिरवायचा.. >>> हा शेर सर्वात आवडला.
शेवटची द्विपदी आवडली!
शेवटची द्विपदी आवडली!
अतिशय सुंदर गजल - प्रचंड
अतिशय सुंदर गजल - प्रचंड आवडली .......
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.