फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची" ..निकाल

Submitted by उदयन.. on 1 April, 2013 - 06:29

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "एप्रिल" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे " चाहुल उन्हाळ्याची "

या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे.. त्यात भर दुष्काळाची..:( .. उन्हाळ्याची चाहुल लागल्यावर निसर्गात बरेच बदल होत असतात.. माणसांच्या कार्यांमधे ही बदल होतात ...या वरच या महिन्याची थीम आधारीत आहे..

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

निकाल :-
प्रथम क्रमांक : Dev_ - कैरी
हिरव्यागार आंबट-गोड कैर्‍या खरच उन्हाळा जवळ आल्याची चाहुल देतात. टेक्निकली करेक्ट फोटो.

dev 1st.jpgद्वितीय क्रमांक :- विभागुन
१. प्रसन्न अ - ग्रीष्माची चाहूल (थीमसाठी परफेक्ट फोटो)

prasanna 2nd.jpg२.गिरिश सावंत - ऊन ऊन (विषयाशी संबंधित पण थोडासा हटके असा फोटो. उन्हाच्या झळा फोटोतुनही जाणवत आहे. Happy

girish 2nd.jpgतृतिय क्रमांक :- विभागुन

१. रोहित ..एक मावळा - पाण्यासाठी वणवण (कंपोझिशन आवडले)

rohit 3rd.jpg२. ferfatka - लगबग वाळवणाची

ferfataka 3rd.jpg

विशेष उल्लेखनिय: जागु - रानमेवा

jaagu.JPG

नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च..""भावमुद्रा"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही करवंदं उन्हाळ्याची चाहुल देणारी.
पुरंदरवर दिसलेली.

1

ही आहे विहिर पुरंदरवरचीच.
पाण्याची पातळी उन्हाळ्याची चाहुल दाखवतेय. तसाही पुरंदर तालुका काहिसा दुष्काळीच आहे.

1

अरे व्वा.. नवी थीम.. छान आहेत फोटोज..
झकासराव, करवंद कमालीची ताजी,रसरशीत दिस्ताहेत.... सुर्रेख.... उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण जागृत झाली...

जुन्या ट्रन्का धुन्डाळायचा कण्टाळा आला म्हणून आत्ताचे ताजे ताजे फोटू!
काल पिम्परीत गेलेलो, दहा वाजता देखिल रणरणते उन होते. बाजारात फिरताना मनात एकीकडे उन्हाळ्याच्या चाहूलीचा विषय रेन्गाळत होताच. म्हणत होतो की चाहूल कसली धुन्डाळता? इथे अस्से या कडक उन्हात, खात्रीच पटेल उन्हाळ्याची! Proud
तर तेव्हा काढलेले हे फोटू.

मस्त टोप्या लटकवलेल्या, नक्षीदार, जाळीदार, अन डोळ्यापुढे असेच चित्र तरळत होते की ही ही टोपी कुणा सुन्दरीच्या मस्तकी भुरभुरत्या सुट्ट्या केसान्वर किती शोभुन दिसेल नै? पण हाय रे दैवा, उन्ह इतके कडक रणरणते होते की शेवटी मला नुस्त्या टोप्या अन तळपते आकाशच दिसू लागले, टोपीखालची सुन्दरी गायब झाली, (म्हणूनच इथेही दिसत नाहीये Wink )

Topya 1 DSCN1735.jpg

गरिबाघरचा फ्रिज म्हणतात ते हेच फ्रिज बर्का! हल्लीच्या इन्ग्लिशमिडीयमवाल्या कॉन्वेन्टस्कूलच्या पोरान्ना दाखवायला घेऊन जावा हा फोटू! आता या फ्रीज मधले पाणी प्यायचे धाडस हल्लीचे कितीक बिसलरी अन "अ‍ॅक्वा"सुरक्षित पाणी पिणारे करतील काय की! हो, अगदी हाच विचार फोटू काढताना मनात होता.

Math 1 DSCN1737.jpg

[ता.क. दोनच फोटून्ची मर्यादा आवडली नै!
>>>४) जास्तित जास्त २ फोटो...>>><<< ही सूचना एकाच पोस्टीत जास्तीत जास्त दोन फोटू अशीच आहे का? Wink ]

चाहुल उन्हाळ्याची..
चाहुल नवचैतन्याची...
चाहुल नवीन वर्षाची..
चाहुल नवपालवीची..

रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण ... यंदा दुष्काळ आहे म्हणुन नाही तर हे दरवर्षीच चित्र आहे.ज्या डोंगर- दर्‍यात पावसाळ्यात आनंदाचे पाट वाहतात,त्याच्या पायथ्याशी मात्र उन्हाळ्यात एका घागरीसाठी जिवाच रान कराव लागत.

उन्हाळ्याची चाहूल… पेप्सीकोला पाहिजेच Happy
मग तो २ रुपड्याचा पेप्सीकोला भर उन्हात "अमृताशीही पैजा जिंकतो"
गरीब श्रीमंत थोर लहान सगळ्यांच्या तोंडाला पाणी Happy
IMG_3403.JPG

--------------------------------------------
पंखा दुरुस्तीस टाकला पाहिजे Happy
IMG_2538.JPG

सागर

स्पर्धेसाठी नसलेला पण मनापासून आवडलेला फोटो,
उन्हाळ्याची चाहूल। लई उकडतंय बगा । मस्त चिखलात जाऊन डुबकी लगावतो.
IMG_2687.JPG
Happy Happy

उन्हाळा सुरु होताच गावा जवळच्या जंगलातले पाणी संपायला येते , मग येतात बिचारी पाणी पेयला ….
Monkey_water.jpg

दुसरा फोटो नंतर टाकला तर चालेल का ?

रोजच गच्चीवरच्या टाकीच्या एका बारीक चिरेतून झिरपणारं पाणी प्यायला रोज सनबर्ड्स येतात. आज फोटोत पकडला.

DSCN2069_0.JPG

Pages