सुन्न करणाऱ्या घटना, बातम्या अस्वस्थ करून टाकतात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मांडलेली हि अस्वस्थता....आपल्या मायबोलीवर व्यक्त करतोय!!
मीही पहिली होती काही स्वप्ने,
नव्हते कसलेच दुखणे
आत्ताच कुठे आयुष्य घेत होते भरारी,
नव्हते मी कश्याच्याही आहारी
सुंदर निसर्ग, थोडीशी मौज
सवंगड्याचा सहवास, थोडाशे गीत,
कधीतरी संगीत, आई बाबांची माया,
आणि मोकळा श्वास हवा शांत जीवन जगावया.
जीवनाच्या या अर्ध्या वाटेमध्येच, घाला झाला,
माझ्या स्त्रित्वाचा प्राण जिवानिशी गेला
निषेध झाले, निदर्शेन झाली, मोर्चे झाले,
अख्खी तरुणाई रस्त्यावर आली,
पण ...पण वासनांध मने, गोठलेली हृदये,
आजही स्त्रीस ओरबाडतच राहिली,
किती दिवस नाचवावे हे संस्कारांचे झेंडे?
जागो जागी वाढती बलात्कारयांचे लोंढे
कुणास कसा नाही कळत, आमचा आक्रोश?
स्त्री म्हणून जन्मने हाच समजावा का दोष?
कधी थांबेल का हा शोष ?
फाडा आता बुरखे संस्काराचे अन संस्कृतीचे
आणि करा आत्मपरीक्षण स्वतःचे,
असेल जर नियत खरी, नजर स्वच्छ
तर कशी लुटली जाईल हि भगिनी येछेच्छ?
आठवू सजा रान्झ्याच्या पाटलाची
करुनी शिवरायांचे स्मरण,मग चढू दे बाहूत स्फुरण
अन आवळा मुठी, घट्ट करा मनगटे
परत निपजले नाही पाहिजे असले करंटे
सुखकर कधीतरी होईल स्त्रीजीवानाची वाट
उगवेल का अशी नववर्षाचची आशावादी पहाट?
- सचिन बोर्डे