सोसायटीचे नियम व कायदे विषयक

Submitted by ferfatka on 30 March, 2013 - 07:23

हा दुवा सोसायटीचे नियम व कायदे विषयक असून, सोसायटीमध्ये राहणा:या अनेकांना अडचणी येत असतात. अनेकवेळा नाहक त्रस सोसावा लागतो. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास, योग्य सल्ला द्यावा. धन्यवाद.

मी एका गृहरचना सोसायटीत गेल्या 6 वर्षापासून राहत आहे. माङो घर 4 थ्या मजल्यावर आहे. महापालिकेकडून येणारे पाणी खालील टाकीत साठवून ते पाणी पंपिंग करून सोसायटीच्या वरील टाकीतून सर्वाना पुरविली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून वरील टाकीतून येणारे पाणी सोडल्यानंतर माङयाकडे पाणी कमी दाबाने तर कधी येत नाही. खालील मजल्यांवरील सभासदांनी पाणी भरल्यानंतर नळ बंद केल्यास पाणी येते पण तेही कमी दाबाने. अनेकवेळा खाली जाऊन पाणी बंद करण्याबाबत विनंती करावी लागते. यावरून अनेकदा किरकोळ वादही झाले आहेत. याबाबत स्वतंत्र्य नळकनेक्शन देण्याबाबत मी बैठकीत बोललो मात्र, अनेकजणांचा याला विरोध आहे. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास जरूर कळावा.
धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर सोसायटीचे सचिव यांचे निधन झाले असेल तर काय करावे सोसायचे एकही ऑडिट झालेले नाही...पदावरील कार्यकारिणी आणि सभासद कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही खूप नाहक त्रास होत आहे.

कार्यकारिणीची सभा घेऊन त्यांच्यापैकीच एकाला सचिव कार्यकारिणीमधील निवडलेल्या सभासदांतून करायचे असते.

नेहमीप्रमाणे अमुक व्यक्तीस सचिव करण्यात यावे हा ठराव मांडणे,अनुमोदन लिहून काढा. तर या सभेची नोटीस, सभेचे वृत्त लिहून त्याची फोटोकॉपी काढून खाली आताच्या चेअरमनची सही आणि गोल शिक्क्याने दोन प्रति करा. एका लेटरहेडवर "माननीय उपनिबंधक ,सहकारी गृह संस्था यास पत्राने कळवायचे आणि सोबत वरील फोटो काप्या जोडून उपनिबंधक आत्या कार्यालयात द्यायच्या. तिथला कर्मचारी कापीवर राऊंड सील मारून मिळाल्याची पोहोच देईल. या कआपईनए बँकेत सह्या बदलायच्या.

<< खूप नाहक त्रास होत आहे. >>
तुम्ही स्वतः सोसायटीचा सेक्रेटरी बनण्याचा विचार करू नका, इतकेच सांगेन.
(अनुभवाने पोळलेला) एक्स-ट्रेजरर

सोसायटीचा सेक्रेटरी बनण्याचा विचार करू नका,

ज्या सोसायटीत चाळीसच्या वर सभासद असतात तिथे कार्यकारिणीसाठी सात जण कसेही मिळतात. पण वीस सभासद असतील तर पाच जण मिळू शकत नाहीत. विसापैकी बारा चौदा मालक महिला असतात, तीन चार जण राहात नसतात. कुणी चेअरमन सेक्रेटरी व्हायला तयार नसतो. या उलट साठ -ऐंशी सभासदांच्या सोसायटीत ही पदं घ्यायला धडपड चालू असते. श्रेय लाटणे आणि सतत मी कसा शहाणपणा केला हे सांगत फिरायचे.
मी ट्रेझरी/सेक्रेटरी असे एकूण पंधरा वर्षे आहे. एप्रिल दहा तारखेलाच मी अकाउंटचा ट्रायल बॅलन्स करून देत असे.

आमच्या सोसायटीत गेली तीनचार वर्षे चेअर पर्सन आणि सेक्रेटरी दोन्ही महिला आहेत. त्याआधी आणखी एका महिलेने प्रथम चेअर पर्सन व मग सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. अर्थात आताच्या सेक्रेटरी काहीशा नामधारी आहेत व धावपळीची कामं त्यांचा मुलगा बघतो. पण म्हणजे त्या अगदीच काही करत नाहीत असं नाही. काहीशा राष्ट्रपतींसारख्या.

हो,तसंच करायला हवं. सभासदच निवडून पदं घेऊ शकतो. मग काम कुणीही केलं तरी चालतं. सहीचे मालक ते राहतात. आमच्याकडे सोसायटीत सुरवातीला आलेल्यांची वयं सत्तर+ झाली आहेत आणि ते दुसरीकडे मुलामुलींच्याकडे राहायला गेलेत. ब्लॉक्स विकलेले नाहीत. असून अडचण....

अकाउंटिंग कामे परभारे देता येतात पण इतर कामकाजासाठी पदाधिकाऱ्यांच्या सह्या लागतात ना!

सोसायटीला त्या भागातील फेडरेशनचे मेंबर व्हावे लागते आणि वर्षाला साधारणपणे पाचशे रुपये शुल्क भरावे लागते. त्या बदल्यात फेडरेशनचे कर्मचारी कायदे आणि पद्धत (प्रसीजरची) अचूक माहिती पटकन सांगतात. ती तशी अमलात आणावी.
उदाहरणार्थ
निवडणुक घेणे, ब्लॉकची विक्री आणि प्रिमिअम घेणे, मासिक वर्गणी न भरणाऱ्यांवर कारवाई इत्यादी.

तुम्हा आम्हा सर्वांसाठी आजच्या मटा मधील सोसायटी संदर्भाने ऎड रोहित एरंडे यांचा लेख उपयुक्त व महत्वाचा आहे.

Pages