कसा बेभरवशी निघाला भरोसा

Submitted by ganeshsonawane on 22 March, 2013 - 04:42

कसा बेभरवशी निघाला भरोसा

जगी माणसाचा न वुरला भरोसा
कसा काय देवू कुणाला भरोसा?

गळा ऐनवेळीच कापून गेला
कसा बेभरवशी निघाला भरोसा

पहाताच लाटा सरकले किनारे
किनाऱ्या वरूनी उडाला भरोसा

तुझ्या वाचुनी रात्र सुनसान जाते
जपूनी उराशी दिलेला भरोसा

मला पाहुनी वाट बदलून गेली
तिचा काय होता निराळा भरोसा?

दिले तोंड बांधून संतास फाशी
पुराव्याविना व्यर्थ ठरला भरोसा

विसंबुन विठूवर कसा काय राहू ?
तयाचाच नाही तयावर भरोसा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगी माणसाचा न वुरला भरोसा
कसा काय देवू कुणाला भरोसा?

<<<

अलामत काय आहे?

जपूनी उराशी दिलेला भरोसा<<<

अलामत काय आहे?

तिचा काय होता निराळा भरोसा?<<<

अलामत काय आहे?

पुराव्याविना व्यर्थ ठरला भरोसा<<<

अलामत काय आहे?

तयाचाच नाही तयावर भरोसा<<<

काफिया काय आहे?

तिलकधारी

ही आ ह्या अलामतीचा स्वरांतकाफिया असलेली गझल आहे काय?तरीही शेवटच्या शेरात गफलत झालीच म्हणायची

की भरोसा ही रदीफ काफियासारखी वापरलीये .........????? (<<<रदीफ बेफिकीर होत काफिया बनायची >>>असे काही ???? )
असो
गझलतंत्रात घोटाळा दिसत असला तरी द्वीपदी-समूह म्हणून रचना वाईट नाही ही

अवांतर :विठ्ठलाच्या शेरासाठी मात्र मला रॉयल्टी हवी बरका Lol

कृपया माफ करा, घाई गडबडीत typing मिस्ताकेस होवून गेल्या आहेत अलामत आहे निदर्शनास आणल्या बद्दल तिलक धारीजी आणि कुलकर्णी सर फार फार धन्यवाद
गझल पुन्हा दुरुस्त करून टाकतो