आज जाहीर झालेल्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपटपुरस्कारांत मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
'अनुमती' या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटासाठी श्री. विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'संहिता' या सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटातील संगीतासाठी श्री. शैलेंद्र बर्वे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
याच चित्रपटातील 'पलकें न मुंदे' या सुनील सुकथनकर यांनी लिहिलेल्या गीतासाठी आरती अंकलीकर - टिकेकर यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'इन्व्हेस्टमेण्ट' हा रत्नाकर मतकरी लिखित - दिग्दर्शित चित्रपट मराठीत सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

याशिवाय 'धग' या चित्रपटासाठी शिवाजी लोटन पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा व उषा जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सुधीर पलसाने यांना मिसिंग भाषेतील 'को : याद' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट छायालेखकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगेश हडवळे यांच्या 'देख इंडियन सर्कस' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
विक्रांत जाधव यांच्या 'कातळ' व गौरी पटवर्धन यांच्या 'मोदीखान्यातील दोन गोष्टी' या लघुपटांना सर्वोत्कृष्ट लघुपटांचे पुरस्कार मिळाले आहेत.
या सर्व चित्रपटांशी व लघुपटांशी संबंधित कलाकारांचं व तंत्रज्ञांचं मायबोली.कॉमतर्फे हार्दिक अभिनंदन!!!
मायबोली.कॉम 'संहिता', 'अनुमती' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तिन्ही चित्रपटांची माध्यम प्रायोजक आहे.
सर्व पुरस्कारविजेत्यांचं
सर्व पुरस्कारविजेत्यांचं अभिनंदन !
सर्व पुरस्कार विजेत्यांचे
सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!
यापैकी कुठल्याही (धग, अनुमती,संहिता ) सिनेमाचे नाव ऐकले
नव्हते.
Pages