दुष्काळ??कुठे आहे दुष्काळ?

Submitted by के अंजली on 15 March, 2013 - 23:35

काल पेपरात वाचलं, टिव्हिवर पाह्यलं, एफ एम वर ऐकलं..
गेल्या चाळीस वर्षांतला सर्वात भीषण दुष्काळ पडलाय म्हणे..?

लोकांना प्यायला पाणी नाही, नदी तळी हापसे कोरडे ठ्ठाक झालेत.. पाणी असलं तरी लांबून लांबून आणावं लागतयं...
गावातल्या बायाबापड्यांचे फोटो आलेत फ्रंटपेजवर...विहिरीच्या आत जाऊन म्हणे जीव धोक्यात घालून म्हणे हंडाभर पाणी मिळतयं त्यांना..?
सोन्यासारखी शेती पाण्याविना सुकून गेलीयं.. दावणीच्या गुरांचे पाण्याविना सापळे झालेत हो...

हे सगळं असं ऐकलं ..वाचलं.....!!

मला तर काय वाटत नाय बुवा दुष्काळ बिष्काळ...!
बघा ना... घरातल्या नळांना चोवीस तास पाणी....किचनमध्ये पाणी.. अगदी भरपूर हवं तेव्हढं..
वाहता नळ सोडून कितीही वेळ भांडी धुवायचे, ओटे धुवायचे अगदी स्वच्छ स्वच्छ...!!

बाथरुम मध्ये तर किती पाणी..! पाणीच पाणी..!

वाहत्या नळाखाली कपडे धुवायचे ... मोलकरणीला पाणी वाया घालवते म्हणून जर्राही ओरडायच नाही...!
आणि शॉवर....? तो तर हवाच की..जसं काही आभाळातल्या ढगांतून पावसाचं पाणी पडतयं ना अशा थाटात मनसोक्त भिजायचं शॉवरखाली.... बादल्याच्या बादल्या..
टॉयलेट मध्ये गेल्यावर की येताना फ्लश ओढायला विसरायचच नाही.. जाऊदे गेल्या आठदहा बादल्या वाया तर जाऊदे की .. आहे ना पाणी..?

दुपारच्या वेळात कडक उन्हात छानपैकी बागेला पाणी द्यायचं..म्हणजे निम्म्या पाण्याची वाफ होईल आणि निम्म पाणी मिळालं बागेला तर झाडं कशी तरारुन येतील ना?
मोठ्ठा पाईप घेऊन मस्तपैकी कारला अंघोळ घालायची.. मस्त दिसते कार चकचकीत... बादलीत पाणी बिणी घेऊन नाही बरं तिला पुसायची..ह्ह्या.. आहे की भरपूर पाणी...

बघा..म्हटलं ना काही दुष्काळ वगैरे नस्तं असलं...

असलाच तर तो लांब तिकडे असेल कुठेतरी... आपल्याला काय...?

येत असतील त्या बाया बापड्यांच्या डोळ्यांत आसवं... आपल्याला काय...?

पाणी..पाणी करत मरत असतील गुरं... आपल्याला काय..??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली , बर्‍यापैकी अशीच लोकांची मानसिकता दिसते जिकडे तिकडे , कधी कळणार ठाऊक लोकांना पाण्याचं महत्वं ?

श्री.. खूप धन्यवाद...

आत्यंतीक चिडचिडाटापायी उतरलंय हे.. Sad

दुष्काळग्रस्तांसाठी आपण कांही करतों/ करुं शकतो कां हें सोडाच पण साधी या गंभीर समस्येची जराशी जाणीवही नसावी ही खरंच अधिक गंभीर बाब आहे ! Sad

लेखाशी सहमत आहे.

पण जर एकाच देशात किंवा एकाच राज्यात, एका ठिकाणी मुबलक पाणी तर एके ठिकाणी कोरडा दुष्काळ असे चित्र दिसत असेल तर, नक्कीच काहीतरी कुठेतरी चुकतंय राव.

अंजली, खरं लिहीलयत. लोकांनी जरा बाहेर पडून पाहिले पाहिजे , काय परीस्थिती आहे ते.
वरच्या लिस्ट मध्ये दर आठवड्याला बंगला (दोनमजली) धुणे हे सुद्धा घाला.

भाऊ, अंड्या,तृष्णा आणि स्वाती..

या छोट्याश्या स्फुटाची दखल घेऊन आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हां सगळ्यांचे आभार!

कालही बातम्यांमध्ये या पाण्यापायी दोन लहान मुलींनी जीव गमावल्याची बातमी ऐकली..
अर्थात इथं बसून नुसता चिडचिडाटही काही कामाचा नाहीये म्हणा..
म्हणूनच आम्ही मैत्रीणींनी आमच्या कॉलनीत..शेजारच्या सोसायट्यांमध्ये, आमचे जिथे छोटे प्रेझेंटेशनन्स होतात तिथे आमच्या परीने लोकांना (विषेशता: बायकांना) याचे महत्व सांगतो.

घरटी एक बादली जरी रोजची वाचवली तरी किती फरक पडेल नाही?

अंजली,
चांगला ज्वलंत विषय मांडलात तुम्ही.
माणसाणे आपल्यातली जाणीव आणि कर्त्यव्य विसरल्या मुळेच तर अशी वेळ येत आहे.
'इंडियात' आणि 'भारतात' राहणार्‍या माणसांमधला हा फरक आहे
हा दुष्काळ आणि दरी अशीच राहिली तर ही माणसे पोटासाठी शेवटी शहराच्या दिशेनेच (चाल करुन) येतील हे विसरुन चालणार नाही

के अंजली,

आपल्या भावना पोहोचल्या. सामान्य माणसाने नेमकं काय करायला हवं याविषयी अधिक माहिती मिळायला हवी. तुम्ही शहरात राहता असं दिसतंय. दुष्काळ असो वा सुकाळ पाणी जपून वापरणे योग्यच आहे. मात्र हे वाचवलेलं पाणी दुष्काळी भागात कसं पोहोचवायचं? या दोघांचा आपापसांत संबंध आहे का? असल्यास कशा प्रकारचा आहे? कोणी अधिक प्रकाश टाकेल का?

आ.न.,
-गा.पै.

मात्र हे वाचवलेलं पाणी दुष्काळी भागात कसं पोहोचवायचं? या दोघांचा आपापसांत संबंध आहे का? असल्यास कशा प्रकारचा आहे? कोणी अधिक प्रकाश टाकेल का?
कळीचा प्रश्न. म्हणूनच लोक म्हणतात 'ख्खाय उपेग हे, आपण पाणी वाचवून त्यांना थोडीच मिळणार? अरे, ते माझी गाडी नि मोटर सायकल चांगली भरपूर पाणी वापरून धुवून काढ!'

धागा चांगला आहे. उपरोधिकपणे लिहिले आहे कारण तसेच लिहिल्याशिवाय डोळे उघडणार नाहीत अशी परिस्थिती आहे खरी. सर्वांचेच म्हणणे पटत आहे. मानवाने जेथेतेथे निसर्गावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केल्यामुळे काही प्रमाणात ही अवस्था आलेली असणार हेही सर्वज्ञातच आहे. संघटना उभारणे, निधी जमवून तो योग्य स्थळी पोचता करणे, राजकारण्यांना दोष देऊनही त्यांच्याचकडून अपेक्षा ठेवणे हे सर्व उपाय तकलादू वाटत आहेत. असहाय्यता आल्यासारखे वाटत आहे. एका ठिकाणी दुष्काळ आहे म्हणून दुसर्‍या ठिकाणचे सोहळे थांबवणे हे निव्वळ संवेदनशील मन असल्याचे प्रतीक आहे, प्रत्यक्ष उपाय मात्र नाही तो. मग करावे काय? झाडे लावावीत तर त्यांचा उपयोग वीस वर्षांनी, आजच्या दुष्काळाचे काय? शहरीकरण मर्यादीत करावे तर महसूल कमी होऊन पुन्हा बोजाच वाढणार. दुष्टचक्र! शेवटी निष्कर्ष एकच निघतो. माणसेच फार आहेत. पण आता आहेत ती, त्यांचे काय करणार?

समुद्राचे पाणी पिणेबल करण्याचे महागडे उपक्रम हाती घ्यायला लागणार बहुतेक.

चु भु द्या घ्या

कळावे

गं स

अमेरिकेत डॅलस परगण्यात जॉन आणि मेरी ने स्वतःचा विवाह अत्यन्त साधेपणाने साजरा करून समस्त अमेरिकेतील नागरिकान्च्या पुढे आदर्श ठेवला... आदर्श म्हणजे मुम्बइची society नाही बर का...त्यान्च्या लग्नात भोजनानन्तर हात धुवायला पाण्याऐवेजी wet napkins देण्यात आले. विदर्भ मराठ्वाड्यातील इ-सकाळ मधील बातम्या वाचून त्यान्च्या सन्वेदनाशील मनाला खूप दु:ख झाले. त्या दु:ख्खाच्या भरात जॉनने मेरीला लग्न करतेस का विचारल आणि मेरीने पण डोळ्यातून आश्रू ओघळत असतानाच त्याला हो म्हणून टाकल... आता बातमी अशी आहे की ते अजून लग्न केल्याच्या दु:खातून बाहेरच आले नाहीत. आताच हाती आलेल्या बातमी नुसार, महाराष्त्राचे कारभारी त्यान्च्या देणगीची आशाळभूतपणे वाट बघत आहेत. त्यान्ची देणगी आली रे आली की दुष्काळ सम्पलाच अस समजा. तिथून २-३ barrels पाणी देखील भारतातील दुश्काळी भागात येण्याची इथली जनता आतूरतेने वाट बघत आहे.

चान्गले लिहीलय Happy कळकळ पोचली.

>>>झाडे लावावीत तर त्यांचा उपयोग वीस वर्षांनी, <<<
नेमके इथेच पाणी मुरतयं राव. जोतो आपल्यापुरते, व तेही आत्ताच्या घडीपुरते फायद्याचे बघतो हे, फार व्यवहारि झाले आहे जग. दुष्काळ दुष्काळ म्हणून ओरडताहेत ना? त्यान्च्या मागच्या दोनचार पिढ्यान्नी, व त्यान्नीही आहेती वृक्षसंपदा खाल्ली आहे, मात्र नविन लावण्याच्या नावाने शिमगा आहे. माझ्याकडे नावानिशी उदाहरणे आहेत, बापजाद्यान्नी लावलेले मोठमोठे वृक्ष, कधी घरबान्धणी, तर कधी अडचण, तर कधी पैशाकरता तोडून विकणारे बघितलेत, पण गेल्या पन्चवीस वर्षात माझ्याच नजरेसमोर अहो, इतकी झाडे तोडलीत त्या जागी नविन का लावत नाही या प्रश्नाला कुणालाही उत्तर द्यायचे नाही, कारण एकच, मी लावले तरी त्याचा लाभ भलतेच दुसरे घेतील ही कोती मनोवृत्ती. या "सामाजिक" मानसिकतेला तुम्ही अन आम्ही काय करणार आहोत? बर तर बर, त्या जोडीला प्रत्येक गोष्ट सरकारी कृपेतुनच मिळवायची अहमहमिका लागून हाच समाज "गाव करील ते राव काय करील" हेच विसरून गेलाय.
अन गेल्या पाचपन्नास वर्षात सरकारकडून "खरोखरी" जे प्रत्यक्षात यायला हवे होते ते झालेच नाहीये, अन या वास्तवावरून लक्ष उडावे म्हणून मग नाना बयादी/जातीपातीतील तेढ वाढवणे वगैरे उपाय घाऊकरित्या चालूच आहेत, त्यात हल्ली या "संवेदनशीलतेच्या तुलनेची" अजुन एक भर पडत्ये इतकेच.!

चांगला लेख.

गेल्या लोकप्रभात "बारव" / "मालगुजारी तलाव" बद्दल छान लेख आहेत. हे आपले पारंपारीक पाणी नियोजन होते. त्या काळात बांधलेल्या बारवा, आजही कोरड्या पडलेल्या नाहीत. पण आपणच आपल्या हाताने त्यांची वाट लावलीय. ( ती कशी, ते अवश्य वाचा सगळ्यांनी )

गरज आहे ती लोकशिक्षणाची आणि आपल्या देशात ठायी ठायी भिनलेल्या राजकारणाला, कायमचे गाडायची.

सरकारा आवडे दुष्काळ.. हेच खरे.

लिंबूटिंबू..
गहिवरून आलं हो तुमचा प्रतिसाद वाचून..
*
झोटिंग भाऊ,
तुमचा आयडी आधी देवनागरीत होता तो ब्लॉक केला होता अ‍ॅडमिन यांनी ते बरेच झाले म्हणायचे Wink
*
गापै,
>>मात्र हे वाचवलेलं पाणी दुष्काळी भागात कसं पोहोचवायचं? या दोघांचा आपापसांत संबंध आहे का? असल्यास कशा प्रकारचा आहे? कोणी अधिक प्रकाश टाकेल का?<<

उदा. मराठवाड्यात दुष्काळ आहे. तिथून वाहणारी मोठी नदी कोणती?(गोदावरी) ती कुठे उगम पावून कुठे कशी जाते?
खालच्या शहराला पाणी पोहोचविण्यासाठी कोणत्या कोणत्या धरणांच्या 'डेडस्टॉकमधून' रिझर्व पाणी सोडले जाते?
ते शहरात पोहोचेपर्यंत कसे व किती वाया जाते? किती पाणी रस्त्यात 'चोरले' जाते? हे पाणी सोडल्याने धरणाच्या वरच्या भागात पाणी टंचाई किती व कशी निर्माण होते हे प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात येईल.

(सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वीची गम्मत सांगतो. खडकवासला गावात, पाण्यासाठी 'कावड' मागवावी लागत असे. या धरणाचा नवा मुठा उजवा कालवा पुण्याला पाणी पाजतो. पण धरणाच्या भिंतीला धरून वसलेल्या गावात ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा नीट होऊ शकत नव्हता. केवळ नियोजन चुकीचे म्हणून खांद्यावरून पाणी आणून देण्याचा व्यवसाय करणारे ३-४ कावडवाले होते गावात.)

असा तो हिशोब आहे गापै.

यामुळेच शहरातले पाणी खेड्यात पोहोचवायचे नाहीये, ते शहरात आणावेच लागू नये म्हणून आपण पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. बोअरवेल खणली, तर दुसरी बोअर शेजारी खणून, टेरेसवरचे व सोसायटीच्या कँपसमधील काँक्रीटवरचे पाणी त्यात सोडून जलपुनर्भरणाची क्रिया करणे गरजेचे आहे, म्हणजे मग १००-२०० मैलावरून पाणी वाहून आणावे लागणार नाही.

दुष्काळ 'तिथे' आहे, पण तो तिथले रिसोर्सेस आपण हिसकून आणल्यामुळेही जास्त तीव्र झालेला आहे, ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

अंजली ....आपण पाण्याचे महत्व समजून पाणी वाचवले पाहिजे का तर 'संवेदनशीलता' म्हणून फक्त ......
कारण आपण पाणी वाचाव्ल्याने त्यांच्या पर्यंत पाणी पोचणार आहे किंवा त्यातून त्याचं दुःख कमी होणार आहे अश्यातला भाग नाही त्यामुळे स्वतःला याबाजुने त्रास करवून घेऊन उपयोग नाही....

ज्याप्रमाणे एखाद्या भागात खूप पूर आला म्हणून आपण त्यातला काही पाणी आपल्या भागात खेचून घेऊन त्याचं दुख कमी करू शकत नाही तसाच आहे हे......जर आपल्या भागात पाण्याचे सोर्सेस उत्तम आहेत तर ते आहेत मग तुम्ही कितीही पाणी खर्च केल तरी पाणी कमी पडणार नाही....तुमच्या घरातल्या विहिरीतले पाणी रोज रोज दुष्काळी भागात पाठवले तरी ते संपणार नाही....पण तिथे पाठवण जर शक्य नसेल तर संवेदनशीलता दाखवता येते त्याचं दुःख ओळखून पाणी कमी वापरता येत....पण वारेमाप पाणी वापर्नार्यांमुळे दुष्काळ आलाय किंवा त्यांनी तसे केले नाहीतर दुष्काळ संपुष्टात येईल असे होत नाही.........

हे तसेच आहे....महाराष्ट्रात स्नो (बर्फ) पडत नाही त्यांना हा आनंद घेत येत नाहीये म्हणून बर्फ़ालि भागातल्या लोकांनी पण घराबाहेर पडू नये आणि त्या वातावरणाची मज्जा किंवा उपयोग करवून घेऊ नये असे होत नाही.....बाराही महिने पाउस असणारा काही प्रदेश सुद्धा आहे भारतात मग दुष्काळ भागाचा विचार करून त्यांनी काय करावे अशी आपली अपेक्षा असेल?.....

संवेदनशीलता नाही लोकांमध्ये याच वाईट संवेदनशील मनाला वाटणं सहाजिक आहे तुम्ही संवेदनशील आहात हे कळतंय लेखातून .....पण त्यातून त्रास करवून घेऊ नका....निसर्गाचे चालेंज आहे हे....निभावून न्यावे लागेलच.....आपण आपल्याला करता येईल ती मदत करावी.....त्रास करवून घेऊ नये....

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या अगदी लागून असलेला भाग गुजरात या भागात दरवर्षी पूर येतो....गोदावरी नदीचे पाणी आजूबाजूची सारी नासधूस करते गुजरात मध्ये सुद्धा असेच ......मुंबई, कोंकण या भागात प्रचंड पाउस पडतो त्याच्या अर्धा पाउस सुद्धा विदर्भात पडत नाही....जेव्हा कि कोंकण आणि मुंबईला उन्हाळा पेटत नाही त्यापेक्षा १० पटीने जास्त याभागात उन्हाळा सहन करावा लागतो.....मानवी कारस्थानं बर्याच गोष्टींना कारणीभूत ठरत असले तरी अजूनही निसर्गाने त्याचे सगळेच पत्ते मानवाच्या हाथात दिलेले नाही.......अजूनही बर्याच गोष्टी निसर्गाच्या मनानेच घडतात.....हा यानंतर अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाय योजना करता येऊ शकत नाही पण अशी परिस्थिती उद्भवली तर काय करता येईल म्हणून उपाय योजना करता येऊ शकते.... पण हे ज्या मानव शक्तींच्या हातात आहे त्यांनी मनावर घेतले पाहिजे....नाही का ?

मोठमोठ्या क्रुझशिपवर समुद्राचे पाणी घेऊन ते पिण्यायोग्य बनवतात आणि ४-५ हजार माणसांना रोजच्या रोज अगदी तीनत्रिकाळ पिता/न्हाता/डुंबता येईल एवढा शुद्ध पाण्याचा साठा करतात. यावरची एक फिल्म नुकतीच बघितली आहे. हे जर शक्य असेल तर ही प्रक्रिया समुद्राजवळच्या गावांमधे का करत नाहीत?? ते पाणी नंतर इतर गावांपर्यंत पोहोचवण्याचे दुसरे काम आहे पण पिण्यायोग्य पाणी तरी मिळेल.

>>>> महाराष्ट्रात स्नो (बर्फ) पडत नाही त्यांना हा आनंद घेत येत नाहीये म्हणून बर्फ़ालि भागातल्या लोकांनी पण घराबाहेर पडू नये आणि त्या वातावरणाची मज्जा किंवा उपयोग करवून घेऊ नये <<< अचूक मुद्दे मयी, हेच म्हणायचे आहे.
(धागाकर्तीची माफी मागून - तुम्हाला/तुम्ही मान्डलेल्या विषयास हे लागु नाही) पण हल्ली काये ना, "सामुहीक शोकसभांचे" वा "शोकाच्या/दु:खाच्या सामुहिक सार्वजनिक प्रदर्शनाचे" फ्याड वाढत चाल्ले आहे, कोणी त्यासच "मेणबत्ती समुह" म्हणुन ओळखतात. इकडे तिकडे कुठे काही झाले की लग्गेच शहरी पान्ढरपेशान्च्यावर घसरण्याची मोहिम सुरू होते, त्यात भर हिन्दू सणान्ची/साधूसन्तान्ची पडते, अन भोळसट पान्ढरपेशेही जास्त विचार न करता, वा विचार केला तरी उगाच कशाला विरोध करावा? चार जणं जस बोलताहेत तस बोलले तर काय फरक पडतो? या विचाराने हो ला हो मिळवत रहातात. मिडीया त्यान्चेपरीने पब्लिकला "हिस्टेरिक" बनविण्यात व विशिष्ट विचार/गट/व्यक्तिला न्यायालयीन प्रक्रियेव्यतिरिक्तच, जन्तेच्या नजरेत "गुन्हेगार" ठरविण्याकरता जिवापाड प्रयत्न करतात, हल्लीची त्यान्च्या धन्द्याचा तो कळीचा हुकमी एक्का आहे असेच त्यान्ना वाटते, अगदी कालची "स्टार माझा" वरील आसारामबापूवरील चर्चाही याच अन्गाने चालली होती, बाबारे म्हणत बिब्ब्याचे पट्टे ओढणारी. जितके फुटेज त्या आसाराम बापूला "गुन्हेगार" त्यातुनही "सामाजिक गुन्हेगार" भोन्दू वगैरे ठरविण्यावर वाया घालवले तेवढा खर्च तर त्या आसारामनेही केला नसेल. पण पब्लिकला कुठेतरि गुन्तवुन ठेवून, त्यान्च्या भावभावना भडकविण्यात हल्ली मिडीया भलतीच तरबेज झाली आहे. कालही ती मुलाखत चालू असताना प्रथम लिम्बीने आसारामच्या नावाने कडाकडा बोटे मोडली Proud नन्तर एकूणच त्या बातमी/चित्रीकरणातली व्ययर्थता व त्यामागिल निमित्तमात्रे "पब्लिकला" भडकविण्याचे व कशाततरी गुन्तविण्याचे सूप्त कारस्थान तिला समजावल्यावर तिने मग स्टारमाझ्याच्या नावाने बोटे मोडली, अन सरळ च्यानेल बदलायला लावले. असो.
येऊन जाऊन, वर कुणी म्हणलय तर, "दुष्काळ" ही मात्र "पिढीजात सत्ताधार्‍यान्करता/ सरकार-प्रशासनाकरता" "कमाईची" पर्वणीच ठरते आहे हे नक्की! Proud Wink त्यावर मात्र कोणती मिडीया काही प्रकाश टाकू धजेल, वा कोणी काही बोलू शकेल याचि शक्यता नाही. कोण बोललाच तर त्याची धडगत नाही. येऊन जाउन कुठेतरी फुटकळ एखाद दोन टॅन्कर वापरुन खेळलेल्या होळीवरती जन्तेला पेटवायचे धन्दे सोप्पे आहेत, तेच करणार. अहो त्या आसारामने वापरले त्याच्या शेकडो पट पाणी शहरातून कारवॉश सेन्टर्स मधे वापरले जाते..... केलाय कधी हा विचार? यान्चा क्यामेरा मात्र आसारामच्या पिचकारी वर! Lol अन हेच नेमके लिम्बीला सान्गितले. अन असे का? तर हा आसाराम हिन्दू आहे, सन्त म्हणून किमान काही समुहास मान्य आहे, तर मग हे सोप्पे टारगेट आहे "श्रद्धास्थानान्वर" हल्ला चढवायला, याचीच पुढची (पूर्वीही झाली असेल) परिणती म्हणजे मग हवेत कशाला ते कुम्भमेळे? नदीचे प्रदुषण(?) वाढवायला? हव्यात कशाला जत्रा/उत्सव वगैरे बाबी चालू होतात.
शहरातून जितके एसी वापरले जातात त्याकरताचि वीज (औष्णीक) त्याकरताची उर्जा अन पाणी किती खर्च होते याचा कधी केलाय विचार? थाम्बवलाय एसी/फ्यानचा वापर? अन मग कशाला उगाच, तिकडे काही घडले तर इकडे त्याबद्दल सामुहीक शोकसभा अन अरण्यरुदन करत बसायचे?
अन कोण असे सान्गू पाहिले तर तो सान्गणाराच, वेगळा विचार मान्डू पहाणाराच माणूसकीहीन आहे अशी लेबले अविचारपूर्वक लावायला कुणाच्या बाच्या परवानगीचीही गरज नस्ते, नै का?
(बर, माझा हाच स्टॅन्ड चिपळूणात झालेल्या शाही विवाहाबद्दलही होता. उगाच राष्ट्रवादी वा कॉन्ग्रेसी आमदार म्हणुन विरोधाला विरोध करायचि माझी पद्धत नाही, कारण ते पण आमचेच आहेत Proud - त्याने चिपळूणात खर्च केला, त्यामुळे अनेकान्ना काम मिळाले, धन्दा मिळाला, व्यवसाय झाला, त्याच्या तिजोरीतील पैक्याला थोडे पाय फुटले तर बिघडले कुठे? नैतर तो पैका तसाच कुजत राहिला अस्ता ना? Wink )

इब्लिसराव,

>>>>दुष्काळ 'तिथे' आहे, पण तो तिथले रिसोर्सेस आपण हिसकून आणल्यामुळेही जास्त तीव्र झालेला आहे, ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. <<<<
हे तुमचे वाक्य "दुष्काळ 'इथे' आहे, पण तो इथले रिसोर्सेस "त्यान्नी" हिसकून नेल्यामुळेच जास्त तीव्र झालेला आहे, ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे." असा बदल करुन बोल्ला अस्तात तर तुमची गणनाही मी ब्रिगेडी/नक्षलवाद्यात करू शकलो अस्तो, मात्र तुम्ही तशी सन्धी दिली नैत बर्का! लब्बाड कुठ्चे Wink

अंजली, भावना पोचली.विषयाची व्याप्ती अन खोली खूप, पण व्यक्तिगत स्तरावर मी शक्य तिथे नेहमीच्या सवयीपेक्षा निम्मे पाणी वापरेन स्वत;साठी अन घरासाठी असा संकल्प नक्कीच करता येईल प्रत्येका/कीला.

आसाराम बापूंच्या होळीच मी समर्थन करणार नाही. पण वृत्तवाहिन्या, फेसबुकादी सोशल मीडीया मधे या प्रकारावर होणारी टीका पाहिली की मला " दरवाजा उघडा अन मोरीला बोळा (साप येउ नये म्हणून ) " ही म्हण आठवते. तिकडे गुजरात मधे इतका कमी पाउस पडतो तिथे सरकार व जनतेच्या प्रयत्नाने भूजल पातळी वर येते, वाढते अन ७०,००० कोट रुके खर्चूनही महाराष्ट्र कोरडाच? कुणालाच याच तेवढ काही वाटत नाही. त्याबद्दल कुणी हरीचा लाल काही बोलत नाही. आसाराम बापूंच्या होळी वर बोंबाबोंब करण / महाराष्ट्रात दुष्काळ आहे कोरड्या रंगांनी होळी खेळा वगैरे मेसेजेस फेसबुकच्या भिंतीवर लावण त्या मानाने सोप आहे नाही का?

इब्लीस भाऊ, तुमच विश्लेषण interesting आहे. जर प्रत्येका शहरानी, खेड्यानी किन्वा ग्रामपन्चायतीनी या नैसर्गिक स्रोतान्च्या सन्दर्भात स्वयम्पूर्णता मिळवली तर हे प्रश्न उत्पन्न होणार नाहीत.

पण... with current socio-political condotions हे अशक्य आहे. हिरवे बाजार, राळेगण इत्यादि हे तो नियम सिद्ध करणारे अपवाद आहेत अस फार तर म्हणता येइल.

आपण तेलासाठी मध्यपूर्वेवर, कोळशासाठी बिहार झारखन्डावर, अवलम्बून आहोत. बिहार UP मधली माणस गुजराथ, महाराष्ट्रावर किन्वा तामीळनाडूवर उद्योगासाठी अवलम्बून आहेत. दिल्ली, मुम्बई वर आणि इतर कर भरणार्या प्रान्तान्वर अवलम्बून आहे. (काही चावट मन्डळी भारत इटाली वर अवलम्बून आहे अस देखील म्हणतात Happy ).

या सगळ्या चलनवलनात स्थानिक नैसर्गिक स्रोत हे कमी पडणार आहेत, unless आर्थिक आणि राजकीय धोरणामुळे येणार्या माणसान्च्या लोन्ढ्यान्च प्रमाण कमी झाल तर... पण तस झाल तर हा तथाकथित विकास पण खुन्टेल... कारण मग इथे घरबान्धणीसाठी आवश्यक असणारे मजूर मिळणार नाहीत, industry साठी आवश्यक (un)skilled कामगार मिळणार नाहीत असे बरेच बदल घडून येतील.

जर पुण्याची लोकसन्ख्या १९६० च्या दशकात होती तेवढी झाली, तर कमित कमी पाण्याच्या सन्दर्भात त्या काळी ज्या पुण्यात विहिरी होत्या किन्वा सदाशीव हौद, बाहुलीचा हौद अशा ज्या वितरण व्यवस्था होत्या त्या कदाचित पुरे पडल्या असत्या.

जर एखाद्या शहराने isolation मध्ये जगायच ठरवल तर ते शहर स्वतः स्वयम्पूर्ण होउ शकेलही पण मग ते शहर शहर म्हणून रहाणार नाही हे ही तेवढच खर आहे.

माझे २ पैसे...

मुस्लिमांनी नुकताच कोल्हापुरात इजतेमा साजरा केला. किती पाणी वापरले? काही अंदाज? दत्तात्रेय मंडलिकांवर महाराष्ट्र शासन बंदी घालणार का?
-गा.पै.

आभार सगळ्यांचे..

प्रत्येकाचा सूर कसाही असला तरी पाण्याच्या निष्कारण उधळपट्टीचे मला वाटतं कोणीच समर्थन करीत नाही आहात..
पाणी मुबलक आहे म्हणून कसेही अक्षरशः वाया घालवायचे याची चीड येते आणि येतच रहाणार..
भारतीताई... मलाही हेच म्हणायचंय..
मुळात माझ्या परीने मी काय करु शकते का? हेच मीही पाहिलं आणि त्यातूनच हे माबोवर लिहावसं वाटलं..

माझ्यापेक्षा मानाने आणि अधिकाराने मोठ्या व्यक्ति इथे आहेत.. त्यांच्या पोस्टवरून त्यांचा अभ्यासही आहे हे दिसतेय पण....

हे स्फुट आहे ते काही कुठला आव वगैरे आणून नाही लिहिलय....अगदी सरळ जे मनात आलं ..जे जाणवलं ..जे मनात कुठेतरी टोचत होतं ते व्यक्त झालंय इतकंच....

मयी Happy खूप धन्यवाद इथे ही लिंक शेअर केल्याबद्दल..

आभार सर्वांचे..

के अंजली,

>> पाणी मुबलक आहे म्हणून कसेही अक्षरशः वाया घालवायचे याची चीड येते आणि येतच रहाणार..

अशी चीड येणं नैसर्गिक आहे. या चिडीतून पुढे कार्य कसं करता येईल यावर विचारविनिमय व्हावा. आजच्या मटात बातमी आहे त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे दोन ते अडीच लाख लिटर (२,००,००० ते २,५०,००० लिटर) पाणी गळतीमुळे वाया जातं. पाणी सांभाळून वापरण्याबाबत रेल्वेने कार्यक्रम हाती घेतला आहे. पाणी काळजीपूर्वक वापरायला हवंच! पण सर्वोच्च नासाडी गळतीतून होणारी आहे. या बाबीकडेही प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे.

विचारविमर्शातून काही व्यवहार्य सूचना निर्माण व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages