ह्याच प्रेमाच्या आधारावर जग अजुनही टिकून आहे.

Submitted by आकाशस्थ on 12 March, 2013 - 09:36

कधी कधी आपण फारच गुरफटत जातो. प्रेम ही एक हळुवार भावना आहे. तारुण्य वेगवान आहे. गंमत म्हणजे, प्रेम उमलतच मुळी तारुण्यात. वेगवान आयुष्यात थांबायला लावणारे क्षण इथेच येतात. एकीकडे करीयर असतं, तर दुसरीकडे हळुवार भावना. ह्या दोघांची सांगड म्हणजेच गुरफटणं.

जगात सगळ्याच गोष्टी "मी"पाशी येवून थांबतात. सुरुवात प्रेमाची "मी"नं होते. मी आहे म्हणून तर प्रेम आहे, किंबहूना हे सगळं जग आहे.

अपेक्षा वाढत जातात. आकर्षण, अहंकार, बुध्दी, मद असे अनेक पदर घेउन प्रेम विनटतं. सगळे पदर उलट्या क्रमाने उलगडत जातात. शेवटी अहंकार म्हणजेच "मी" संपला की खरं प्रेम उमगतं. इथे संपूर्ण परीस्थितीच काय तर जगही संपलं तरी प्रेम संपत नाही. माणसं बदलत नाहीत. ह्या सगळ्या पदरांच्या आधाराने असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट होते, पण कुठल्याच आधारावर आधारीत नसलेलं प्रेम उरतं.

ह्याच प्रेमाच्या आधारावर जग अजुनही टिकून आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडक्यात छान लिहिलंय.
>>पण कुठल्याच आधारावर आधारीत नसलेलं प्रेम उरत>>>>
बोरकर नित्याप्रमाणे आठवले.
''फार पाहिले फार साहिले नाही राहिले मन पहिले
तरी पहिले स्मित तुझे भुलवते गगनावर जे मी लिहिले'' ..