Submitted by राजीव मासरूळकर on 6 March, 2013 - 07:11
स्वरांची गाडी
अ अ अजगर, आ आगगाडी
सहलीला नेऊया स्वरांची गाडी !
इ इ इजार , ई इडलिंबू
पिंपळाच्या झाडाखाली डबे खाण्या थांबू !
उ उ उखळ , ऊ ऊस गोड
बागेमध्ये खेळु, करु थोडी घोडदौड !
ए ए एडका, ऐ ऐरावत
पाखरांना दाणे टाकु, हरिणांना गवत !
ओ ओ ओठ, औ औ औषध
फुलांसंगे डोलु, फुलांतले वेचु मध !
अं आनंदाने अः गाऊ नाचू
स्वरांच्या या गाडीतुन सुखे घरी पोचू !
- राजीव मासरूळकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा मासरूळकर पुन्हा जिंकलत वा
वा मासरूळकर पुन्हा जिंकलत
वा वा मस्तच
खूप छान. अगदि बालपणात
खूप छान.
अगदि बालपणात गेल्यासारखवाटलं.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
वैवकु, विजय जोशी, भारती
वैवकु,
विजय जोशी,
भारती बिर्जे ,
हार्दिक आभार !