ओनामा

Posted
20 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

इथे काय लिहावे हा खरच एक प्रश्न आहे. यक्षप्रश्न म्हणण्याएवढे मोठे असे काहीच नाहिये. options बरेच आहेत. दिवसाभरतल्या घडामोडिंशी संबंधित काही लिहावे कि आधी ठरवून काही लिहायचे आपणच काहितरी खरडत जायचय कि हि जागा कोणाला तरी भाड्याने द्यावी टवाळक्या क्रण्यासाठी वापरू कि उगाच अभिव्यक्तीच्या नावाखाली काहितरी अनाकलनिय बरळावे शेवटी personal BB म्हटल्यावर तेव्हढे स्वातंत्र्य तर मिळालेले आहे. Happy

बघुया काही सदुपयोग करता येतो का किंवा तुम्हाला कोणाला काही सुचले अणि लिहावेसे वाटले तर मला mail टाका

प्रकार: 

मी योग्य ठिकणी लिहित्ये की नाही ते माहीत नाही, पण मला बेन्गलुरू, मईसुर , उटी, कोडाइकेनाल, मडिकेरी अशी ट्रीप करायची आहे. कार ने जायचे आहे (पुण्यापासून्) . टोट्ल सहा दिवस आहेत. कोणी आधी असे जाउन आले आहे का ? काही गायड्न्स मिळेल का ?

Lol

मी हे आधी पाहिलेच नव्हते. आत्ता चुकून "ओबामा" म्हणून बघितले. नाईल, तुम्ही हा प्रश्न विचारण्यासाठी हे कुठून खणून काढले? Wink

असामी, तुझे पान 'अर्थकारण','अवांतर' 'विचार' मध्ये आहे. 'अवांतर-विचार' साठी वापरता येईल. mail टाकण्याऐवजी इथेच लिहिल्याबद्दल दिलगीर आहे.

असामी, काहीहि लिहा पण खरे लिहा. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मात्र दिलगिरी व्यक्त करायला विसरू नका!

नाईल __/\__ Lol

कॅनीचा प्रश्न मलाही पडलाय. तुम्हाला हे सापडलं कसं? (कुठून खणून काढले? कॅनी :हाहा:)
आज असाम्या धन्य झाला असेल. Lol

Lol

पण मला बेन्गलुरू, मईसुर , उटी, कोडाइकेनाल, मडिकेरी अशी ट्रीप करायची आहे. कार ने जायचे आहे (पुण्यापासून्) . टोट्ल सहा दिवस आहेत. >> Uhoh नाईल अहो तुम्ही ६ दिवसात ५ गावे कशी काय नीटपणे बघु शकाल? २ किंवा ३ ठिकाणे ठेवा प्लॅन मधे. Happy

Biggrin

असं काय करता? समजून घ्या. असाम्याच्या पानाचं 'ओनामा' वाचून नाईल यांना 'ओनम' सदृश्य काही वाटलं आसेल. त्याचा संबंध जोडून त्यांनी इथे विचारपूस केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Proud

हे काय आहे? का आहे? मिडलाईफ क्रायसिस मधून जात होतात असं म्हणावं तर तसं काहीही आजिबात नव्हतं. Proud

ओनामा करणारा तब्बल आठ वर्षं सात महिने तेवीस दिवस ह्या पानावर फिरकलेला दिसत नाही. सदुपयोग करण्याजोगं काही सापडलं नाही की अजून कुणाची मेलच आली नाही ? Lol