स्त्री ????

Submitted by Trushna on 3 March, 2013 - 23:38

download.jpgमी या पुरुषप्रधान समाजात वावरणारी आजची स्त्री , हुंडाबळी,विनयभंग ,अत्याचार, छेड-छाड, बलात्कार ,स्त्री-भ्रूणहत्या , अश्या अनेक समस्यांशी झुंजणारी , सहनशिल्तेचा अंत होईपर्यंत सहन करणारी आणि शेवटी स्वताला संपवणारी .पण याला जबाबदार कोण ? या कोल्ह्या-लांडग्यांच्या ,गावगुंड पातळीवर उतरलेला समाज कि स्वतः स्त्री ? हे प्रश्न मनाला वेड लावतात. म्हणूनच स्त्रीयांचे प्रश्न मांडण्याचा हा एक प्रयास
आज जे वर्तमानपत्रातून Tv तून वा आजूबाजूला जे घडतंय हे सर्व किती मनाला वेड लावणार आहे मी कोणी
लेखिकानाही एक सामान्य स्त्री पेशाने नर्स पण आज वाटल उतरवावं हे सर्व आज तिरस्काराच्या कागदावर, माझ्यासारखेच प्रश तुम्हालाही पडत असतीलचना ?
स्त्री एक माता, एक मुलगी, एक बहिण ,सून, बायको,(मैत्रीण,काकी,मावशी ,वाहिनी , अश्या कित्येक भूमिका सहज रित्या पार पडते .ती शिक्षित असली तरी वा अशिक्षित असलीतरी संसारातले असो वा व्यवहारातले प्रश्न किती चूटकीनिशी सोडवते .घरात रुचकर जेवण बनवणारी अन्नपुर्णा, मुलांना संस्काराचे बाळकडू पाजणारी संस्कारलक्षमी, शिक्षणाचे धडे देणारी सरस्वती ,चालायला बोलायला शिकवणारी माता, पतीने दिलेल्या सुखसोयींवर न जगता त्याच्या खांद्यालाखांदा लावुन घर नोकरी सांभाळून घराला हातभार लावणारी अर्धांगिनी ,घरातील आजारी व्यक्तींची कालगी घेणारी आया, घरावरील प्रत्येक संकटांना सामर्थ्याने पेलणारी रक्शिका. ह्या प्रत्येक भूमिका ती प्रामाणिक पानाने निस्वार्थ मनाने पार पडत आलीये.
भारतातील कित्येक स्त्रियांनी विविध क्षेत्रात लाक्षणीय कामगिरी बजावल्यात. गाणकोकीळा लता मंगेशकर, फॉरेन मिनिस्टर वी.एस.रमादेवी,
IPS ऑफिसर किरण बेदी, गवर्नर सरोजिनी नायडू , इंडिअन एअरलाईन पायलेट दुर्गा ब्यानर्जी, पंतप्रधान इंदीरा गांधी या सर्व असो वा अंतराळात पोचलेली कल्पना चावला या सर्वांनी दाखवून दिलय कोणत्याही क्षेत्रात स्त्रीया मागे नाहीत तरीही स्त्रीला पाहिजे असलेला मान,सम्मान,प्रतिष्ठा तिला मिळत नाही आणि तिच्या वाट्याला येतो तो फक्त अपमान ......
आज महिलांनी आपली वेगळी ओलख पटवून दिलेली असून सुद्धा या कोल्हया -लांडग्यांच्या समाजात स्त्रियांना हिनवले जाते ते का ?छेड-छाड ,अत्याचार, विनयभंग,बलात्कार अश्या अनेक समस्यांना तिला तोंड द्यावे. स्त्रियांची पात्रता असून देखील त्यांनी चूल आणि मुलच सांभाळावे हीच अपेक्षा केली जाते. पण असे खालच्या पातळीचे विचार करणारे हे किती सहज रित्या विसरतात आपल्याच जुन्या लोकांची हि म्हण आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगास उध्धारी ..
मुलगा घराचा कुलदीपक आणि मुलगी हे ओझ समजल जाते , अस का ?
वंशाचा दिवा हवा पण मुलगी नको म्हणून जन्माच्या आधीच तिचा घाला घोटाळा जातो , अस का?
वयात येण्या आधीच घरच्यांच्या ओझ कमी करण्याच्या अट्टाहासापाई बाहुलीशी खेळण्याच्या वयात तिच्या आयुष्याचा खेळ मांडला जातो अस का ?
हुंडाबळीच्या रूपाने स्त्रीला जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतात, अस का ?
बलात्कार या शब्दानेहि घाबरणाऱ्या फुलांना फुलण्या आधीच कुस्करून टाकले जाते, अस का?
शारिरीक सुखासाठी पिसाटलेल्या कुत्रांकडून देहाचे लचके तोडले जातात, अस का?
हे आणि असे असंख्य प्रश मनाला वेड लावून जातात, खिन्न करून सोडतात. पण याला कारानिभूत कोण? समाज कि स्वता स्त्री ?

यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता !!
हे संस्कृत मधील एक वचन आहे. याचा अर्थ असा कि, जिथे स्त्रियांना पूजले जाते त्यांचा आदर केला जातो तेथे देवाचे निवास असतो. पण आज आपल्या समाजात स्त्रियांना प्रत्क्ष्यात असे वागवले जात नाही. मंदिरात ज्या दुर्गेला, कालीकेला, पार्वतीला तुम्ही पुजता तिचेच स्वरूप समजल्या जाणारऱ्या स्तीयांची मात्र कित्येक घरात विटंबना होते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक स्त्री वा परस्त्री माते समान मानून तिला वंदिले पुजिले जाते. पण प्रत्यक्ष्यात तिला भोग्य वस्तू समजून अपमानित करतात. पण हे करणारे कोण?
एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतलेले हे नराधम. जे पुरुष प्रधान समाजाचा झेंडा मिरवतात तेच हे लांच्छनास्पद कृत्य करतात. आणि जिच्यामुळे या जगात आलेत तिलाच कलंकित करतात. आजची स्त्री कितीही शिक्षित असली, स्वताच्या पायावर उभी असली तरीही ति सुरक्षित नाही हे खरच आपल दुदैव आहे. हे सर्वकाही माझ्यासारख्याच विचारी मनांना अस्वस्थ करणार आहे.
आजची स्त्री मनातील कल्पना वास्तवात आणणारी, पुरुष प्रधान समाजात स्वताचे वेगळे स्थान निर्मान करणारी, जगातील असो वा घरातील सामाश्याशी चार-हात करणारी आणि घराचा कुटुंबाचा गढ राखणारी आहे. पण आकाशाला गवसणी घालू पाहणारी आजची स्त्री खरच एवढी सक्षम आहे का?
तिचे पंख छाटू पाहणाऱ्या या समाजात ती तग धरू शकेल का? याचे उत्तर आपल्यालाच शोधायचे आहे. अन्याय करणाऱ्यापेक्ष्या सहन करणारा अधिक दोषी असतो असे म्हणतात तेव्हा आता सहन करणाऱ्यापेक्ष्या शक्ती दाखवा, माझ्या गुन्हेगाराला मी धडा शिकवल्या शिवाय शांत बसणार नाही अशी शपथ घ्या. एका स्त्री करून स्त्री वर होणारे अन्याय व अत्याचार थांबवा आणि मुख्य म्हणजे आपल्याला बाळगायचाय अभिमान आपण स्त्री असण्याचा.आता वेळ आली आहे, सहनशक्ती पेक्ष्या फक्त स्त्री शक्ती दाखवण्याची आणि हे आपण अमलात आणल तरच आजच्या स्त्रिया या समजात उभ्या राहू शकतील आणि आपल खर स्थान आणि मान मिळवू शकतील.
स्त्रियांनीही इतिहास रचलाय, मा साहेब जीजाऊनि संस्काराच बाळकडू पाजून स्वराज्याची स्वप्न साकारण्यासाठी घडवला उभ्या महाराष्ट्राचा जाणताराजा. झाशीच्या राणीने मुलाला पाठीशी बांधून गाजावले रणांगण. आणि सावित्रीबाईनी दाखवली शिक्षणाची वाट. याचा विसर पडलेल्या पुरुष प्रधान समाजाला याची आठवण करून द्यायची खरच वेळ आली आहे.
माझ्या सर्व सखीना माझी हीच विनंती आहे, आपल्याला राचायाचाय एक नवा इतिहास, आपल्यासाठी आणि उद्या जन्माला येणाऱ्या आपल्या प्रत्येक चिमुरडी साठी. उठा, अभिमान बाळगा स्त्री असल्याचा आणि दाखवून द्या या जगाला आणि समाजाला, बांगड्यांचे वजन पेलणारे आमचे हे मनगट वेळ पडल्यास समशेरहि पेलू शकते...!

धन्यवाद...!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users