Submitted by हर्ट on 27 February, 2013 - 03:36
पुण्यात वाकड मधे घर घेण्याचे विचार माझ्या मनात रेन्गाळत आहेत. पण मी मात्र पुणेकर नसल्यामुळे फार काही काय काहीच माहिती नाही की वाकड रहायला कसे आहे.
थोडी माहिती मिळेल का ह्यावरः
१) टू बी ऐच के घर कितीला पडेल? ह्यात सर्व सुखसोयी असा एक प्रकार आहे उदा: पोहायला पुल खेळायला टेनिस कोर्ट. मला दोन्हीची गरज नाही. एक चान्गले सभ्य अपार्ट्मेन्ट हवे आहे. लिफ्ट, पाणी, वीज, रस्ते, झाडी ह्या माझ्या आद्य गरजा आहेत.
२) पुण्यात फिरायला यायचे झाल्यास वाकड जवळ आहे का?
३) मराठी लोक वाकड मधे आढळतील का?
४) घर घेतल्यानन्तर घराच्या किमती जोमाने वाढतील का? मीन्स अॅप्रीसियेट होतील का?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात आपले स्वागत असो.
पुण्यात आपले स्वागत असो.
३) मराठी लोक वाकड मधे आढळतील
३) मराठी लोक वाकड मधे आढळतील का?>>
कटु प्रश्न पण .... असो...
मराठी लोकही आहेत.
पण चांगल्या सोयीसुविधा देणार्या बिल्डिन्गमध्ये सर्व मराठीच असतील असं नाही.
बी वाकड विषयी फारसं माहिती नसल्याने सांगु शकत नाही.
त्यात बिल्डर लोकानी वाकडचा परीघ मोठा केलाय.
घराच्या किमती दणकुन आहेत. (हे मात्र मी माझ्या खिशाच्या परीघातुन बोलतोय )
त्या वाढतच चालल्या आहेत. (हा मागच्या ७-८ वर्षातला अनुभव बोलतोय)
पुण्यात फिरायला यायचे झाल्यास वाकड जवळ आहे का?>> पुण्यात नेमकं कुठे जायच आहे त्यावर उत्तर अवलंबुन आहे. बायपास रोडने कात्रज, वारजे, कोथरुड गाठणे खुप सोप्पे. तसेच शिवाजीनगर वै गाठणं सोप आहे. साधारण २० किमी मध्ये पुण्यात्ले बरेच येरीया कव्हर होतील. हडपसर वै थोडसं दुर वाटेल.
आधी तुम्हाला वाकड च का
आधी तुम्हाला वाकड च का पाहिजे? ते कळले तर बाकी उत्तरे देता येतिल
प्रसाद, नाही वाकडच पाहिजे
प्रसाद,
नाही वाकडच पाहिजे असा काहीच अट्टाहास नाही आहे. पण गेली काही महिने मी शोध घेत आहे पुण्यात नक्की कुठे चान्गली वसाहत आहे तर बर्याच जणान्नी मला वाकड नाव सुचवले. मी सिन्हगड रोड पाहिला. धायरी परिसर पाहिला. पिम्परी चिन्चवड पाहिला. चान्दणी चौक पाहिला. जवळच्या काही मित्रानी वाकड सुचवला म्हणून एकदा त्यावर अभ्यास करावा असे वाटले. म्हणून खरे तर हा बीबी मी उघडला आहे. धन्यवाद.
वाकड हा सामान्य मनुष्य
वाकड हा सामान्य मनुष्य प्राण्यांनी राहण्यासारखा एरिया नाही.
वाकड हा सामान्य मनुष्य
वाकड हा सामान्य मनुष्य प्राण्यांनी राहण्यासारखा एरिया नाही. >> का? माझे सासु सासरे सुद्धा तिथे घर बघत आहेत म्हणुन विचारले.
ते मुंबईला असतात, त्यामुळे पुण्यात आल्याबरोबर वाकड परिसर लागतो म्हणुन त्यांना ते सोयिचे पडणार होते म्हणुन ते तो एरिया बघत आहेत. किंमती खूप आहेत. पण तसे बघितले तर किंमति सगळिकडेच जास्त आहेत.
बा़की त्यांनि बाणेर, औंध, सिंहगड, खराडि असे बरेच भाग पाहिले. बाणेर/औंध मधे पाण्याची टंचाई आहे असे ऐकले -खरे आहे का ते?
बी पिंपळे सौदागर एरिआ पण बघ.
बी पिंपळे सौदागर एरिआ पण बघ. खूप छान आहे. वाकड पासून जवळच आहे.
आमचे घर आहे पिं. सौ मधे.
धन्यवाद सर्वान्चे.
धन्यवाद सर्वान्चे.
वाकडमध्येही पाण्याचा खूपच
वाकडमध्येही पाण्याचा खूपच प्रश्न आहे आणि सगळीकडे बोअरचे पाणी आहे असे ऐकलेय. नक्की माहीत नाही.
धन्यवाद शैलजा.
धन्यवाद शैलजा.
वाकड भलतेच महाग आहे, पाण्याचा
वाकड भलतेच महाग आहे, पाण्याचा प्रॉब्लेम तर आहेच आहे. परंतु पुण्यापासुन तसे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. ( स्वतःच्या वाहनाने अर्धा तास आणी पिंपरीचिंचवडपासुन वाकड १५ मिनिटाच्या अंतरावर आहे. )
फक्त हिंजेवडी आणी पुणे पनवेल बायपास जवळ हाच काय तो फायदा. त्यापेक्षा कोथरुड, वारजेला, औंध बाणेर मध्ये घर घेणे ठीक. नाहीतर रोजच्या प्रवासाची मानसीक, आर्थिक, शारीरीक तयारी असेल तर ( ऑफिस पुण्यात किंवा पुण्याबाहेर असेल तर ) पिंपरी चिंचवड मध्ये गुंतवणूक चांगलीच राहील. पुण्याची कुठलीही उणिव पिंचि मध्ये जाणवत नाही एवढे डेव्हलप झालेय.
कोथरुड मधे घरे मिळतात नवीन
कोथरुड मधे घरे मिळतात नवीन आता टुनटुन?
बी वाकड मधे बहुतेक ठिकाणी
बी
वाकड मधे बहुतेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवला जातो. मराठी वस्ती तशी कमी आहे.
हिंदी भाषिक लोक जास्त आहेत. रस्त्यांची कामं सद्ध्या चालू आहेत. पावसाळ्यात जरा प्रॉब्लेम होतो. कच्चा रस्ता असेल चिखल खुप होतो. बाकी मुंबईला वगैरे बरेचदा जाणे होत असेल तर सोईचे आहे.
पीएमटीच्या बसेसची फ्रिक्वेन्सीपण जरा कमी आहे.
काही ठिकाणी नवीन बांधकाम चालू
काही ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे. परंतु नुसती गुंतवणूक म्हणून ( म्हणजे तो flat भाड्याने द्यायचा असेल तर वाकड, औंध बरे कारण आयटी पार्कमुळे फायदा ) पण तुला जर कायमचे रहायचे असेल तर पुण्यातच बघणे उत्तम, मात्र पुण्यात विमाननगर, येरवडा, कल्याणीनगर बघुच नकोस, तिथे पाण्याची जाम कटकट आहे. कॉर्पोरेशनचे पाणी तिथे पोहोचणे ( शक्य असले तरी गुंडांची लॉबी तिथे पाईपलाईन टाकुच देत नाहीये ) शक्य नाही.
सिंहगडरोड का नको? सनसिटी वगैरेत अजूनही बर्यापैकी वाव आहे गुंतवणुकीला. डिएसके पण ठीक. तरीही नेटवर बघ.
खूप छान माहिती मिळत आहे. मदत
खूप छान माहिती मिळत आहे. मदत होते ती अशीच. विचार करायला लावत आहेत तुमची मते. धन्यवाद.
मला सनसिटी डीऐस्के माहिती नाही काय आहे ते.
धायरी हा भाग कसा आहे? तिथे एक चान्गले घर मिळत आहे. पुढे मागे मी नक्की कुठे राहीन अजून सान्गता येत नाही पण एक छोटेसे घर रहाय पुरते घेणे गरजेचे वाटते. माझ्या गरजा फारच सिमित असतात. मला फार लखलखाट आवडत नाही. सोसायटी बिल मला कमी हवे आहे.
कोथरुडात चा.न्गला फ्ल्ट नवीन मिळू शकेल का?
बी अंजली म्हणते तसे पिंपळे
बी
अंजली म्हणते तसे पिंपळे सौदागर एरिया नक्कीच चांगला आहे. आणि फक्त बेसिक अमेनिटीज असलेल्या बर्याच स्कीम्स आहेत तिथे.
कोथरुडात चा.न्गला फ्ल्ट नवीन
कोथरुडात चा.न्गला फ्ल्ट नवीन मिळू शकेल का? >> २BHK फ्लॅट ८० लाख - १ कोटीच्या आसपास मिळेल.
कोथरुडच काय पिंपरी चिंचवडला
कोथरुडच काय पिंपरी चिंचवडला सुद्धा 2 BHK ७० ते ८५ लाखापर्यंत गेलयं.
एक मात्र आहे की कारण नसतांना स्विमिंग पुल, टब ( बाथरुमध्ये ) अशा अनावश्यक सोयी माथी मारल्या जात आहेत. काही ठिकाणी पिण्यास पाणी नसताना अशी पाण्याची उधळपट्टी का केली जाते माहीत नाही.
पण सोलर सिस्टीम वगैरे असेल तर जरुर घ्यावे, बाकी बचत होऊ शकते. आजकाल सोलर नवीन बांधकामात आवश्यक सोय म्हणून देतात.
बी आधी तू तुझ्या अगदी जरुरी गोष्टींचा विचार कर आणी मगच गुंतवणूक कर.
पिंपरी चिंचवडला सुद्धा 2 BHK
पिंपरी चिंचवडला सुद्धा 2 BHK ७० ते ८५ लाखापर्यंत गेलयं.>>>फक्त आणि फक्त काहीच मोठ्या बिल्डर्सच्या स्कीम मध्ये आहेत हो एवढे रेट्स.
अजुन तरी येरीया, लोकेशन, अमॅनिटीज ह्यानुसार विचार कराल तर ३५ लाख ला देखील मिळेल २ बीएचके.
आजकाल सोलर नवीन बांधकामात आवश्यक सोय म्हणून देतात>>> कम्प्लीशन सर्टिफिकेट साठी कम्पल्सरी आहे असं ऐकतोय. शिवाय मिळकत कर (प्रोपर्टी टॅक्स) मध्ये सुट मिळते.
आम्ही गेल्या ऑगस्ट मधे वाकड
आम्ही गेल्या ऑगस्ट मधे वाकड मधे घर घेतलं. मार्च मधे ताबा मिळेल असं सद्ध्या तरी सांगितलं आहे.
आमच्या बजेट मधे पिंपरी-चिंचवड, पिंपळे सौदागर, बाणेर इथे घर मिळणं शक्य नव्हतं. त्यातल्या त्यात वाकड अजुन स्वस्त आहे बाकीच्या जागांपेक्षा.
सद्ध्या भारतात नसल्यामुळे तिथे रहायला येइपर्यंत बाकीच्या सोयी होतील अशी अपेक्षा आहे.
भावना, अभिनन्दन घर
भावना, अभिनन्दन घर घेतल्याबद्दल. घर घेणे हे फार मोठे स्पप्न असते प्रत्येकाचे. त्यात पुण्यासारख्या शहरात घर म्हणजे केवधी तरी मोठी गोष्ट!!!! तु मला स.पर्कातून तुझा दुरध्वनी क्रमान्क पाठवतेस का? घरासम्बन्धी थोडे विचारयचे होते.
बापरे हे गुगल क्रोम प्रकरण फारच त्रासदायक आहे इथे लिहायला.
बाणेर/औंध मधे पाण्याची टंचाई
बाणेर/औंध मधे पाण्याची टंचाई आहे असे ऐकले -खरे आहे का ते? >>>>>>>>
बाणेर चे माहित नाही, पण औंध मधे तरी नक्किच नाही, ईथे पाणी आणि वीजकपात नाहीच आहे असे म्हणाले तरी चालेल....
आमच्या बजेट मधे
आमच्या बजेट मधे पिंपरी-चिंचवड, पिंपळे सौदागर, बाणेर इथे घर मिळणं शक्य नव्हतं. त्यातल्या त्यात वाकड अजुन स्वस्त आहे बाकीच्या जागांपेक्षा.??/
वाकड ला पिंपळे सौदागर पेक्षा कमी दर आहेत?
>>वाकड ला पिंपळे सौदागर
>>वाकड ला पिंपळे सौदागर पेक्षा कमी दर आहेत?
निदान आम्हाला ठीक वाटलेल्या स्कीम्स मधे तरी. कदाचित बाकी ठिकाणी कमी रेट असेल ही. प्रत्येकाचे क्रायटेरिया वेगळे असु शकतात.
पुण्यात भाड्याने घर द्यायचे
पुण्यात भाड्याने घर द्यायचे बिल्डर पैसे घेतात का? आमचे घर आता १ महिन्यात तयार होणार आहे, बिल्डर तर्फे घर भाड्याने द्यायचे तर तो २ महिन्यांचे भाडे मागतो आहे. माझ्या माहिति नुसार बिल्डर भाडेकरुन भाडे घेतात. हे काहि नविन निघाले आहे का ओनर कडुन २ महिन्यांचे भाडे घ्यायचे?
प्रिया७ , तुमची माहिती खरी
प्रिया७ ,
तुमची माहिती खरी आहे.वरील प्रकार खूप वर्षांपूर्वी होता.