Submitted by भालचन्द्र on 26 February, 2013 - 11:26
हा एक वैषिष्ठ्यपूर्ण मोठा पक्षी आहे......
चोचीच्या विशिष्ट आकारामुळे याला कुदळ्या असंही एक नाव आहे. याच्या डोक्यावर लाल पागोटं आणि कुशीवर पंखात पांढरा ठिपका असतो. पाणपक्षी असला तरी याला पाणी हवंच असं नाही. माळावर, शेताच्या बांधावर व इतर ठिकाणी दिसू शकतो. मासे, बेडूक, सरडे, किडे हे त्याचं खाद्य. अत्यंत कर्कश अवाजात ओरडतो !!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो सुंदरच आहेत. ( तूम्ही
फोटो सुंदरच आहेत.
( तूम्ही कॅमेरा बदलला आहे का ? फरक वाटतोय आधीच्या आणि या फोटोत. )
तूम्ही विहंग हा शब्द वापरलात ते फार छान वाटले. थोडे अस्थानी आहे, पण पं. गोकुलोत्सव महाराज यांनी
बिहाग, या रागाच्या नावाचा, या शब्दाशी संबंध लावला होता. एका उडणार्या पक्ष्याच्या लयीचा भास या रागात होतो.
( विमला अधर निकटी मोह / लट ऊलझी सुल़झा जा / देखो मोरी रंग मे भिगोये डारी.. वगैरे रचना )