घरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेले सर्पोदयान पाहण्याचा आज सकाळी विचार आला मग काय मुलाला घेऊन सर्पोदयानाचा रस्ता धरला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या सहल केंद्रातील एक प्रकल्प आहे. शाहूनगर (चिंचवड) येथे हा प्रकल्प आहे. शहराची वाढती लोकसंख्या याही ठिकाणी आपणास पाहयला मिळते. पूर्वी आजूबाजूचा परिसर रिकामा होता. आता जिकडेतिकडे इमारती, सुंदर बंगले उभे राहिले आहे.
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी हे लहान मुलांचे आकर्षण आहे. येथे माकड, साप, मोर, मगर, बिबटय़ा, पोपट, गव्हाणी घुबड अन्य पक्षी पाहायला मिळतात. सायंकाळी पावणोसहा वाजता उद्यान बंद होत असल्याने लहान मुलांना उद्यान बघता येत नाही. मे महिन्याच्या सुटीत देखील उद्यानाची वेळ कमी असते. कात्रज सर्पोदयानापेक्षा येथे प्राणी कमी आहेत. मात्र, जास्त न चालता ब:यापैकी प्राणी पाहाण्यास मिळण्याचा आनंद घेता येतो. आजुबाजूला सुंदर झाडी लावली आहे. लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा येथे आहे. उद्यानात सध्या सापांसाठी दोन मोठे कुंड आहेत. सापांचे प्रजोत्पादन केंद्र, एक प्रयोगशाळा व तात्काळ सेवा केंद्र असे विभाग आहेत. प्राण्यांसाठी स्वतंत्र दालन व पक्षांसाठी ¨पज:यांची व्यवस्था आहे.
सर्पोद्यान पिंपरी-चिंचवड परिसरात आढळलेले साप, कासव, दुर्मिळ पक्षी आणून त्यांच्यावर उपचार करून पुन्हा निसर्गात सोडून देण्याचे चांगले काम होत असते. सर्पमित्र या कामात मदत करतात. सर्पोदयानाचे संचालक अनिल खैरे आहेत. दरवर्षी नागपंचमीला या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा केला जातो. सापांबद्दल असलेल्या गैरसमजूती व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम यावेळी केले जाते. परिसरातील अनेक शाळांची सहल या ठिकाणी नेहमीच येते. त्यामुळे लहान मुलांची गर्दी या ठिकाणी नेहमीच आढळून येते.
कसे जावे :
पुण्याहून येणार असला तर पुणो-मुंबई रस्त्यावरून मोरवाडीमार्गे (पिंपरी) केएसबी चौकातून डाव्या बाजूला वळून पुन्हा निगडीकडे जायला लागायचे. बर्ड व्हॅली रस्त्यावरच आहे. तेथून थोडे पुढे गेली की वृंदावन सोसायटीकडे जाण्याचा मार्ग आहे. उजव्या बाजूला बहिणाबाई सर्पोद्यानाची पाटी दिसते. नवीन माणसाला थोडे चुकण्याचा संभव आहे. म्हणून कमलनयन बजाज शाळेमागे पोहचल्यावर रस्ता विचारायला हरकत नाही. मुंबईकडून थरॅमक्स चौकातूनही येता येते.
अजून काय पाहाल :
सर्पोदयानापासून पुढे भक्तीशक्ती शिल्प, बॅर्ड व्हॅली, शिरगावचे साईबाबा मंदिर, देहूगाव, असा एक दिवसाची मस्त भटकंती होऊ शकते. सर्पोदयान पाहायला 1 तास पुरेसा होतो.
तिकीट दर व वेळ :
उद्यानाची वेळ सकाळी 10.30 ते 5.30 (दुपारी 2 ते 3 बंद) मंगळवारी बंद.
लहान मुलांसाठी 5 रुपये (वय 12 वर्षाआतील), प्रौढांना : 10 रुपये प्रत्येकी अशी आहे.
http://ferfatka.blogspot.in/
फेरफटका, छान माहिती दिलीत !
फेरफटका, छान माहिती दिलीत !
फेरफटका उपयुक्त माहिती.
फेरफटका उपयुक्त माहिती. धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद