Submitted by विशाल कुलकर्णी on 25 February, 2013 - 10:10
मोजके आयुष्य आणिक आठवांचा त्रास आहे
आज माझ्या वेदनेला लाघवी सहवास आहे
हात हाती घेतला, तेव्हा हसावे लागलेले
साथ आता आसवांची जाणिवांना खास आहे
तो तुझा रस्ता असावा, वाट माझी संपलेली
तू पुन्हा येशील परतुन आस ही हमखास आहे
हरवल्या बघ सावल्याही एकटा आहे कधीचा,
झोंबणारे श्वास त्यांचे..., गारव्याची आस आहे
आसमंती दरवळावा, का विखारी मोगराही...?
आजही वेड्या मनाला आर्जवी गळफास आहे
विसरणे का शक्य नाही? सांग ना तुजला 'विशाला',
घेतला तर श्वास वेड्या..., सोडता नि:श्वास आहे !
विशाल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप दिवसांनी मायबोलीवर
खूप दिवसांनी मायबोलीवर वा
गझल वैयक्तिकरित्या फारशी इंट्रेस्टिंग नाही वाटली क्षमस्व
"हात हाती घेतला, तेव्हा हसावे
"हात हाती घेतला, तेव्हा हसावे लागलेले
साथ आता आसवांची जाणिवांना खास आहे
तो तुझा रस्ता असावा, वाट माझी संपलेली
तू पुन्हा येशील परतुन आस ही हमखास आहे" >>> हे दोन शेर सर्वात आवडले.
गझल ठीकठाक वाटली, काही खयाल
गझल ठीकठाक वाटली, काही खयाल मला नीट क्लीअर झाले नाहीत.
पु ले शु
गझल आवडली हरवल्या बघ
गझल आवडली
हरवल्या बघ सावल्याही एकटा आहे कधीचा,
झोंबणारे श्वास त्यांचे..., गारव्याची आस आहे
आसमंती दरवळावा, का विखारी मोगराही...?
आजही वेड्या मनाला आर्जवी गळफास आहे................... हे दोन शेर नाही समजले.
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
ठीक
ठीक
वेडामामा, आम्ही आपल्याला
वेडामामा, आम्ही आपल्याला ओळखले आहे. सुंभ जाळला तरी पीळ कायम आहे.
खवटुन्निसा, ते पर्यायपाखरू
खवटुन्निसा, ते पर्यायपाखरू आहे. ते हात हालवून उडवले तरी थोड्या वेळाने परत येणारच. येऊदेत. आपण पडलो स्वभावाने गरीब, आपण फक्त बघत बसायचं.
(No subject)