सातकापे aka सातकप्पे घावन

Submitted by शैलजा on 23 February, 2013 - 09:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घावन बनवण्यासाठी - २ वाट्या तांदूळ पिठी, २ वाट्या नारळ पाणी आणि चवीसाठी मीठ

सारण बनवण्यासाठी - १ वाटी खवलेले खोबरे,
साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ,
अर्धा चमचा वेलची पूड
१ टेस्पू खसखस

तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम गॅसवरील पातेल्यात १-२ चमचे तूप घालून त्यात खोबरे, गूळ, वेलची पूड, खसखस हे एकत्र करुन सारण बनवून घ्या व थंड करायला ठेवा.
२ .घावनासाठी पीठ तयार करताना तांदळाच्या पिठीमध्ये नारळपाणी घालत हलवत रहा, कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असे पहावे. चवीपुरते मीठ घालावे.
३. तवा गरम करुन त्यावर आधी तेल सोडावे व त्यावर घावनाचे पीठ घालावे (डोश्याप्रमाणे) बाजूने तेल सोडावे.
४. घावन खालून सुटू लागले की त्यातील अर्ध्या भागात सारण पसरावे व उरलेला अर्धा भाग त्यावर उलटून झाकावा. - १ ला कप्पा
५. रिकाम्या अर्ध्या भागात आता पुन्हा घावनाचे पीठ घालावे व तो भाग शिजत आला की त्यावर सारण पसरुन, आधीचा कप्पा त्यावर उलटावा - २ रा कप्पा.

असे ७ कप्पे होईतोवर करायचे व सातवा कप्पा झाला की खाली उतरवायचे..

थंड झाले की गट्टम् करायचे! कोणी केले तर प्लीज फोटो टाका.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक, आई, आज्जी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मादिकांनी माबोगणेशोत्सव स्पर्धेसाठी वेगवेगळ्या सारणांचे ३-५ कप्प्यांचे घावण करण्याचा प्रयोग केला होता. संपूर्ण तांदुळपिठीऐवजी थोडे बाजारचे तांदूळ पीठ वापरल्याने ( Wink ) घावन दुडताना तुटत होते.
लहानपणी आईने तांदूळ धुऊन जुन्या साडीच्या घडीवर सुकत घातले की घावनाचा बेत आहे हे लक्षात यायचे.

घावन घडीवर तुटल्याने प्रयोग फसला की! त्यामुळे स्पर्धेला कृते दिली नाही. मग गोडाचा बेत रद्द करून तिखटाची कृती केली होती.
टीव्हीवरच्या एका मराठी कुकरी शोमध्ये एका बल्लवाचार्यांनी सारण भरलेली घावनाची अख्खी घडी बाजूला उचलून ठेवली, नवा घावन घातला, त्यावर अर्ध्या भागात सारण पसरून उरलेल्या अर्ध्या भागात ही आधीची घडी साळसूदपणे ठेवली. Lol
बंगाल्यांमध्येही पाटीशॉप्ता हा असाच एक पदार्थ आहे. पण नेटवरच्या कृती एकाच घडीत गुंडाळलेल्या दिसतात.

प्रॅडी, मयेकर म्हणतात, तसेच आहे माझ्याही आठवणीत. उकडीची पिठी वापरायला हरकत नसावी. केलेस तर फोटो टाक.

आधीची घडी साळसूदपणे >> मलातर तितकंही सुचलं नसतं! Lol

फेवरेट पदार्थ्....माझी ताई ५ कप्प्यांचे करते. पुढ्च्या वेळी केले की तिला सांगेन फोटो पाठवायला. ही रेसिपी वाचून मला रस शेवयांची आठवण आली.

ही रेसिपी वाचून मला रस शेवयांची आठवण आली. >>> आणि मला तुमची प्रतिक्रिया वाचून खापरोळ्या आणि रसाची Happy

प्रॅडी, मोदक पिठी वापरुन पाहिली. तुटलं पहिलं घावन, नंतरची २ बरोबर झाली. अर्थात, शक्यता बर्‍याच आहेत की मला नीट करता आलं नसावं ही मोठ्ठी आणि मग बाजारची मोदक पिठी, तवा नीट तापला नसावा वगैरे वगैरे Wink

सामी, खापरोळ्या नक्की कशाच्या असतात माहित नाही , तयार पीठ असेल तर मला बनवता येतात Happy

मिश्र पीठं असतात , पण कधी फार खोलात शिरले नाही .
साधारण तळव्याच्या आकारच्या लुसलुशित पोळ्या , गरम्गरम असताना खोलगट ताटलीत घ्याव्यात , त्यावर नारळाचा थंड रस ओतावा. अगदी गिचका होउ न देता हळुहळू चमच्याने तोडत एक एक घास खावा.

गरम पोळी , वरचा भाग मउ , तळ कुर्कुरीत , थंड रस असं अप्रतीम रसायन , डिसेम्बरच्या थंडीत ,रविवारी सकाळच्या नाश्त्याला तोंडात विरघळत तो क्षण .. heavens !

कोकणातल्या बहुतेक लोकांना ठाउक असेल असे वाटते .

आईला विचारुन अधिक माहिती टाकेन .. पुढेमागे

थँक्स शैलजा. मीही मोदक पिठी वापरूनच करून बघीन म्हणते. विस्मरणात गेलेल्या पदार्थांवर लोकसत्ताच्या एका आर्टिकलची लिंक मिळाली होती. त्यात आहेत खापरोळ्या.
http://www.loksatta.com/daily/20090815/ch08.htm

कारणाशिवाय खूप खूप फ्रस्टेशन आलेल्या एका वीकेंडला मी ही रेसिपी केली.
गोडाअ‍ॅवजी तिखट.
एक लेयर नारळा ची चटणी, एक कांदा, एक टोमॅ टो, एक शिमला मिर्ची, एक पनीर, एक पुन्हा नारळ चटणी, एक मिक्स असं करोन.
खूप अवघड असेल हा प्रकार असं वाटलेलं, पण तसं अवघड नाही गेलं समहाऊ.
कदाचित बरीच वर्ष धिरड्यांच्या प्रेमात काढल्याचा परिणाम असावा.

फोटॉज आहेत , पण सध्याचं स्केड्युल बघता २-४ महिन्यांनी टाकेन Happy

रेसिपी करता थँक्स.
प्रयोग करताना मूड नॉर्मलला आला. Happy

इटीव्हीवरच्या मिसेस अन्नपूर्णा या कार्यक्रमाच्या एका भागात हे घावन केले गेले होते.
http://www.youtube.com/watch?v=5tASqVkK1NU
दहाव्या मिनिटापासून बघा.

पण शेफ पराग कान्हेरेंना घावनापेक्षा मुगाचे कढण भारी वाटले !

नानबा, चार महिने झाले. Happy

शैलजा, मी पण करते हा प्रकार पण फक्त २ कापेच.... माझा नवरा म्हणतो ही तर मोठी करन्जीच... पण हा प्रकार काय लागतो ना... खमन्ग, लुसलुशीत... केव्हा खाउन सम्पला कळत देखील नाही.. तर त्याचा फोटो कधी काढायचा ?.... झालारे झाला की खायची घाई होते.

Pages