सातकापे aka सातकप्पे घावन

Submitted by शैलजा on 23 February, 2013 - 09:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घावन बनवण्यासाठी - २ वाट्या तांदूळ पिठी, २ वाट्या नारळ पाणी आणि चवीसाठी मीठ

सारण बनवण्यासाठी - १ वाटी खवलेले खोबरे,
साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ,
अर्धा चमचा वेलची पूड
१ टेस्पू खसखस

तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम गॅसवरील पातेल्यात १-२ चमचे तूप घालून त्यात खोबरे, गूळ, वेलची पूड, खसखस हे एकत्र करुन सारण बनवून घ्या व थंड करायला ठेवा.
२ .घावनासाठी पीठ तयार करताना तांदळाच्या पिठीमध्ये नारळपाणी घालत हलवत रहा, कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असे पहावे. चवीपुरते मीठ घालावे.
३. तवा गरम करुन त्यावर आधी तेल सोडावे व त्यावर घावनाचे पीठ घालावे (डोश्याप्रमाणे) बाजूने तेल सोडावे.
४. घावन खालून सुटू लागले की त्यातील अर्ध्या भागात सारण पसरावे व उरलेला अर्धा भाग त्यावर उलटून झाकावा. - १ ला कप्पा
५. रिकाम्या अर्ध्या भागात आता पुन्हा घावनाचे पीठ घालावे व तो भाग शिजत आला की त्यावर सारण पसरुन, आधीचा कप्पा त्यावर उलटावा - २ रा कप्पा.

असे ७ कप्पे होईतोवर करायचे व सातवा कप्पा झाला की खाली उतरवायचे..

थंड झाले की गट्टम् करायचे! कोणी केले तर प्लीज फोटो टाका.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक, आई, आज्जी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स... मी खाल्लेत हे घावने.... फक्त फरक इतकाच्,की कधी कधी ओल्याऐवजी सुके खोबरे वापरले जायचे.

नुसते सारणही रापचिक लागते.

आमच्या बेटर हाफने मला हे एकदा चारकापे घावन करून खाऊ घातले होते. सातकापे जमले नाहीत, त्याला तवा फार मोठा लागतो म्हणे!!

शैलजा, ़ कालची गुळ्चुन वाली रेसिपी वाचून , सातकापे घावन आठवले. आज ़ केले पण Happy
मात्र माझी मजल तीनापर्यंतच .

अरे वा इन्ना! क्या बात Happy शिरवळ्यांची ना, हो, लिहूयात. Happy
एकदा आता मीही करुन पाहते सातकापे.

मस्त. ऐकलेय या रेस्पी बद्दल पण कधी खाल्ले नाहीयेत. शैलजा आता तुझ्याकडे येणारे हे खायला. नैतर इन्नाकडे तरी, निदान तीनकापे तर मिळतील Wink

मस्तच , पण ते कप्पे प्रकरण अवघड दिसतय.त्यामुळे घावनाला सारण लाऊन खाल्ल तर ??
कधी करतेय्स ? लव्करच कर आणि मला बोलव Proud मुहुर्त बघू नकोस करायला पण आणी बोलवायला पण Proud

मस्त रेसिपी शैलु. दोन्ही रेसिपीज आवडल्यात. मी कधीच कोकणी पदार्थ ऐकले, पाहिले अथवा खाल्ले नाहीयेत त्यामुळे नवीन पदार्थ कळलेत.
सात कप्पे वाचुन आपल्याला काय हे सात जन्म जमणार नाय हे कळले Happy हे आयते मिळवायचे असेल तर तुझ्याकडे यावे ़कसे तो विचार करतेय Wink
कोकणातले लोक फारच निगुतीने कौशल्याने स्वैंपाक बनवतात असे वाटते.

हा प्रकारही एकदम सह्हीच आहे Happy हे करतानाचा व्हिडीओ असेल तर समजायला जरा सोपे जाईल.

ते सात कप्पे जमणं जरा अवघडच वाटतय पण.... २-४ कप्पे बनवायचा प्रयत्न जरुर करणार.

प्रिन्सेस, स्मि या नक्की Happy

लाजो व्हिडिओ नाही, पण फोटो टाकेन मी. येत्या वीकांताला मीच करुन पहावे म्हणते Wink

>>मस्त! या जुन्या पाकृ लिहून ठेवायचं फार मोठं काम करते आहेस तू!>> +१
नंदिनी, तुझ्या बेटर हाफ ना _/\_ ! चार कापे म्हणजे भारीचे ग!

पातोळे, पानगे, मोदक, सगळे स्टीम्ड पदार्थ म्हणजे जीव की प्राण. धागा, प्रतिसाद वाचताना अतिशय आनंद होऊन तोंडाला पाणी सुटत आहे

नीलू, ती वरची लिंक दिल्यामुळे कळायला मदत झाली. कसले भारी दिसतायत.
सगळं साहित्य इथे मिळतं तेव्हा करायला हरकत नाही.

प्रॅडी, तू दिलेली सातकाप्यांची लिंक घरुन पाहते. शिरवळ्याच्या लिंकबद्दल धन्यवाद.
दाद, सेम पिंच! Wink

Pages