Submitted by योगितापाटील on 23 February, 2013 - 06:01
जरा जराश्या
होत्या जरा जराश्या संवेदना उराशी
केला करार होता माझ्याच जाणिवांशी
जगतो सुखात आहे ना वानवा कशाची
प्रत्येक शब्द खोटा हा बोललो तुझ्याशी
ती रीत पूर्वजांची मी पाळतोच आहे
बघ पूर आसवांचे मी रोखले स्वतःशी
वस्तीत भय कशाचे आश्वासने मिळाली
नुकताच भेटलो मी रस्त्यात सज्जनांशी
जिंकू तरी कसा मी शस्त्रे तुझ्याच हाती
हा डाव एकतर्फी हरलोच प्राक्तनाशी
त्यांचेच लाड केले तडजोड ना कधीही
आता न बंध उरला बेबंद भावनांशी
माझेच आप्त होते केलेत वार ज्यांनी
नाराजगी कशी मग धरणार आसवांशी?
हटकून जे मिळाले ते दुखः प्यार आहे
जमलेत सूत आता सगळ्याच वेदनांशी
घरट्यात या उन्हाच्या मी घेतला विसावा
झगडून फार थकलो या क्रूर सावल्यांशी
-योगिता पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठिक ठिक गझल. खयाल बरेचसे
ठिक ठिक गझल. खयाल बरेचसे जुनेच आलेत.
पु.ले.शु!
घरट्यात या उन्हाच्या मी घेतला
घरट्यात या उन्हाच्या मी घेतला विसावा
झगडून फार थकलो या क्रूर सावल्यांशी
छान शेर. शामशी सहमत.
गझलेत दहा-पंधरा शेरच हवेत असे नाही.
एखाद-दुसरा परिपूर्ण शेर पुरेसा आहे.
दीवान-ए-गालिब मधे एका शेराच्या दोनेक गझल (फुटकर नव्हे) आहेत.
वस्तीत भय कशाचे आश्वासने
वस्तीत भय कशाचे आश्वासने मिळाली
नुकताच भेटलो मी रस्त्यात सज्जनांशी
हे आवडले.ले.शु.
मस्त गझल . काही शेर छानच जमून
मस्त गझल .
काही शेर छानच जमून आले आहेत .
आवडली .
dhanywad rajiv
dhanywad rajiv
घरट्यात या उन्हाच्या मी घेतला
घरट्यात या उन्हाच्या मी घेतला विसावा
झगडून फार थकलो या क्रूर सावल्यांशी<<<
वा छानच
शेवटचा सर्वात आवडला.
शेवटचा सर्वात आवडला.
"" खरच खूप छान "" " पडलो
"" खरच खूप छान ""
" पडलो बाहेर या दु:खांचे दिवे बुझवाया !
अनुभवास आले हा वणवाच पेटलेला !! "
विजय जोशी - डोंबिवली
शेवटचा शेर आवडला.
शेवटचा शेर आवडला.
बेफिकिर सर , ulhas sir aani
बेफिकिर सर , ulhas sir aani vijay squre khup khup dhanyawad ,khar mhanje pahili pratikriya vachun sagala utsahcha mavalala hota aani mayboliche vachak aani fb che vachak yanchyat etaka farak ka asahi prashn padala hota pan aata jara bar vatatay , dhanywad