गूळचून घालून केलेले ओले काजू (मवला वा मोवला असेही नाव आहे )
ओले काजू
एक नारळ खवणून
१ वाटी गूळ
१ टेबलस्पून पातळ तूप
१ चमचा - वेलची व जायफळ पूड (दोन्ही अर्धा, अर्धा चमचा घ्यावे)
चवीला मीठ
गूळचुनातील राजेळी केळी
६ पिकलेली राजेळी केळी
नारळाची अर्धी वाटी खवणून
पाव किलो गूळ
वेलची + जायफळ पूड एक चमचा
१ टेबलस्पून साजूक तूप
४-५ लवंगा
गूळचून घालून केलेले ओले काजू
१. थोडे पाणी घालून ओले काजू मऊ शिजवून घ्यावेत. निथळत ठेवावे.
२.गॅसवर पातेले ठेवून त्यात तूप घालून गूळ खोबर्याचे सारण एकत्र करुन घ्यावे, त्यात जायफळ व वेलचीची पूड घालावी.
३. त्यावर आता शिजवलेले ओले काजू घालून हलक्या हाताने ढवळावे व एक वाफ काढावी. होता होईतो काजू मोडणार नाहीत हे पहावे.
गूळचूनातील राजेळी केळी
१.केळ्यांच्या साली काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत व सारण भरण्यासाठी केळ्यांना चिरा द्याव्यात.
२. गूळ, खोबरे व वेलची + जायफळ पूड एकत्र करावे व हे सारण केळ्यांमध्ये भरावे.
३. गॅसवर लंगडी ठेवून त्यात तुपाची फोडणी करुन लवंगा घालाव्यात.
४. लवंगा तडतडल्या की त्यात की भरली केळी आडवी ठेवून मंद गॅसवर एक वाफ आणावी.
५. एका वाफेनंतर केळी उलटावी व पुन्हा ५ मिनिटे ठेवून अजून एक वाफ आणावी.
वाटल्यास वरुन तूप घालता येईल. एक हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.
गॅस मंद असणे आवश्यक.
:लाळेचे ठिबक सिंचन करणारा
:लाळेचे ठिबक सिंचन करणारा बाहुला:
एक हळदीचे पानही सोबत घातल्यास
एक हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.>>>> म्म्म्म्म्म्म...पातोळ्या आठवल्या.
मस्त आहेत पदार्थ दोन्ही. कधी येऊ?
प्राची, कधीही ये. बाबु
प्राची, कधीही ये.
बाबु
बाबु+१
बाबु+१
स्लsssर्प !
स्लsssर्प !
वॉव मी प्रथमच ऐकले हे
वॉव
मी प्रथमच ऐकले हे पदार्थ!
काजु ओलेच का हवेत आणी राजेळी केळी म्हणजे ती लहान आकाराची केळी ना..
गुळचुन म्हणजे गुळ-खोबरे
गुळचुन म्हणजे गुळ-खोबरे का?
ओले काजु म्हणजे काजुचे फळ की काजुगर?
हो, गूळ आणि खोबरे. ओले काजू
हो, गूळ आणि खोबरे. ओले काजू म्हणजे काजूच्या फळाला जी बी असते त्याचा गर.
मस्त.
मस्त.
अहाहा! दोन्ही खासच लागणार!
अहाहा! दोन्ही खासच लागणार!
फुकट ते पौष्टिक फुकट तिथे
फुकट ते पौष्टिक
फुकट तिथे प्रकट
फुकट तिथे उपट
फुकट मिळेल तिथे दुप्पट गिळेल
आणि फुकट तिथे फ्यामिलीसकट या पंचओळी मंत्रानुसार मिलालं तर बरंच :p
खासच! गुळ खोबरं वाली राजेळी
खासच!
गुळ खोबरं वाली राजेळी केळी आई करायची
आहाहा पाकृ वाचतानाच तोपासु.
आहाहा पाकृ वाचतानाच तोपासु.
यम्मी . राजेळी केळी खाल्ली
यम्मी . राजेळी केळी खाल्ली आहेत, गूळचूनातले ओले काजू कधी खाल्लेले नाहीत.
<<< राजेळी केळी म्हणजे ती लहान आकाराची केळी ना
राजेळी म्हणजे मोठी केळी. लहान केळ्यांना वेलची केळी म्हणतात. राजेळ्यांचा हा नेट्वर सापडलेला फोटो.
ओह्ह्ह धन्स संपदा!
ओह्ह्ह
धन्स संपदा!
वोक्के. भारीये!!
वोक्के. भारीये!!
भारी आहे एकदम. क हळदीचे पानही
भारी आहे एकदम.
क हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.>>>> म्म्म्म्म्म्म...पातोळ्या आठवल्या.>>> अगदी अगदी, कित्येक वर्षात खालेल्या नाहीत.
शैलु कधी भेटूयात मग ?
स्मिता, मुहूर्त बघायला घेते
स्मिता, मुहूर्त बघायला घेते
ह्म्म्म!!! खायला मिळालं तर मग
ह्म्म्म!!! खायला मिळालं तर मग फार भारिये
मला ओले काजू
मला ओले काजू
अहाहा! ओले काजू! (दोन्ही
अहाहा! ओले काजू!
(दोन्ही पा.कृ. मिष्टान्न क्याटेग्रीतल्या असल्याने त्यांना नो 'अहाहा!' :फिदी:)
लले, पण ह्या साखरवाल्या
लले, पण ह्या साखरवाल्या नैयेत. गूळ्वाल्या हैत. साखरेपेक्षा गूळ कधीही बरा. की तू एकदमच नो गोड गोड?
:लाळेचे ठिबक सिंचन करणारा
:लाळेचे ठिबक सिंचन करणारा बाहुला:
धन्यवाद करुन पहा आणि सांगा.
धन्यवाद
करुन पहा आणि सांगा. केळ्याचा प्रकार आपली नेहमीची केळी घेऊनही करता येतो, पण ही केळी राजाळी केळ्यांइतकी गोडीला नसतात. तेह्वा दुधाची तहान ताकावर ह्या न्यायाने साधी केळी किंवा फारतर वेलची केळी वापरुन करायचे ओल्या काजूंना मात्र पर्याय नाही!
सिंधुदुर्गात प्रत्येक चहाच्या
सिंधुदुर्गात प्रत्येक चहाच्या हाटेलात मिळणारे चुनकाप आठवले.
तोंपासु गूळचून म्हणजे गूळ का
तोंपासु
गूळचून म्हणजे गूळ का ? मला गूळ आणि चुना वापरुन केलेले पदार्थ असं वाटलं शीर्षक वाचून.
अगो गूळ आणि खोबर्याच्या
अगो गूळ आणि खोबर्याच्या सारणाला गूळचून म्हणतात
चूनकाप >> स्लर्र्प!
अगं, गुळाच्या पोळीच्या गुळात
अगं, गुळाच्या पोळीच्या गुळात चुना घालायची पद्धत आहे असं कुठेतरी वाचलं होतं म्हणून विचारण्याची हिंमत तरी केली
आता चुनकाप म्हणजे काय ते ही सांग. चून म्हणजे खोबर्याचं सारण हे कळलं. कापं म्हणजे फोडी का ?
नाही, कापं म्हणजे वड्या
नाही, कापं म्हणजे वड्या म्हणजे काजूकतलीला कोकणात काजूची कापं म्हणतील.
किंवा खोबर्याच्या वड्या म्हणजे खोबर्याची कापं, गुळाची कापं वगैरे.
>>गुळाच्या पोळीच्या गुळात चुना घालायची पद्धत आहे >> हो? मला नव्हतं माहिती.
नाही, कापं म्हणजे वड्या
नाही, कापं म्हणजे वड्या म्हणजे काजूकतलीला कोकणात काजूची कापं म्हणतील. >>> ओके
Pages