इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

Submitted by प्राजु on 21 February, 2013 - 23:44

अताशा जीवनी माझ्या नवे काही घडत नाही
नवेसे स्वप्नंही आता मनाला भाळवत नाही

नव्या वाटा नको आता नवे काही नको वाटे
अता पाऊलही माझे नव्या साठी अडत नाही

तिथे श्रावण बरसलेला, कधी गोष्टी वसंताच्या
इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

कुणी यावे, कुणी जावे.. सुतक नाही न सोयरही
पुरणपोळी नको वाटे, नि भाकर मोडवत नाही

मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही

असे हे बाड शब्दांचे, गझल-कविता नसे काही
जरी जपले न मी त्याला, तरीही फ़ेकवत नाही

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझले बद्दल कोणीच बोलत नाहीये ....................<<<<<<<<<<<,,

बोलण्याजोगे आहे काही? सगळेच तर शब्दांच्या पलीकडचे आहे!

अवांतर>>>>>तू किती अवधाने आणलीस खाजवून? मोज व मग उत्तर दे!

मोज व मग उत्तर दे!>>>>>>

माझ्या प्रतिसादावर हा पुन्हा एक अक्राळ विक्राळ स्मायली दिलात हे पाहून 'एक' तर नक्कीच Happy

मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही

हे शेर आवडले

ग्रो अप देवपूरकर!!<<<<<<<<<<<<

सौ.पटवर्धन-गोखलेबाई,
आपली ताडामाडाची काव्यात्मक ग्रोथ काय कमी आहे का?
आम्ही आपले आपल्या उंचीचे आहोत तेच ठीक आहे!
अन्यथा ओव्हरग्रोथ व्हायची जी तुमच्यासारख्यांना पेलायची नाही!
तेव्हा.........
चालले ते ठीक आहे, छान आहे!

वैभव, आ बैल मुझे मार अशी पण म्हण आहे.<<<<<<<

यालाच खाजवून अवधान आणणेही पंढरपुरात म्हणतात म्हणे......इति वैभव वसंत कुलकर्णी उवाच!

बेफिकीर आणि वैभव फाटक ह्यांचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद खूप आवडले.

भाळवणे - हा शब्द मला तरी 'पटला'. ह्याचा अर्थ 'मोहवणे'च्या जवळ जाणारा वाटतो. काही अपरिहार्य वेळी असा एखादा नवीन शब्द जन्माला घालण्यास हरकत नसावी, जर त्याला शास्त्राची सुयोग्य जोड असेल तर आणि माझ्या मते इथे ती आहे. हा 'हेहीबरोबरतेहीबरोबर' अश्या एखाद्या अडेलतट्टू सिद्धांताच्या एकाच बांबूवर उभारलेला तंबू वाटत नाही.

तिथे श्रावण बरसलेला, कधी गोष्टी वसंताच्या
इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

असे हे बाड शब्दांचे, गझल-कविता नसे काही
जरी जपले न मी त्याला, तरीही फ़ेकवत नाही

हे दोन शेर खूप आवडले.

खासकरून शेवटचा....!!

त्या स्मायलीचा अर्थ त्यांना लाळेरे हवे आहे आता...
गझला श्वास आहेत असे म्हणणे ठीक होते.. आता लाळ सुद्धा सुटायला लागली.

बाय द वे.. गझल म्हणजे श्वास म्हणता पण तुमच्या गझला तर व्हेंटीलेटर ठेवल्यासरख्या असतात. जगवा जरा त्यांना नीट.

भूषणराव!

ही लज्जादर्शक मुद्रा आहे!

अवांतर: आमच्या स्मायलींनी शेरांतील अव्यक्यतता ओळखायला मदत व प्रशिक्षण मिळावे हीच सदिच्छा!

हा एक संकेतस्मायलींचा प्रयोग आम्ही करतो आहोत!

'The War'
कवी- मेरे पास मिटर है, अल्फाज है, कल्पना है..क्या है तुम्हारे पास?
प्राध्यापक- भाSSSSSSSSSSSSSई; मेरे पास बगैर दिमाग वाली ओव्हरग्रोथ स्मायली है. जल्दीसे ये काँट्रॅक्ट साईन करो जिसमे लिखा है तुम्हारे हर कवितापे सबसे पहला और सिर्फ मेरा फर्लांगभर प्रतिसाद होगा! वरना..
कवी- वरना?
प्राध्यापक- वरना इतनी स्मायली डालूंगा इतनी स्मायली डालूंगा की खुदको भी आईने मे किडके दात वाली स्मायली जैसे देखोगे
कवी- भगवान, आप जिस कागज पे जहा बोलो मै साईन करने के लिये तैयार हू..बस हम प्राणियो को इस बददिमागी ओव्हरग्रोथ स्मायली से बख्श दो..

मोडतोड एवढी करून काय पाहती?
शब्द ठार मारुनी कळे न काय साधती?
साक्ष द्यायलाच उंदरास मांजरापरी,
सत्वरी अगांतुकांसमान कैक धावती!

मायबोली केवढी मुर्दाड झाली!
गोखले पटवर्धनांना प्यार झाली!!
व्यक्त आहे ते न येते वाचता अन्
हौस अव्यक्तास त्यांना वाचण्याची!
राग येणे दूर आता कीव येते.....
बिनकण्याच्या माणसांची ही बढाई!................इति प्रोफेसर!

मायबोली केवढी मुर्दाड झाली!
गोखले पटवर्धनांना प्यार झाली!! >>>>>>>>
छी छी...अ‍ॅडमिन..झोपलात का?

उमेश... सोड ना.
देवपूरकरांना आता ना काहीही मुद्दे नाहियेत त्यामुळे त्यांच्या रद्दड काव्यात ते माझ्या माहेर-सासरचा उल्लेख करुन त्यांनी स्वतःची पातळी सोडली आहे. त्यामुळे.. जस्ट चिलपिल..!

@ देवपूरकर....
पुन्हा एकदा... ग्रो अप!!

उमेश कोठीकर,

स्मायली समजायलाही लागते बुद्धी अरे!
हे असे खरडायला शाईच लागे फक्त ती!!

ओढुनी आणून कोठे हासता येईल का?
हास्य वेड्या काळजामध्ये असाया पाहिजे!

सोड, जाऊ दे, तुझा ना प्रांत वेड्या;
हे कळायाला अरे, डोके असावे लागते!.............इति प्रोफेसर उवाच!

\\\त्या स्मायलीचा अर्थ त्यांना लाळेरे हवे आहे आता...
गझला श्वास आहेत असे म्हणणे ठीक होते.. आता लाळ सुद्धा सुटायला लागली.

बाय द वे.. गझल म्हणजे श्वास म्हणता पण तुमच्या गझला तर व्हेंटीलेटर ठेवल्यासरख्या असतात. जगवा जरा त्यांना नीट.<<<

Rofl Rofl

भाSSSSSSSSSSSSSई; मेरे पास बगैर दिमाग वाली ओव्हरग्रोथ स्मायली है<<< Rofl

मायबोली केवढी मुर्दाड झाली!
गोखले पटवर्धनांना प्यार झाली!!<<< Angry

सोड, जाऊ दे, तुझा ना प्रांत वेड्या;
हे कळायाला अरे, डोके असावे लागते
>>>>>>

पहिल्या ओळीत मात्रा कमीयेत का ??
असे करता येईल का..................

सोड, जाऊ दे, तुझा ना प्रांत वेड्या हा असे
हे कळायाला अरे, डोके असावे लागते

पटवर्धन- गोखले,
आहो प्रश्न कुणाला विचारलाय? उत्तर कोण देतय? कशाचाच काशाला मेळ नाही!
फार श्रमलेला दिसतोय तुमचा मोठा मेंदू आता ! सरळ झोप काढा पाहू! फ्रेश व्हाल!
शुभरात्री!

Pages