Submitted by अत्रुप्त आत्मा on 17 February, 2013 - 10:41
शब्दांनी सजवित जावे
वृत्तांचा ना हव्यास
मज वाटे कविता झाली
असतो रचनेचा भास
मी नाही कुठला पंथी
मज नकाच कोठे जुंपू
कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू
ही माझी स्वतंत्र रचना
हे माझे निराळे कूळ
तुंम्ही अर्थ शोधुनी जाता
तरी गवसत नाही मूळ
एकाकी या वळणावर
मी पुढे चालतो आहे.
शब्दांचा नाजुक गजरा
मी मनी माळितो आहे.
मज ठाऊक नाही पुढती
असणार कोठचे गाव?
नसतात तेथल्या गावी
कुणी राजा आणिक राव
शब्दांचा मी सहकारी
वाटांना शोधित जाई
जोवरी मिळे ना वाट
तोवरी तेथला राही...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है ..... सुंदरच,
क्या बात है ..... सुंदरच, केवळ सुंदर .....
(No subject)