Submitted by सतीश देवपूरकर on 16 February, 2013 - 09:27
गझल
सारा हिशोब द्यावा लागेल एक दिवशी!
त्याचीच चूक त्याला समजेल एक दिवशी!!
चिखलात माखल्याने दिसतो तुला असा तो....
आहे अरे हिरा तो, चमकेल एक दिवशी!
वाया मुळीच माझे जाणार रक्त नाही;
येथेच स्वप्न माझे उगवेल एक दिवशी!
आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
ते आज ना उद्याला उघडेल एक दिवशी!
माझी गझल उद्याला गाजेल एवढी की,
होऊन श्वास हृदयी धडकेल एक दिवशी!
आधी विचार कर, मग दे आहुती मला तू!
ही आग त्यामुळे पण भडकेल एक दिवशी!!
इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला!
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सदर गझल बरीच जुनी
सदर गझल बरीच जुनी २१-२२वर्षांपूर्वीची आहे!>>>>
या रदीफावर भटांशी चर्चा झाली होती,>>>>>
>>>>>>या दोन ओळींचा रदीफ योग्य की अयोग्य याच्याशी दूरान्वयेही संबंध मलातरी जाणवला नाही
असो
एक दिवशी /एका दिवशी /एके दिवशी.......सर्व शब्द बोलले जातात, जे वापरायला हरकत नसावी!>>>> प्रचण्ड सहमत तसेच अगदी माझ्या मनातले वाक्य बोलल्याबद्दल धन्सही
देवपूरकरमामा, तुम्हाला
देवपूरकरमामा, तुम्हाला सबॅटिकलची आवश्यकता आहे.
तिलकधारी ऊर्फ गंभीर समीक्षक उर्फ बेफिकीर काय म्हणतात याकडे थोडे लक्ष द्या.
थडगे जमातीतील खवटुन्निस्सा या
थडगे जमातीतील खवटुन्निस्सा या जळगावच्या भुता,
उचलली कबर लावली आभाळाला असे वागू नको बये.
यशवंत राहणे, आपली माफी मागतो. आपले विचार आम्हास पटले.
कळावे
गं स
देउ नकोस इतका, तू त्रास
देउ नकोस इतका, तू त्रास पागलाला
ही काच खोपडीची, तडकेल एक दिवशी
सबॅटिकल म्हणजे काय?
सबॅटिकल म्हणजे काय?
असतेच पागलाला ती खोपडी कुठे
असतेच पागलाला ती खोपडी कुठे रे?
सावध! तुझ्यावरी तो भडकेल एक दिवशी!
स्पष्ट मत : ही रचना आपल्याला
स्पष्ट मत : ही रचना आपल्याला आवडली
सरळ स्पष्ट बोलल्या सारखी रचना आहे ....रचना म्हणुन मस्त आहे
( ज्येष्टांचा वादही "गझलेत का " किंवा "ही कविताही नाहीच " ह्यावरुन चालला असावा )
असो
खाणीत(ले) तेल तुमच्या संपेल एक दिवशी ||
खाणीत(ले) तेल तुमच्या संपेल
खाणीत(ले) तेल तुमच्या संपेल एक दिवशी >>>
वा गिरिजा मस्त ओळ
खाणीतले तेल म्हणजे देवसरांची लेचीपेची सप्पक पाणचट गझल त्यांचे सपाट अभिव्यक्तीचे थातुर्मातुर आशय् विषय असलेले शेर होय ना
शिवाय ले हे "भरीचे अक्षर" अव्यक्त ठेवले आहे ते कंसात दिलेत ते बरे केलेत मध्यंतरी देवसरांनी स हे अक्षर अव्यक्त ठेवले होते ते कुणाला म्हणून कुणाला ओळखता आले नव्हते !.....अगदी देवसरानाही , शेवटी मी सहजच एक शंका उपस्थित केल्यावर लक्षात आले होते (आफ्टर थॉट की काय त्यातला प्रकार म्हणे )
धन्यवाद गिरिजाजी
धन्यवाद गिरिजाजी निर्भीडपणाबद्दल व प्रांजळपणाबद्दल!
हे राम ! कस होणार
हे राम !
कस होणार
रीया काय व्हायला हवंय??
रीया काय व्हायला हवंय??
कस होणार>> मला कुणाचं हा
कस होणार>> मला कुणाचं हा प्रश्न पडला रिया
रीया काय व्हायला
रीया काय व्हायला हवंय??
>>>
आणखी इन्व्हिजिबल आहे का यात?
वैवकु माबोवरच्या गझलेच्या भवितव्याचं!
खर सांगते हे सगळं वाचुन वाटतय आपल्याला गझला येत नाहीत तेच बर आहे
खर सांगते हे सगळं वाचुन वाटतय
खर सांगते हे सगळं वाचुन वाटतय आपल्याला गझला येत नाहीत तेच बर आहे>>>>>>>> अगदी बरोब्बर.
पण आपल्याला म्हणजे? तु हे मला सांगतेयेस ना? की वैभवला?
थकतील हात खणताना, उरतील हिरे
थकतील हात खणताना, उरतील हिरे अर्थांचे.....
ह्या नव्हेत गझला माझ्या, ह्या चैतन्याच्या खाणी!............इति प्रोफेसर सतीश देवपूरकर
हृदयात गझलसाठे आहेत एवढे
हृदयात गझलसाठे आहेत एवढे की,
हा जन्म मात्र माझा संपेल एक दिवशी!.....इति प्रोफेसर सतीश देवपूरकर
पण आपल्याला म्हणजे? तु हे मला
पण आपल्याला म्हणजे? तु हे मला सांगतेयेस ना? की वैभवला?
)

>>>
आपल्याला म्हणजे मला ग
(या बाफचा असर असावा का हा?
वैवकुंना येतात की!
गेल्या काही महिन्यात माबोवर जे चालू आहे ते पाहून माबोकर गझलकारांची सगळी पापं धुऊन निघणार याची शाश्वती वाटते मला
रियाजी! गेल्या काही महिन्यात
रियाजी!
गेल्या काही महिन्यात माबोवर जे चालू आहे ते पाहून माबोकर गझलकारांची सगळी पापं धुऊन निघणार याची शाश्वती वाटते मला <<<<<<<<<<,,
म्हणजे काय?
पापं धुऊन निघणार >>> ए रियुडे
पापं धुऊन निघणार >>>
ए रियुडे मी काय गं पाप केलय मी गझलकार तरी आहे का उगीच्च माला नकोबई मधे ओढूस .....
कवी सतीश, तुमचे प्रतिसाद हे
कवी सतीश,
तुमचे प्रतिसाद हे तस्वीर तरही प्रतिसाद असतात काय?
प्रोफेसर, ह्या स्मायलीज्
प्रोफेसर,
ह्या स्मायलीज् तुम्हाला कशा / कुठे मिळाल्या?? त्या तुम्ही इथे कशा काय टाकता?? हे जाणुन घ्यायची इच्छा आहे.
हे काय चाललंय
हे काय चाललंय काय???
http://www.maayboli.com/node/34778#comment-2580102
वैवकु तुमचे प्रतिसाद आवडतात
वैवकु
तुमचे प्रतिसाद आवडतात मला.
ते दुसर्या एक कुठल्या तरी अशाच एका (प्रोंच्या) क्ष गझलेवर आपण लिहीलं होतं तो धागाच मला सापडत नाही आहे. आणि शोधावं म्हणलं तर एक ओळ आठवत नाही आहे. फक्त माझ्या पोस्टमधला कचरा हा शब्द आठवतो आहे
आणि बहुतेक मकरन्द नावाच्या आयडीला प्रो. न्नी मला दिलेला ज्ञानाम्रुत पाजलेलं बहुतेक. स्वतः एक गझल लिहुन दाखवा टाईप्स.
रिया,
(No subject)
रियाजी! गेल्या काही महिन्यात
रियाजी!
गेल्या काही महिन्यात माबोवर जे चालू आहे ते पाहून माबोकर गझलकारांची सगळी पापं धुऊन निघणार याची शाश्वती वाटते मला <<<<<<<<<<,,
म्हणजे काय?
>>>>>
तुम्ही इग्नोर करा हो!
तुमच्यासाठी नव्हतं ते
गझलकारांसाठी होतं
तुम्ही इग्नोर करा
तुम्ही इग्नोर करा हो!<<<<<<<<<<<<<<<<
केव्हाच केले देखिल!
Pages