अडिच तीन वर्षाचि मुलं जि सगळ व्यवस्थित खात पीत असतात कधि कधि अचानक सगळं नको म्हणु लागतात.....अशावेळि आपण आगदि घाबरुन जातो,अर्थातच साहजिक आहे ते.त्याच एक कारण असु शकत कि त्याना नेहमिचा चविचा कंटाळा आलेला असतो.मग दर वेळि नवीन काय कराव अणि ते हि पौष्टिक असा प्रश्न पडतो.
माझा मुलिचा बाबतित मागचा काहि दिवसांत अस घडत होतं.तेव्हा हा उपमा मि तिला करुन दिला होता.अणि तिने तो खाल्ला हि.माझि आई हे करुन द्यायचि.त्याचि रेसिपि शेर करत आहे.
फायदे :
१. ५ ते ७ मिनिटात बनणारि डिश
२. उरलेला उपमा कोण संपवणार हा यक्ष प्रश्न नाहि उभा राहणार
३.ह्यात आजिबात मिरचि नसणार आहे त्यामुळे मुले खाताना कहिच तकरार नाहि करणार
४.साहित्य,तयारि अणि क्रुति आगदि कमि वेळात होणारं असं
५.हा खिरिसारखा पातळ बनवाअयचा आहे.त्यामुळे मुलांचं काम अक्षरशः गिळणे, इतकेच आहे.
साहित्य :
१/२ वाटि ( ४-५ टि स्पून) रवा
२-३ लसुण पाकळ्या
तूप - २ टि स्पीन
जिरे अणि मीठ (चविनुसार)
कढईत तूप गरम करत ठेवावे.गरम होईपर्यंत लसुण हातने थोडा चिरडुन घ्यावा.तूप तापले कि त्यात लसुण व जिरे टाकावे.फोडणि झालि कि त्यात रवा टकुन तो चांगला भाजुन घ्यावा.रवा भाजुन झाला कि पाणि घालुन खिरिसाखा पातळ शिजवून घावा.
महत्वाचे : आगदि एक वेळेपुरत जेवढ लागतं तेवढच साहित्याच प्रमाण मि वर दिलेलं आहे.
हा उपमा लहान मुलानंसाठि अस जरि मि म्ह्णत असले तरि लहान तो म्हातार्या माणसांना पर्यंत सगळ्यांनाच आवड्ण्या सारखा अहे
जर फ्रोझन मटार, कॉर्न किवा तूप तापे पर्यन्त गाजर वगरे कट करुन घेउन ते हि फोडणित घालता येतं
अजुन अशा झट्पट डिश आसतील तर प्लीझ शेर करा
Fruit and cream १ केळ (लहान
Fruit and cream
१ केळ (लहान अस्तिल तर २ ) - गोल काप करुन
चॉकोलेट सॉस - २ चमचे
व्हिप्पड् क्रीम (किव्वा साखर व साय २ मिनिटे मिक्सर मधुन काढुन घ्या)
एक चेरि - सजावटिसाठि
एका बाउल मध्ये केळिचे काप घ्यावे.त्यवर चॉकोलेट सॉस घालुन ते कालवावे.त्यावर व्हिप्पड् क्रीम घालुन वर चेररि ठेवावे.दिसायला एकदम मस्त...मुलं काय अणि मोठे काय, सगळयाना नक्किच आवडेल
डिश घाईत बनवलि मुलिसाठि त्यामुळे सजावट जास्त नहि करता आलि अणि फोटो हि घाईतच काढला

दुध, साय ह्या पासुन दूर पळणार्या मुलांसाठि हि खास डिश
ड्राय फुट्स घालायला कहिच हरकत नाहि,इतर फळे वापरु शकता
गोपिका, http://www.maayboli.c
गोपिका,
http://www.maayboli.com/node/28243 या धाग्यावर दिनेशदांनी आणि प्रतिसादात इतर अनेकांनी खुप छान छान आणि पौष्टिक प्रकार सुचवले आहेत.
आभारि आहे. मि प्रय्त्न करते
आभारि आहे. मि प्रय्त्न करते