नमस्कार,
आज व्हॅलेंटाईन दिवसाच्या आणि वसंत पंचमी च्या मुहुर्तावर चित्रमय कविता स्पर्धेचा धागा आपल्या सर्वांसाठी चालु करत आहे.
इथे एक फोटो दिला जाईल..त्यावरुन आपणास कविता, गझल लिहायची आहे..
या पुर्वी याच संकल्पनेवर माझा धागा होता.. यावर आता स्पर्धा चालु केली
फोटोग्राफ स्पर्धेचा धागा चालु असताना अत्यंत सुंदर आणि अर्थपुर्ण प्रकाशचित्रे अनुभवाला मिळाली ..ज्यावरुन उत्तम काव्य कविता / गझल तयार होईल. म्हणुनच आज चा मुहुर्त धरुन हा धागा तयार केला
या धाग्याचे जजेस आहेत ........... "प्राजु" आणि "शाम" ....दोघांनी ही परीक्षक बनण्याची विनंती स्विकारलेली आहे.
१) प्रकाशचित्रः शापित गंधर्व ( धीरज ) तर्फे
तरुणपणातील प्रेम
२) प्रकाशचित्रः जिप्सी (योगेश) तर्फे
उतारवयातील प्रेम
निकाल............
प्रथम क्रमांक :- अमेय २८०८०७ ...."स्मरणपलिते"
द्वितीय क्रमांक :- मुग्धमानसी ...."प्रवास"
तृतिय क्रमांक :- मंदार खरे.........."नियती"
नियम / सुचना :-
१) एक आयडी २ कविता देउ शकेल......कविता स्वरचितच असावी
२) दोन्ही फोटोंवर वेगवेगळ्या कविता करु शकतात अथवा एकाच फोटोवर दोन कविता
३) दोन्ही प्रकाशचित्रांवर संयुक्त रित्या कविता सुध्दा करु शकतात.
४) प्रकाशचित्र कोणते वापरत आहेत कविते साठी ते सुरुवातीला हेडिंग वर स्पष्ट पणे लिहावे उदा. "१) प्रकाशचित्रः जिप्सी तर्फे"
५) १५ दिवसांमधे एक फोटो असे महिन्याला २ फोटो दिले जातील...आणि निकाल महिना संपल्यावर लावला जाईल..
६) निकाला पर्यंत कविता इतरत्र प्रकाशित करू नये
७) कविता जास्तीत जास्त १२ ते १४ ओळींचीच असावी.
८) कवितेला समर्पक शिर्षक असावे........
९) कविता इथेच प्रतिसादामधेच टाकावी..
.
.चला मग करुया सुरुवात ....
व्वा! सर्वांच्या कविता छानच
व्वा! सर्वांच्या कविता छानच आहेत. शाब्बास!
छान कविता आहेत
छान कविता आहेत
प्रकाशचित्रः जिप्सी (योगेश)
प्रकाशचित्रः जिप्सी (योगेश) तर्फे
नियती
--------------------------------------------
सुख दु:खाची
ओहटी भरती
सागर मंथन
मनी छेडती
ओंजळीत बघ
घेउन पाणी
साश्रु नयनी
तुझ्याच आठवणी
पायाखालती
निसटे माती
साथ सोबती
विरती नाती
सुर्यही थकला
नभी झुकला
कुणास नियतीचा
खेळ हा चुकला
.
.
.
.
प्रकाशचित्रः शापित गंधर्व (
प्रकाशचित्रः शापित गंधर्व ( धीरज ) तर्फे
-------------------------------------------------------------------
आयुष्याच्या वाटेवरती
आयुष्याच्या वाटेवरती साथ तुझी मिळावी
सुखदुखांच्या वळणांवर ती निरंतर राहावी
दिशाविरहित होते सारे तुझ्याविना ह्या जगी
तुझ्यासवे मज आता दिशा जगण्याची कळावी
रंगवुया अपुले स्वप्न सृष्टीच्या पटलावरी
दोघांचिया मनीचे रंग मिसळुन (स्वप्ने) रंगवावी
खडतर प्रवास अवघा सुकर होईल तुझ्यासवे
हातात हात दे तू, दुखे सारी विस्मरावी
दुखांच्या डोंगरातहि तू माझ्यासवे असावी
अन सुखाची ओंजळ पण मी तुझ्यासवे भरावी
निकाल लावण्यात आला
निकाल लावण्यात आला आहे.............
.
.विजेत्यांचे अभिनंदन
Great.....!!! अनपेक्षित......
Great.....!!!
अनपेक्षित.........!!!!
धन्यवाद.......नविन कविता करायला ...........नविन उमेद मिळाली!!!
विजेत्यांचे अभिनंदन निकाल तर
विजेत्यांचे अभिनंदन
निकाल तर लावलात , पण विजेत्यांना काहीतरी बक्षिसे दया, अगदीच काही नाही तर बक्षिसांचे फोटो तरी दया
वैभ्या तु ये
वैभ्या तु ये संयोजकात..............
.
.
जजेस, स्पर्धा संयोजक उदयन आणि
जजेस, स्पर्धा संयोजक उदयन आणि मा.बो. ला धन्यवाद.
अरे वा! विजेत्यांचे अभिनंदन
अरे वा! विजेत्यांचे अभिनंदन
पण शिर्षकात ते निकल झालंय ते निकाल करा हो...
धन्यवाद!
धन्यवाद!
Pages