Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 13 February, 2013 - 01:51
वृक्ष ही नि:शब्द आहे,शांत सागर एकटा
आत खळबळ माझिया का, मी असे जर एकटा?
झुंबडी उडतात बाया बापड्यांच्या एरवी
आड-दोरा- पोहरा,जल संपल्यावर एकटा
तूच माझे विश्व सारे,तूच माझी जिंदगी
हात हातातून होतो सोडल्यावर एकटा
सर्व शिक्षण्,प्रौढ शिक्षण्,लाख झाल्या योजना
वेतनावाचून शिक्षकजन खरोखर एकटा
लाख लुकलुकतात तारे,गर्द आभाळामधे
पण तरी ती और शोभा उजळल्यावर एकटा
--डॉ.कैलास गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<लाख लुकलुकतात तारे,गर्द
<<<लाख लुकलुकतात तारे,गर्द आभाळामधे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तरी ती और शोभा उजळल्यावर एकटा>>> मस्त शेर कैलासजी
आवडली गझल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा व्वा! उत्तमच! धन्यवाद
व्वा व्वा! उत्तमच!
धन्यवाद आणि तस्वीर तरहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन कैलासराव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
रदीफ आवडली तरही सुध्दा!
रदीफ आवडली
तरही सुध्दा!
व्वा ..... मस्त झालेय. 'आड'
व्वा ..... मस्त झालेय.
'आड' हा शेर सर्वाधिक आवडला.
सुंदर तस्वीर गझल.
सुंदर तस्वीर गझल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय !:)पण काही जागी रदीफ
मस्तय !:)पण काही जागी रदीफ तितकी चपखल नाही वाटली वैयक्तिक मताबद्दल क्षमस्व
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभारी आहे..... अपेक्षा
आभारी आहे..... अपेक्षा पूर्ण करु न शकल्यवद्दल वैभवा तुझा दिलगीर आहे.
ठीकठाक ... मला उशिराने कळते
ठीकठाक ... मला उशिराने कळते आहे... प्रयत्न करावा म्हणतोय!
दिलगीर आहे.>>> छॅ ! काहीतरीच
दिलगीर आहे.>>> छॅ ! काहीतरीच काय डॉ .साहेब..अहो मी सहजच जे वाटले ते म्हणालो ...आता मला वाटले ते चुकीचेही असू शकतेच ..... त्याबद्दल खरेतर मीच क्षमस्व !!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
खूपच छान ! प्रत्येक चित्रातील
खूपच छान !
प्रत्येक चित्रातील एकटेपणाचा शोध घेऊन एक वेगळी गझल पेश केलीत आपण.
त्याबद्दल आपले अभिनंदन !
मला तो आड पोहर्याचा शेर
मला तो आड पोहर्याचा शेर आवडला !
छान गझल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेगळी विषयमांडणी ,पहिले तीन
वेगळी विषयमांडणी ,पहिले तीन शेर अधिक आवडले.
वेगळी विषयमांडणी ,पहिले तीन
वेगळी विषयमांडणी ,पहिले तीन शेर अधिक आवडले.
सुंदर!!!!!!!!
सुंदर!!!!!!!!