ओळखा आणि सांगा

Submitted by अवल on 12 February, 2013 - 23:52

हे फूल कसले ते ओळखा ( मला उत्तर माहिती आहे Happy )
kadhipatta.jpg

ह्या फुलांचा काय उपयोग करता येईल तेही सांगा प्लिज.

आणि हे झाड कसले आहे ते मला कृपया सांगा. त्याने लिलीच्या कुंडीत बस्तान मांडलेय, आणि आता तिथे उंट अरबाची गोष्ट घडू पाहतेय. त्याला ठेऊ की काढू ते सांगा.

1_1_0.jpg

हे त्याचे येऊ घातलेली छोटीशी फुले
1_2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले नाही.
दुसरे ? मला शक्यता कमी वाटते. कारण माझ्याकडे मिरचीचे झाड आहे त्याची पने लहान आणि जाड आहेत. या झाडाची मोठी आणि पांतळ आहेत.

जिप्सी पहिले बरोबर. बाजूची पानं पाहिलीस ना Wink त्यांचा उपयोग काय करू ?
दुसरे नक्की का? त्याच्या पानांचा वास वेगळा येतोय. बरं अजून ४-६ दिवस वाट पहाते, ती फुलं मोठी होई पर्यंत थांबते.

अवल Happy
बाजूची पानं पाहिलीस ना>>>>कढिपत्त्याच्या फुलाचा फोटो आहे माझ्याकडे. त्यावरून ओळखलं Happy

अरे माहिती आहे, तू, जागू, श्यामली, दिनेशा असे सगळे माहिर आहात तुम्ही. म्हणून तर Wink टाकला. बरं मला सांग ना त्या फुलांचे काय करू ? काही वेगळा उपयोग असतो का? एका माळ्याने सांगितले की फुलं आली आता तुमचा कढिपत्ता वाढणार नाही Sad तसं काही आहे का?

मलाही जास्त माहित नाही. त्याबद्दल जाणकार सांगतीलच Happy
कढिपत्याच माहित नाही पण तुळशीला मंजिर्‍या आल्यावर मी त्या काढुन टाकतो. Happy

जिप्सी >>>तुळशीला मंजिर्‍या आल्यावर मी त्या काढुन टाकतो. <<< का रे?
प्राडी हुश्श्य ! मला भितीच वाटली होती. इतका छान वाढतोय तो. थॅक्स ग .