Submitted by श्रीराम . on 12 February, 2013 - 02:07
तो एक दिवस प्रेमाचा (व्हालेन्ताएन डे)
तो आणि ती,त्यांनी
प्रेम व्यक्त करण्यासाठी,
या दिवसाची कां वाट पहावी,
कोण सांगेल कां मला ?
प्रेम एकमेकांच्या,
नजरेत दिसत असतां
‘आय लव यू’ या ,
कार्डाची गरज कां भासावी,
कोण सांगेल कां मला ?
प्रेमाचा फुलोरा ,
एकमेकांच्या हृदयात दरवळा असतां,
त्या ‘गुलाबाची’गरज कां भासावी ,
कोण सांगेल कां मला ?
प्रेमाच्या दिनदर्शिकेत,
सारे दिवस सारखेच असतां ,
‘त्या’ दिवसाची गरज कां भासावी,
कोण सांगेल कां मला ?
प्रेम व्यक्त करण्याच्या रित-भातीची
काही केली असल्यास व्याख्या,
कोण सांगेल कां मला ?
जे हृदयातून येते ,
मनां मनात फुलते ,
जे नजरे नजरेतून खुणावते,
त्यासाठी कां ते ‘कार्ड’ हवे,
अन् गुलाबपुष्प,अन् तो दिवस ,
कोण सांगेल कां मला ?
श्रीराम(सुरेश) कुंचूर ,पुणे .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा