Submitted by सतीश देवपूरकर on 10 February, 2013 - 22:29
गझल
येते समोर जेव्हा ती, फक्त पाहतो मी!
आहे तिचाच दावा की, फार बोलतो मी!!
मी एकदाच गेलो स्वप्नी तिच्या पहाटे....
म्हणते अजूनही ती...स्वप्नात चालतो मी!
अधरी कधी फुलांच्या, हृदयी कधी कळ्यांच्या;
मधुनीच कैक वेळा काट्यात राहतो मी!
जुळवून भंगलेल्या ठिक-याच काळजाच्या;
दररोज कल्पनेचा प्रासाद बांधतो मी!
हे लक्ष लक्ष तारे, हे मंद मंद वारे....
तुज सांगतील सारे की, काय सोसतो मी!
मी बोलतो तिच्याशी मनसोक्त कैक वेळा!
राहून मात्र जाते जे खूप घोकतो मी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी बोलतो तिच्याशी मनसोक्त कैक
मी बोलतो तिच्याशी मनसोक्त कैक वेळा!
राहून मात्र जाते जे खूप घोकतो मी!!<< मस्त शेर
धन्यवाद भूषणराव!
धन्यवाद भूषणराव!
भूषणराव! बाकीच्या शेरांत काही
भूषणराव! बाकीच्या शेरांत काही खटकते आहे का?
मी बोलतो तिच्याशी मनसोक्त कैक
मी बोलतो तिच्याशी मनसोक्त कैक वेळा!
राहून मात्र जाते जे खूप घोकतो मी
वा वा, अगदी `तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते' आठवले
हे वृत्त पण छान आहे.
हे वृत्त पण छान आहे. आनंदकंद.. गागा लगा लगागा
तसं क्वचितच वापरलं जातं हे वृत्त.
धन्यवाद गजलमिया!
धन्यवाद गजलमिया!
हे वृत्त पण छान आहे.
हे वृत्त पण छान आहे. आनंदकंद.. गागा लगा लगागा
तसं क्वचितच वापरलं जातं हे वृत्त.<<<
गजलुमियां <<<
गजलुमियां <<<
गजलुमियां <<<
(No subject)
स्वयंपाक छान झाला आहे.
स्वयंपाक छान झाला आहे.
स्वयंपाक???????
स्वयंपाक???????