Submitted by अमेय२८०८०७ on 9 February, 2013 - 09:46
त्या रेशमी क्षणांचा अभिसार मागतो मी
प्रीतीत गुंतलेला सहचार मागतो मी
उजळून रात गेली भाळावरी परंतु
डोळ्यात जागृतीचा मंदार मागतो मी
रामायणी चुकीचा वनवास भोगताना
सीतासमर्पणाचा अधिकार मागतो मी
निष्प्राण भावनांना मातीत सोबतीला
निर्माल्य पाकळ्यांचा आधार मागतो मी
आता तसे उन्हाने निवले विझून डोळे
का सावळ्या दिशांचा अंधार मागतो मी
शब्दांत सार्थतेचे जगले जरी दिलासे
मौनात मुग्धतेचा झंकार मागतो मी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा काफिये मस्तय्त खयाल
वा काफिये मस्तय्त
खयाल छान्छानय्त तितकेसे नीट हाताळले गेले नाहीत असे वाटले
सीतासमर्पणाचा अधिकार मागतो
सीतासमर्पणाचा अधिकार मागतो मी--
छान आहेत भाव सगळे.
रचना थोड़ी अजून उत्तम होऊ शकली असती (अर्थाच्या द्रुष्टीने)
उजळून रात गेली भाळावरी
उजळून रात गेली भाळावरी परंतु
डोळ्यात जागृतीचा मंदार मागतो मी
>>> मंदार चा अर्थ काय? माझ्या माहितीप्रमाणे हे १ गणपतीचे नाव आहे.
मून, 'मेरु - मंदार धाकुटे' हे
मून,
'मेरु - मंदार धाकुटे' हे वाचले असेलच एका स्त्रोत्रात. एका काल्पनिक पवित्र पर्वताचे नावही मंदार आहे.