Submitted by विनायक. दि.पत्की. on 9 February, 2013 - 03:24
एक मुंगी रस्त्याने चालली होती,
आपल्याच नादात गात हि होती.
चहुकडे पहात होती,
आनंदाने डोलत होती.
अचानक सुटला सोसाट्याचा वारा,
पावसाच्या हि सुरु झाल्या धारा.
सोबत पडू हि लागल्या गारा,
बिचारीला मिळेना कुठे हि थारा.
पाण्याचा वाहत आला मोठा लोंढा,
त्यामध्ये होता बराच कोंडा.
कोंड्याच्या आसराने गिळला आवंढा,
शीण झाला हलका जेव्हा लागला धोंडा.
धोंड्याला होती मोठी खोबणी,
त्यात देवतेची मूर्ती देखणी.
प्रसादाची सुद्धा तेथे आखणी,
वारयाने उडवली होती सर्व झाकणी.
मुंगीला मात्र तेथे हायसे वाटले,
डोळ्यातील सर्व पाणी हि आटले.
मग तिने बस्तान तिथेच थाटले,
जीवा शिवाचे अधिष्टान मनोमनी पटले.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
करावी लागते केव्हा केव्हा पाठवणी
प्रसंगाची केवळ नसावी साठवणी
(कारण)
येतील ते दिवस फुलतील पुन्हा आठवणी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेले ते दिवस राहिल्या त्या
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी नव्हे तर "येतील ते दिवस फुलतील पुन्हा आठवणी" हा सकारत्मक भाव आवडला.
वा !! खूप सुंदर आशा जागवणारी
वा !! खूप सुंदर
आशा जागवणारी
विश्वयशश्रीजी,रेव्यु जी,
विश्वयशश्रीजी,रेव्यु जी, धन्यवाद,
छान कविता.
छान कविता.
गंगाधर मुटे,सर. धन्यवाद.
गंगाधर मुटे,सर.
धन्यवाद.
बस्तान पर्यत सुंदर बालकविता
बस्तान पर्यत सुंदर बालकविता आहे..पुढचे नीट कळले नाही
विक्रांत प्रभाकर जी धन्यवाद
विक्रांत प्रभाकर जी धन्यवाद .
विक्रांत जी येथील मुंगी म्हणजे प्रत्येक जीव
प्रत्येक जीवाला शेवटी शिव व्हायचे असतेच (एक न एक दिवस मरायचे आहेच).आपली जन्मल्या पासून त्याकडेच वाटचाल होत असते.प्रसंगी मरता मरता वाचत हि असतो,संकटाने जीव नकोसा होत असतो,पण वाटेत येणारी संकटे आपल्या सुखासाठीच आहेत.कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है ,मात्र आपल्याला सभोवती जी परस्थिती आहे तीच चांगली आहे ह्या भ्रमात आपण असल्याने या पेक्षा काही चांगले असू शकेल याची सामान्य माणसाला कल्पना येणे थोडे अवघड च असते.पण त्या दयाळू परमात्म्याला मात्र आपल्याला आपल्या कर्मानुसार त्याचे सर्व विश्व दाखवावयाचे असते .त्याचे दर्शन म्हणजे त्याचे अस्तित्व दाखवावयाचे असते हि ज्याची खात्री पटेल(संकटातून तरून गेल्यावर) तो म्हणतोच कि जीव शिवाचे अधिष्ठान पटले.आणि नंतर कधीकाळी भूत काळ आठवताना त्याला वाटणारच कि गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण आता त्याहीपेक्षा चांगले दिवस आले म्हणून जुन्या आठवणींची पाठवणी करू आणि आलेल्या अनुभवावरून सकारात्मक भावाने वागू या कि 'येतील ते(चांगले) दिवस फुलतील पुन्हा आठवणी'
मस्तच
मस्तच