निवृत्ती हि निवृत्ती च असते
तुमची आमची सारखीच असते
कोणाच्या नशिबी ती परिपूर्ण असते
तर कोणाला निवृतीच नसते
स्वेच्छानिवृत्ती मात्र निराळी
घ्या वेळी अथवा अवेळी
वृत्ती ची हि तर्हां मात्र बावळी
न हि सफेद न हि सावळी
अलीप्त तेचे महत्व आगळे
अंन्यथा न समजेल जग हे सगळे
बदल हवेत सतत वेगवेगळे
तरच कळतील हंस आणि बगळे
नव्हेच हितावह गुंतून राहणे
अलिप्ततेने असावे पाहणे
दुराव्याची व्यथा हि सहन करणे
जिंकता जिंकता खुशीने हरणे
जनमत असो काही आपण असावे ठाम
शुद्ध हेतूच्या जोडीला असावे उज्वल काम
दक्षतेने जमवावे समाधानाचे दाम
तरच राहील या जीवनी खरा राम
स्वेच्छानिवृत्ती
Submitted by विनायक. दि.पत्की. on 9 February, 2013 - 03:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"अलीप्त तेचे महत्व
"अलीप्त तेचे महत्व आगळे
अंन्यथा न समजेल जग हे सगळे"
रोजच्या ठराविक चक्रातून बाहेर झाल्याशिवाय चूक कि बरोबर कळणार नाही हेच खरे
"स्वेच्छानिवृत्ती मात्र निराळी
घ्या वेळी अथवा अवेळी"
इतर महत्वाच्या गोष्टी सोडून नित्य चक्रातच गुरफटणे हितावह नसतेच म्हणून सर्वच ठिकाणी स्वेच्छा निवृत्ती हवी हे हि बरोबर