Submitted by kaaryashaaLaa on 15 October, 2008 - 00:10
मित्रहो, कार्यशाळेत गझल प्रकाशित होण्याचा आज शेवटचा दिवस.
आजही तुम्ही नेहमीप्रमाणे गुणांकन करायचं आहेच.
भारतीय प्रमाणवेळेनुसार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुम्ही गुणांकन करू शकता.
जगावे कसे ते मना ठाव नाही
पुन्हा बुध्द व्हावे दुजा वाव नाही
कसे ते गुरू देव भगवंत यावे
फुटे लाख ऊरात तो ताव नाही
इथे "चाँद" खेळे फुकाची दिवाळी
सदा तेवणारा तया गाव नाही
तुझे भास हे गोंदलेले शहारे
ग, स्पर्शात रंगे नवा डाव नाही
असा भेटतो मी तुझ्या आठवांना
तडा आरशाला वरी घाव नाही
जिच्या क्लांत डोही जळे श्वेत पापे
तिच्या रक्त गंगेस का भाव नाही
असा योग होता तिच्या साहिलाशी
कधी पूर होता कधी नाव नाही
कशा ओळखाव्या जुन्या सावल्या या
मनाच्या उन्हाला दिले नाव नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कशा
कशा ओळखाव्या जुन्या सावल्या या
मनाच्या उन्हाला दिले नाव नाही
झकास...
माझे ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
छान आहे .
छान आहे .
छान आहे... ७
छान आहे...
७ गुण..
'ठाव?'. बर्य
'ठाव?'.
बर्याच अंशी कळली नाही.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश
४ गुण
४ गुण
६ गुण
६ गुण
सतीशला
सतीशला मोदक..
मलाही काही नीट कळाली नाही.
गुण ४
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
४ गुण.
४ गुण.
ठाव, ताव,
ठाव, ताव, चांद, घाव, क्लांत, साहिल ..काहीच कळले नाही. डाव, नाव कळल्यासारखे वाटताहेत.
"ठाव" हा "ठाऊक" किंवा "ठावे" साठी वापरणे ही तडजोड पटत नाही; "ठाव" ला स्वत:चा वेगळा अर्थ आहे.
"तया" म्हणजे "तुझा" असेल तर सरळ "तुझा" म्हणावे; "तुला" असेल तर "तुला" म्हणावे.
माझे - ३.
मक्ता
मक्ता चांगला आहे.
पण बर्याच ठिकाणी तडजोड करावी लागली आहे. वाचताना खटकल्यावाचून राहत नाही.
प्रयत्नाबद्दल माझे ५ गुण..!
माझे ५
माझे ५
माझे ४
माझे ४
तर मंडळी,
तर मंडळी, आता कार्यशाळा पूर्ण झाल्याने या गझलेच्या प्रतिक्रीयांवर "प्रतिक्रीया" द्यायला का.शा. ची हरकत नसावी असे गृहीत धरून हे लिहीतो.
सर्वप्रथम तुम्ही ही माझी गझल वाचलीत अन गुणांकन केलेत याबद्दल मनापासून आभार. वरती बर्याच अंशी हे कळले नाही, एकंदर गझल कळली नाही असा सूर जाणवला आणि केवळ म्हणूनच हा प्रपंच. कारण साधे आहे, माझ्या मनातील कल्पना किव्वा आशय तुमच्यापर्यंत पोचला नाही याची खंत अधिक आहे. मला वाटते गझल लिहीण्यातील हेच सगळ्यात मोठे challenge आहे. आणि फार थोड्या जणांना मनातील आशय नेमका शब्द, वृत्त, मात्रा यात बान्धून वाचकांपर्यंत नेमका पोचवता येतो. त्यामुळे इथे गझलेचा संपूर्ण दोष आहे हे निश्चीत.
तरिही, अगदी मोजक्या शब्दात शंका निरसन(?) कराय्चा हा प्रयत्न. त्यातून मलाच अधिक शिकायला मिळेल आणि तुम्ही दिलखुलासपणे सूचना कराल अशी आशा. खालील प्रतिक्रीया फक्त उदाहरण म्हणून घेतोयः
>>>ठाव, ताव, चांद, घाव, क्लांत, साहिल ..काहीच कळले नाही. डाव, नाव कळल्यासारखे वाटताहेत.
"ठाव" हा "ठाऊक" किंवा "ठावे" साठी वापरणे ही तडजोड पटत नाही; "ठाव" ला स्वत:चा वेगळा अर्थ आहे.
"तया" म्हणजे "तुझा" असेल तर सरळ "तुझा" म्हणावे; "तुला" असेल तर "तुला" म्हणावे.
सर्वप्रथम या गझलेतील सर्व शेर हे एकमेकाशी संबंधीत आहेत असे नाही. त्यामूळे प्रत्त्येक शेर वेगळा आहे.. गझल शाळेचा तसा काही नियम होता असे आठवत नाही. शिवाय बहुतांशी सर्व शेरात "रुपक" वापरले असल्याने बहुदा अधिक गोन्धळ झाला असावा..
१. ठाव ची तड्जोड झाली खरी... जगाय्चे कसे हे कळत नाही, आयुष्याच्या एका टप्प्यावर ही हतबलता आल्याने आता गौतम बुध्दाप्रमाणे मार्ग पत्करावा असा आशय होता. मना "ठाव" नाही- मनाला कळत नाही, मनात याचा शोध लागत नाही या अर्थी.
(कार्यशाळेने बुध्द नंतर कंसातील (गौतम) हा मूळ शेरातला शब्द काढून टाकला असे दिसते.)
२. ताव म्हणजे धग, ताप, आग... तावून सुलाखून निघणे. गुरू, देव, भग(वं)त हा संदर्भ राजगुरू, सुखदेव, भगतसिंग या अर्थी आहे. इथे लाख (लोक) ऊरात तशी धग, ताप, आग नाही तेव्हा असे क्रांतीवीर पुन्हा कसे निर्माण होतील असा आशय होता.
(आग हा शब्द वापरून अर्थ स्पष्ट झाला असता पण मग रदीफ, अलामत बदलली असती.)
३. "चाँद" हे रुपक वापरले होते. आजकाल होणार्या बॉम्बस्फोटांबद्दल ह्या शेरातून काही व्यक्त कराय्चे होते. तेव्हा ही फुकाची दिवाळी (स्फोट) केली तरी "चंद्राचा गाव" अशाने कायम तेवणारा राहणार नाही.. पुन्हा एकदा चन्द्र अन त्याचा "गाव" ही त्यातली subtle रुपके आहेत. शिवाय चंद्राला स्वताचा प्रकाश नसतो, अन स्फोट घडवून खचितच तो प्रकाश वाढणार नसतो असेही अभिप्रेत होते.
आता "तया" बद्दल.. शेराचा सूर अन उल्लेख हा तृतीयपुरुषी आहे, "तो चांद".. फुकट दिवाळि करतोय (स्फोट घडवतोय)... म्हणून "त्याचा" गाव.- "तया" हा व्याकरणाच्या, meter अन नियमात बसतही होता शिवाय उल्लेखलेला अर्थही साधत होता (असे मला तरी वाटले). इथे "चंद्रा खेळतोस" असा पहिला शेर असता तर बहुदा "तुझा" "तुला" हे अर्थासकट योग्य बसले असते. मूळ मिटर मधे न बसलेला चुकीचा शेर असा होता (मला वाटत त्यात अर्थ अधिक स्पष्ट होता):
इथे चांद खेळे फुकाची दिवाळी
स्फोटाने उजळला तया गाव नाही
४. घाव, साहिल (किनारा) हे शेर मला वाटत बर्यापैकी स्पष्ट आहेत.. तरिही रुपक असल्याने गड्बड झाली बहुदा.
आरशाला तडा गेला तरी वरती कायमचे घाव दिसत नाहीत- तुझ्या आठवणीन्नी दुक्ख झाले तरी आतले कायमचे घाव दिसत नाहीत, फक्त वरवरचे दुक्ख दिसते- माझे मला. तरिही मि तुझ्या आठ्वणीन्ना भेटतो..
५. क्लांत- हा पूर्ण शेर देह-व्यापार करणार्या स्त्रीवर आहे. "क्लांत" डोह= प्रतिक आहे. "थकलेला" डोह-गर्भ-आत्मा-शरीर
या डोहात आपली श्वेत पापे (दिवसा ढवळ्या राजरोसपणे पैसे देवून केलेले हे कूकर्म) जाळणार्या या जगात "तिच्या" "रक्त-गंगेस"(पुन्हा प्रतिक आहे पण रक्त गंगा म्हणजे काय हे सांगायची गरज नसावि..) या जगात का भाव नाही? (खरच खूप भाव आहे किव्वा खरच भाव्-मान नाही या दोन्ही अर्थी होवू शकते)
या कल्पना कार्यशाळेतील इतर गझलकार, समर्थपणे व अधिक सहज रित्या गझलेत बान्धू शकतील यात शंका नाही.. कुणाला यात दुरुस्त्या सुचवाव्या वाटल्या तर जरूर लिहा.. का.शा. नेही दुरुस्त्या सुचवल्या होत्या पण त्याने मूळ अर्थ अन आशय थोडा बदलत होता असे मला वाटले.
असो. थोडक्यात मनातिल कल्पना गझलेमधे बान्धणे हे तितके सोपे नाही हे पदोपदी जाणवले. यासाठी का.शा. ने निरोप्-आभार प्रदर्शनात म्हटल्याप्रमाणे खूप वाचन, संग्रह, भाषा वैभव (आपला गझल गुरू-वैभव देखिल), अन या सर्वा पलिकडे जावून मला वाटत एक "अनुभूती" ची नितांत गरज आहे.
गझल हे काव्य नाहीच मला तरी ती एक अनुभूती वाटते. गझल हा एक अनुभव आहे... कधि ती थेट आत उतरते (कवीची अनुभूती वाचकापर्यंत पोचते) किव्वा कधी वरवर स्पर्श करून जाते. या कार्यशाळेतही असे अनेक शेर होते ज्यामागची कल्पना, आशय थेट मनाला भिडला.
म्हणूनच एकच गझलश्रेष्ठ सुरेश भट आहेत- ज्यांची संपूर्ण गझल किव्वा प्रत्त्येक शेर वाचताक्षणी तो अनुभव थेट वाचकाला (निदान मला तरी) भिडतो. त्यांन्ना तिथे तोच अर्थ अभिप्रेत होता का असे विचारणे फोल आहे... मला जो अनुभव आला त्यातला आनंद अधिक महत्वाचा असे मला वाटते.
असो. पुन्हा एकदा, प्रतिक्रीया दिल्याबद्दल आभार मानतो.
चू.भू.दे.घे.