मन म्हणजे..

Submitted by के अंजली on 8 February, 2013 - 09:24

मन म्हणजे तळ्यामधलं
निवळशंख पाणी
मन म्हणजे झुरमुरणारी
ढगांमधली गाणी..

मन म्हणजे वसंतातली
अस्फुट रम्य पहाट
मन म्हणजे ओलेशार
दवांमधली वाट..

मन म्हणजे वेणूमधली
मंजूळ हलकी साद
मन म्हणजे पागोळ्यांचा
टीपटीप ओला नाद..

मन म्हणजे डोळ्यामधली
उत्कट वेडी प्रीत
मन म्हणजे गुणगुणणारे
अक्षय जीवन गीत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाचे वेगवेगळे पैलू चांगले मांडलेत.

शेवटी या सगळ्याचा निष्कर्श/सार मांडणारं
आणखी एक कडवं हवं होतं असं राहून राहून वाटतंय.

आभार!

ओलेशार असाच शब्द असावा असे वाटतेय भरतजी..पहाते पुन्हा.

उल्हासजी.. शेवटच्या दोन ओळीत ते सार आलंय असं वाटलं मला..

पुन्हा धन्यवाद! Happy