प्रवेशिका - ४४ ( kaartaa - वाट इतकी पाहिली... )

Submitted by kaaryashaaLaa on 15 October, 2008 - 00:03

मित्रहो, कार्यशाळेत गझल प्रकाशित होण्याचा आज शेवटचा दिवस.
आजही तुम्ही नेहमीप्रमाणे गुणांकन करायचं आहेच.
भारतीय प्रमाणवेळेनुसार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुम्ही गुणांकन करू शकता.

वाट इतकी पाहिली, स्वप्नात अवतरलीच नाही
एकदा रुसली सखी जी - ती पुन्हा हसलीच नाही

वेचतो आहे कशाला, पारिजाताचा सडा मी?
बावलेली रातराणी - जर पुन्हा खुललीच नाही

मैफलीमध्ये तुझ्या, बेभान होउन गायलो पण-
भैरवी तू गायलेली - हाय ओळखलीच नाही

वाट पायी अडखळे जी, दोष तिज देऊ कशाला ?
मी उभा जवळीच होतो - ती कधी वळलीच नाही

तीच माझी शायरी अन, काव्य सारे तीच आहे
शायरी मी गायलेली - पण तिला कळलीच नाही

जीवनाची लक्तरे मी, आज कवटाळू कशाला?
जर कधी ती लक्तरे पाहून - कळवळलीच नाही

नाव स्मरतो जर तुझे, तर दूर मी जाऊ कशाला?
भेटशिलही तू अजूनी - आस ही हरलीच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! आवडली गझल.

माझे ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

५ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

नाव स्मरतो जर तुझे, तर दूर मी जाऊ कशाला?
भेटशिलही तू अजूनी - आस ही हरलीच नाही...

खुपच छान..... ८ गुण

जीवनाची लक्तरे मी, आज कवटाळू कशाला?
जर कधी ती लक्तरे पाहून - कळवळलीच नाही
छान..
माझे ६ गुण..

छान गझल
माझे ७

छान गझल
माझे ७