Submitted by रैना on 6 February, 2013 - 08:15
चार भिंतीतलं राजकारण- विद्या बाळ
"...घराघरातलं कुटुंबात शिजणारं आणि चालणारं राजकारण कुटुंबसंस्थेइतकंच जुनं आहे. आपल्याला ते जाणवत नाही, लक्षात येत नाही. याची दोन कारणं आहेत. कुटुंबाच्या गौरवीकरणात आपल्यावरच्या म्हणजे स्त्रियांवरच्या उदात्त संस्कारांची परंपरा फार मोठी आणि घट्ट आहे. त्यामुळे स्वार्थत्याग, समर्पण, वात्सल्य, सोशिकता यासारख्या ‘गुणांची’ मक्तेदारी स्त्रियांवर लादण्यात परंपरा यशस्वी झाली आहे. वास्तविक हे ‘गुण’ हे खरंच चांगले असतील तर पुरुषांमध्येही त्यांची रुजुवात का बरं करण्यात आली नसेल? ..."
- विद्या बाळ
पूर्ण लेख इथे उपलब्ध आहे. वाचनिय.
http://www.miloonsaryajani.com/node/916
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेगळा विचार. धन्यवाद
वेगळा विचार. धन्यवाद रैना.
शेवटचा परिच्छेद तर फारच आवडला/पटला.
वाचते, धन्यवाद लिंक
वाचते, धन्यवाद लिंक दिल्याबद्दल.
<<< यासाठीच गोपाळराव आगरकर
<<< यासाठीच गोपाळराव आगरकर म्हणतात तसं कुटुंबाचं लोकशाहीकरण करण्याची नितांत गरज आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि करुणा या मूल्यांवर आधारित अशी व्यवस्था ही जास्तीत जास्त माणसांच्या भल्याचा विचार करते. हीच ती लोकशाही व्यवस्था. ही जर देशाच्या पातळीवर, एका तात्विक भूमिकेतून, घटनेच्या आधाराने आपण स्वीकारली आहे, तर तिचं बी जिथून रुजतं आणि वाढीला लागतं, त्या कुटुंबाच्या पातळीवर त्याचा विकार अग्रक्रमाने व्हायला हवा. त्यासाठी पितृसत्ताक किंवा पुरुषसत्ताक व्यवस्थेनुसार विषमतेवर आधारित अशा कुटुंबातलं राजकारण समजून घ्यायला हवं. कुटुंबातल्या आणि समाजातल्या जास्तीत जास्त नव्हे तर प्रत्येक माणसाला माणसासारखं जगण्याची संधी देणारी लोकशाही व्यवस्था आहे. >>> हे अगदीच पटलं! सारा लेखच आपल्या कुटुंबसंस्थेच्या व कुटुंबसंदर्भात आदर्श समजल्या जाणार्या मूल्यांबाबत फेरविचार करायला लावणारा!
हंटिंग व गॅदरिंग करणार्या टोळ्यांच्या काळातील मानसिकताच आजही कुटुंबव्यवस्थेत जपलेली दिसते असे म्हटले तर ते धाडसाचे ठरू नये. पुरुषांनी शिकार करायची, आपल्या टोळीचे रक्षण करायचे, स्त्रियांनी शैय्यासोबत व मातृत्वाखेरीज फळे-कंद-मुळे गोळा करायची व टोळीतील मुलांचे पालनपोषण, अन्नव्यवस्थापन, निवास यांकडे लक्ष द्यायचे. त्यानुसार बाहेरच्या सर्व गोष्टींचे खाते पुरुषांकडे तर घर, मुले, अन्न इत्यादी गोष्टींचे खाते स्त्रियांकडे. आणि आजही कमी-अधिक प्रमाणात हीच व्यवस्था दिसते. मधल्या काळात अनेक बदल झाले, औद्योगिक - युद्ध - स्वातंत्र्य - तंत्रज्ञानाच्या क्रांत्या झाल्या. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले. परंतु ह्या व्यवस्थेत मात्र खूप काही बदल झाल्याचे तितकेसे दिसून येत नाही.
कुटुंबाचे लोकशाहीकरण करायचे
कुटुंबाचे लोकशाहीकरण करायचे म्हणजे नक्की काय करायचे ???
>>परंतु ह्या व्यवस्थेत मात्र
>>परंतु ह्या व्यवस्थेत मात्र खूप काही बदल झाल्याचे तितकेसे दिसून येत नाही.
या व्यवस्थेत वाईट काय आहे ?
मला असे म्हणायचे आहे की एखाद्या स्त्रीने घराकडे लक्ष दिले तर ते जास्त प्रभावी आणि चांगले असते,
तसेच पुरूषांनी अर्थार्जन करणे आणि स्त्रीने घराकडे, मुलांकडे लक्ष देणे हे बर्यापैकी नैसर्गिक विभाजन वाटते.
(कृपया यावर आक्रमक हल्ले न करता इतर विचार पण समजावून घेऊन लिहिलेत तर समजावून घ्यायला मदत होईल. धन्यवाद.)
विद्याताईंनी लेखात लिहिलं आहे
विद्याताईंनी लेखात लिहिलं आहे त्याप्रमाणे घर व बाहेरचे जग यांत अनेक प्रकारची खाती असतात. घरातली खातीही ठराविक व्यक्तींकडे पिढ्यानुपिढ्या नेमून दिलेली असतात / दिली जातात. परंतु लोकशाहीत जसा खातेपालट होतो तसा तो घरात होताना दिसत नाही. घरातील सर्व व्यक्तींना मताचे स्वातंत्र्य असणे, त्यांच्यात अधिक-उणे न करता त्यांना समान न्याय मिळणे इत्यादी अनेक बाबी लिंक दिलेला लेख वाचलात तर कळू शकतील.
<< मला असे म्हणायचे आहे की एखाद्या स्त्रीने घराकडे लक्ष दिले तर ते जास्त प्रभावी आणि चांगले असते,
तसेच पुरूषांनी अर्थार्जन करणे आणि स्त्रीने घराकडे, मुलांकडे लक्ष देणे हे बर्यापैकी नैसर्गिक विभाजन वाटते. >>
नैसर्गिक किंवा अनैसर्गिक यांपेक्षा ते कालानुरूप आहे का, हेही बघावे लागेल ना?
कितीतरी पुरुषांना पैसे कंपल्सरी मिळवणे, अर्थार्जन करणे, कुटुंबाचे भरणपोषण करणे जाचक किंवा बांधून टाकणारे वाटू शकते आणि स्त्रियांना घरात राहून चूल-मूल सांभाळणे!
प्रभावी व चांगले वाटते >> कुणाला? कोणाच्या मते? ज्या स्त्रिया किंवा पुरुष हे सर्व करतात त्यांनाही विचारून बघा त्यांचे मत!
शिवाय ज्याला नैसर्गिक म्हणून संबोधिले आहे ते खरोखरी नैसर्गिक की परंपरेने चालत आलेले/ अंगवळणी पडलेले आहे हेही विचार करण्यासारखे आहेच! उद्या एखाद्या पुरुषाला आपल्या मुलांचे संगोपन करावेसे वाटले, गृहव्यवस्थापन करावेसे वाटले व त्याच्या जोडीदार स्त्रीस घराबाहेर पडून कुटुंबाचे भरणपोषण करावेसे वाटले तर मग ते अनैसर्गिक विभाजन असे म्हणणार का?
जिथे जोडीदार सोडून गेला आहे किंवा मृत्यू पावला आहे तिथे भरणपोषणाची, अर्थार्जनाची व मुलांच्या संगोपनाची, गृहव्यवस्थेची जबाबदारी निभावणे हे जी व्यक्ती करत असेल ते सर्व अनैसर्गिक ठरणार का?
रच्याकने, प्राण्यांमधल्या लोकशाहीची ही काही उदाहरणे!
@महेश <<कुटुंबाचे लोकशाहीकरण
@महेश
<<कुटुंबाचे लोकशाहीकरण करायचे म्हणजे नक्की काय करायचे ???>> + १
या लेखामधून मी एवढेच शिकलो - तडजोडीने संसार चालवायचा. स्वार्थत्याग, समर्पण, वात्सल्य, सोशिकता यासारख्या गुणांची सर्वांवर शिकवण/आचरण पाखरावी.
असो.. अन्न्याय होता आणि भेदही होतेच; त्यामुळे टोकाच्या समतेचाही, प्रासंगिक हिंस्त्र समतेचा पुरस्कार होणार. म्हणून आपण टोकाचे विचार सोडून द्यावेत. नाहीतर समता ही विषमतेपेक्षाही हिंस्त्र होते (even in animal democracy).
कुटुंबाचे लोकशाहीकरण करायचे
कुटुंबाचे लोकशाहीकरण करायचे म्हणजे नक्की काय करायचे ???
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मताला+गरजांना समान महत्त्व द्यायचं. कुटुंबात निर्णय कोण घेतं?
(आज भाजी कोणती करायची याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य 'दिलं' म्हणजे पुरेसे झालं का?)
वाचला लेख. छान आहे.
वाचला लेख. छान आहे.
छान आहे लेख.
छान आहे लेख.
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू विद्या बाळः
असे लेख लिहिणे हे चिंतन, शब्दप्रभुत्व व चांगल्याची कास धरणे हे गुण असणार्या एखाद्याला छान जमते. मात्र हा जो लेख आहे, त्यातः
१. कुटुंब व सत्तेचे राजकारण यांच्यातील साधर्म्य दाखवणे
२. काय व्हायला हवे आहे हे सांगणे
व
३. आजवर काय झाले याबद्दल स्वतःची मते मांडणे
आहे.
परंतु अश्या लेखांमध्ये नेहमी दिसते तसेच 'आरंभ, सद्य परिस्थिती व मुक्कामस्थान' हे तीन टप्पे याही लेखात आढळतात. 'तेथे कसे पोचायचे' हा मार्ग त्यात फारसा दिसत नाही याचे कारण 'हे सगळे असे असे व्हायला हवे आहे' यापलीकडे लेखाची झेपच नसते.
विद्या बाळ यांनी इतके चिंतन केलेलेच आहे, तर जनसामान्यांना सहज पटेल अश्या या लेखाचे वाचन झाल्यानंतर जर एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय गृहिणीने विचारले, की कशी आणायची कुटुंबात लोकशाही? तर कोण आणि काय उत्तर देणार? ते उत्तर सर्वांसाठी समान असू शकेल का? शेवटी सर्वांसाठी उत्तर हेच मिळेल ना? की बुवा प्रत्येकाने स्वतःमध्ये, स्वतःच्या मानसिकतेत बदल घडवून आणायला हवे आहेत? मला असे म्हणायचे नाही की लेख वाचला की सुधारणा झाल्या पाहिजेत. पण जबाबदारी जर एका आणि प्रत्येक व्यक्तीची वैयक्तीक जबाबदारी ठरणार असेल, तर कुटुंबव्यवस्थेबाबत इतकी एकांगीच मते मांडण्याऐवजी न्याय्य लेखाजोखा घ्यायलाही काय हरकत असावी? न्याय्य लेखाजोखा घ्यायचा झालाच तरः
१. कौटुंबिक सत्ताकेंद्रे अस्तित्वात असूनही स्त्रीला त्या व्यवस्थेतूनही काही प्रकारचे संरक्षण मिळत राहिले का?
२. निसर्गासंदर्भात अधिक संवेदनशील असणार्या स्त्रीदेहाकडून लहान मुलांप्रती एका पुरुषापेक्षा अधिक वात्सल्याची भावना जागृत होणे हे नैसर्गीक आहे हा मुद्दा विचारात घेतला गेला का? (संगोपनाची जबाबदारी स्त्रीवर ढकलताना फक्त अन्याय्य भूमिकाच घेतली गेली अश्या स्वरुपाच्या विधानाला हा प्रतीप्रश्न आहे).
३. पत्नी व्यभिचारी असल्याचे समजल्यानंतरही आकांडतांडव न करता तिला नीट समजावून सांगून परत मार्गावर आणणारे पुरुष संख्येने किती आहेत, असतील, अशी काही उदाहरणे घडून गेलेली आहेत किंवा नाही, याची काही माहिती मिळवली का? की फक्त स्त्रीची अब्रू गेल्यावर तिला मारून टाकणे, अब्रू घेणार्याला मारून टाकणे इतकेच, स्त्रीचा त्याग करणे इतकेच प्रकार झाले?
४. संतांनी दाखवलेला भक्तीमार्ग, महाराजांनी आणलेली न्याय्य शासनव्यवस्था यांचे परिणाम तात्कालीन समाजावर, कुटुंबांवर व विशेषतः स्त्रियांवर कितपत झाले यावर काही भाष्य करावेसे वाटले का? जर जिजाऊंचा शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत सर्वाधिक वाटा होता, तर त्या काळातील पुढच्या अनेक स्त्रियांनी जिजाऊंच्या पावलावर पाऊल ठेवलेले असणार ना? त्यांच्यात्यांच्यापुरती लोकशाही आलेलीही असू शकेल आणि महाराजांनी निर्मिलेल्या शासनव्यवस्थेमुळे ती काही काळ का होईना पण टिकलीही असेल.
असो! स्त्रीवाद किंवा स्त्रीपुरुषसमानता हे मुद्दे मायबोली या व्यासपीठावर अश्या काही पद्धतीने चर्चिले गेलेले दिसले आहेत की 'आयदर यू अॅग्री टू मी ऑर यू आर राँग' असे वाटावे. विद्या बाळ यांनी कुटुंबाची राजकारणाशी केलेली तुलना नक्कीच चिंतनीय वाटली, पण पर्यायी व्यवस्था काय किंवा लोकशाही यायला हवी या इच्छाप्रदर्शनाबरोबरच त्याचे मार्ग काय यावर काही भाष्य त्यात आढळले नाही.
रैना, लेखाबद्दल धन्यवाद. लेख
रैना, लेखाबद्दल धन्यवाद. लेख कितीही योग्य असला तरी इथे चर्चा करून वेळ वाया दवडणे आणि विनाकारण डोक्याला त्रास करून घेणे यापलिकडे काहीही होण्याची शक्यता नाही त्यामुळे मी तरी शक्यतो वाचनमात्रच.
>>> कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मताला+गरजांना समान महत्त्व द्यायचं. कुटुंबात निर्णय कोण घेतं?
(आज भाजी कोणती करायची याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य 'दिलं' म्हणजे पुरेसे झालं का?) <<<
+१०००००००
>>असो! स्त्रीवाद किंवा
>>असो! स्त्रीवाद किंवा स्त्रीपुरुषसमानता हे मुद्दे मायबोली या व्यासपीठावर अश्या काही पद्धतीने चर्चिले गेलेले दिसले आहेत की 'आयदर यू अॅग्री टू मी ऑर यू आर राँग' असे वाटावे. विद्या बाळ यांनी कुटुंबाची राजकारणाशी केलेली तुलना नक्कीच चिंतनीय वाटली, पण पर्यायी व्यवस्था काय किंवा लोकशाही यायला हवी या इच्छाप्रदर्शनाबरोबरच त्याचे मार्ग काय यावर काही भाष्य त्यात आढळले नाही.
अनुमोदन !!!
रैना, लेखाबद्दल धन्यवाद! या
रैना, लेखाबद्दल धन्यवाद!
या व्यवस्थेत वाईट काय आहे ?>>> हा तुमचा विचार झाला. जे चालू आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय, पण तुमच्या कुटुंबातील बाकी सदस्यांनाही त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका योग्य वाटतेय का?
कुटुंबातील सगळ्याच व्यक्ती आपापल्या भूमिकेत समाधानी असतील तर ती व्यवस्था त्या कुटुंबासाठी योग्यच आहे असे म्हणायला पाहिजे. परंतु, कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती तिच्या भूमिकेबद्दल असमाधानी असेल, आणि बाकी सदस्य हे समजून घेत नसतील, त्यांच्या लक्षातच येत नसेल तर मग ती घडी बदलायला हवी आहे असं समजावं.
मला वाटते, विद्या बाळ यांच्या
मला वाटते,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विद्या बाळ यांच्या मूळ लेखाखाली चर्चा करणे शक्य आहे. त्या साईटवर जाऊन 'विस्तृत' रसग्रहण इ. करावे. किमान लेखिकेला तुमची मते समजतील तरी.
इथे मायबोलीवर बोलण्यात काय मतलब? हातभर पोस्टी काय कुणीही लिहू शकतो
महेश, - "कृपया यावर आक्रमक
महेश, - "कृपया यावर आक्रमक हल्ले न करता इतर विचार पण समजावून घेऊन लिहिलेत तर समजावून घ्यायला मदत होईल." या विधानानंतर दोन तीन जणांनी आपल्या प्रश्नांची शांतपणे उत्तरे दिलेली दिसत आहेत. ती आपण वाचलीत का ? त्यावर काही विचार केलात का ? समजावून घ्यायचा प्रयत्न केलात का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुभेच्छा !
http://www.miloonsaryajani.co
http://www.miloonsaryajani.com/node/916#comment-82200
दिले बुवा तिथेही मत
विचार करायला लावणारा आहे लेख.
विचार करायला लावणारा आहे लेख.
वाचत आहे, आज सविस्तर लिहायला
वाचत आहे, आज सविस्तर लिहायला वेळ मिळणार नाही कदाचित.
धन्यवाद रैना! आपल्या देशात
धन्यवाद रैना!
आपल्या देशात अजून राजकीय लोकशाहीच समाजाचा नैसर्गिक भाग झालेली नाही, शेकडो वर्षे राजसत्तेच्या अंमलात असलेल्या समाजावर केलेले हे लोकशाहीचे फक्त कलम आहे. त्यामुळे 'जशी देशात लोकशाही आहे तशी कुटूंबात असावी' हे लॉजिक वाचायला छान वाटले तरी फ्लॉड आहे.
नीधप आणि मयेकरांना अनुमोदन
कालच एक मोठ्ठी चर्चा झाली.
कालच एक मोठ्ठी चर्चा झाली. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक नवीन डॉक्टर आली आहे/आल्या आहेत. थोडी भडक डोक्याची आहे आणि काही वैयक्तिक गोष्टींमुळे तणावाखाली असते. गेल्या आठवड्यात तिने हॉस्पिटलच्या अॅडमिनला काहीतरी कारणाने वाईट (आईसंबंधित) शिव्या दिल्या.
त्याबद्दल डॉक्टर्स लाऊंजमध्ये चर्चा चालू होती. एक सिनीअर डॉक्टर आहेत.
ते म्हणाले, "कुछ भी कहों, हमारे पाकिस्तान में और आपके हिंदुस्तान में अच्छी औरतें ऐसी गालियां नहीं देती हैं. मर्दोंने दी तो अलग बात है"
शेवटच्या वाक्याला माझा कडाडून विरोध होता. शिव्या ह्या शिव्याच, बाईने दिल्या काय आणि बाप्याने दिल्या काय. पण शेवटपर्यंत ही गोष्ट उपस्थित पुरूषवर्गाला मान्य झाली नाही.
शेवटी "ठीक आहे मग, द्या सगळ्या बायांनी असल्या शिव्या" असा समारोप झाला. पण "दोघांनी ही देऊ नयेत" हे मान्य करणं त्यांना शक्य झालं नाही.
बाई म्हणजे शालीनता, सोज्वळता....तिला राग येऊ शकत नाही. राग आला की तिने व्यक्त करायचा नाही. रडायचं, आधार शोधायचा. असलेच विचार खोलवर रूजले आहेत![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
असो.
<<रैना, लेखाबद्दल धन्यवाद. लेख कितीही योग्य असला तरी इथे चर्चा करून वेळ वाया दवडणे आणि विनाकारण डोक्याला त्रास करून घेणे यापलिकडे काहीही होण्याची शक्यता नाही त्यामुळे मी तरी शक्यतो वाचनमात्रच. >> +१००००
कोणत्याही कारणानी एका पेक्शा
कोणत्याही कारणानी एका पेक्शा अधिक मन्डळी एकत्र आली की त्यात थोरले पणा आणि धाकटे पणा हा येणारच आहे. त्याला पर्याय नाही.
कमित कमी ज्या मुली स्वतःच्या पायावर आर्थिक द्रुष्ट्या उभ्या आहेत, त्यान्ना जर आपल्यावर कोणी वर्चस्व गाजवू नये अस वाटत असेल तर त्यान्नी विवाह किन्वा विवाहबाह्य सम्बन्धात पडण्याच्या भानगडीत पडू नये. पडायचच असेल तर नवर्याला किन्वा मित्राला स्वतःच्या गोष्टी मान्य करायला लावायच कसब साध्य कराव.
पण मी लग्न पण करणार, माझे मुद्दे इतरान्च्या गळ्यात उतरवण्याच (साम दाम इत्यादी) कसब पण मिळवणार नाही पण तरी पण इतरान्नी मला विचारल पाहीजे, अस कस शक्य आहे?
विद्याताई जे राजकारण म्हणत आहेत, ते लहान मुलान्च्या शाळेपासून ते coroprate world पर्यन्त सगळीकडे अस्तित्वात आहे. स्वतः विद्याताई ज्या सन्स्थान्मध्ये जातात तिथे तरी हे तथाकथीत राजकारण नाही आहे असा त्या तरी दावा करू शकतील का?
कुटुम्ब हा विषय थोडावेळ सोडून द्या... बायकान्चे जे groups असतात (भिशी, महिलामन्डळ, शाळेत जाणार्या मुलान्च्या आया इत्यादी), तिथे देखील अधिक "समर्पणशील, वात्सल्य असलेली" तिला इतर बायका अशाच दाबतात हे पण आहेच ना...आणि तिथे देखील जी जास्ती आक्रमक आणि diplomatic असते, तिच्या मागे सगळेच धावतात हे देखील दिसून येत.
बर आणि पुरुषसत्ताक म्हणून उगाच जमीन धोपटण्यात काय अर्थ आहे? सध्या शहरी भागात अनेक स्त्रीसत्ताक कुटुम्ब दिसून येतात. उगाच कुटुम्बपद्धतीला दोश देण्यात काय अर्थ आहे? अधिकार गाजवणे आणि गाजवून घेणे ही तर स्वभाविक मानवी व्रुत्ती आहे.
>>>>असो! स्त्रीवाद किंवा
>>>>असो! स्त्रीवाद किंवा स्त्रीपुरुषसमानता हे मुद्दे मायबोली या व्यासपीठावर अश्या काही पद्धतीने चर्चिले गेलेले दिसले आहेत की 'आयदर यू अॅग्री टू मी ऑर यू आर राँग' असे वाटावे. त्याचे मार्ग काय यावर काही भाष्य त्यात आढळले नाही.<<<
मायबोलीवरील कुठल्याहि चर्चेत असे बरेचदा दिसून येते हे खरे आहे, असे मला वाटते.
>>>>इच्छाप्रदर्शनाबरोबरच त्याचे मार्ग काय यावर काही भाष्य त्यात आढळले नाही.<<<<
हे तर युनिव्हर्सल ट्रुथ आहे, गुरुत्वाकर्षणासारखे.
कुणि काही मार्ग सुचवला तर आयदर यू वगैरे नियम लागू पडतो. इथेच नाही, राजकारणात सुद्धा.
म्हणजे चर्चेचे दोनच नियमः
१. मी म्हणतो तेच बरोबर, इतरांचे चूक, मूर्खपणाचे.
२. नियम १ वाचा.
असे झाले.
म्हणजे चर्चा करायचीच नाही असे नाही, निदान वैयक्तिक प्रमाणावर जरी चांगला परिणाम झाला तर बरेच. जसे मी खरेच बदललो, तर बरेच ना. (कळतय हो, पण कुठे कुठे नि किती बदलणार आता?)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)