Submitted by वनिता तेंडुलकर ... on 5 February, 2013 - 03:01
हा हुंदका कशाचा कंठात दाटलेला?
का थेंब आसवाचा डोळ्यांत साठलेला?
रडशील काय आता, नाते विरून गेले
अभिशाप यातनांचा, प्रीतीस लागलेला
स्वप्ने सरून गेली, गेल्या गळून आशा
झोळीत दान सारे, कोनाच फाटलेला
सांगू कशी कुणा मी? माझी व्यथा निराळी
माझ्याच भावनांचा, संहार मांडलेला
माझे मलाच आले, समजून आज सारे
माझ्यासवेत माझा संवाद चाललेला
सांभाळले स्वतःला, ओलावल्या मनाने
आल्या सुखांत आता, आनंद मानलेला
उसळून आज येती काव्ये जरी मुखाशी
ओठांवरी 'नितू'च्या तो स्त्रोत आटलेला
वनिता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
baryaapaikee jamalyaagat
baryaapaikee jamalyaagat vaatalee
tumachyaa Takhallus varoon Jitoo aathavalaa
ek shankaa: konaa mhanje nakkee kaay & to zoleelaahee asto ka; choleelaa asto he maheet hote
धन्यवाद ! मला जवळचे नीतूच
धन्यवाद ! मला जवळचे नीतूच म्हणतात
राहिला "कोना" ..माझ्या मते तो कोणत्याही चौकोनी वस्तूला आणि जिथे "जोड" असतो तिथे असू शकतो ...
छान आहे........आवडली......
छान आहे........आवडली......
गुड....अजून धारदार.....होईलच.
गुड....अजून धारदार.....होईलच. मायबोली स्कूल!
ठीक ठाक गझल. खयाल अजून
ठीक ठाक गझल. खयाल अजून परिपक्व होतील व अभिव्यक्तीसुद्धा खुलेल असं दिसतंय....आपण लिहीत रहा. शुभेच्छा.
अभिशाप यातनांचा >> वा!!
अभिशाप यातनांचा
>> वा!!
सुरेख..
सुरेख..
माझे मलाच आले, समजून आज
माझे मलाच आले, समजून आज सारे
माझ्यासवेत माझा संवाद चाललेला
शेर आवडला.
माझ्यासवेत असे वापरतात का माहीत नाही.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
चांगली गझल..
चांगली गझल..
(No subject)
माझे मलाच आले, समजून आज
माझे मलाच आले, समजून आज सारे
माझ्यासवेत माझा संवाद चाललेला.........
एकदम आवडले......
'अभिशाप' अणि 'संवाद' अधिक
'अभिशाप' अणि 'संवाद' अधिक आवडले.